लॉकडाऊनमुळे उरलेल्या मालाचे व्यवस्थापन कसे कराल?

आपल्या ग्राहकांना हवा तेव्हा आणि हवा तितका माल मिळण्यासाठी म्हणजेच आपले कोणतेच उत्पादन आउट ऑफ स्टॉक होऊ न देण्यासाठी बरेच उद्योजक जास्तीचा माल घेऊन किंवा तयार करून ठेवतात.

सध्या अचानक आपल्यासमोर आलेल्या लॉकडाउनने जवळपास सर्वांचीच गणितं बिघडवली आहेत. त्यामुळे या उरलेल्या व अतिरिक्त मालाचे व्यवस्थापन करण्याच्या चार पद्धती पाहूया.

१. हा माल विकून टाका

आता आपल्याला वाटेल की विकला न गेलेला माल पुन्हा कसा विकणार?

  • त्या मालाची किंमत थोडीफार कमी करा.
  • फ्लॅश सेल ठेवा. (कमी काळासाठी त्या मालावर भरगोस सूट ठेवणे)
  • एन्ड ऑफ लॉकडाउन सेल ठेवा.
  • विविध काँबो तयार करा. (जसे एक वस्तू विकत घेण्याऐवजी दोन घेतल्यास २०% सूट)

२. तुमच्या उत्पादनांची प्रसिद्धी वाढवा

नवीन लोकांपर्यंत तुमचे उत्पादन पोहचवण्याचा हा उत्तम काळ आहे. प्रसिद्धी वाढवण्यासाठी आपण खलील पर्याय वापरू शकता:

अविश्वसनीय किंमती : आपले उत्पादन विकले गेले नाहीये. त्यामुळे आता त्यातून जितका अपेक्षित होता तितका नफा मिळणे कठीण. त्यामुळे आपल्या उत्पादनांची किंमत एक किंवा दोन दिवस ₹१, ₹१०, ₹९९, ₹९९९ अशी ठेवा. त्यामुळे जास्तीतजास्त लोक त्या उत्पादनांकडे वळतील.

उत्पादनांच्या कथा : बोलणाऱ्या लोहाराचे लोखंडसुद्धा विकले जाते, परंतु न बोलणाऱ्या सोनाराचे सोनेसुद्धा विकले जात नाही. ह्याचप्रमाणे लोकांना आपल्या उत्पादनाची माहिती द्या. आपल्या उत्पादनाची सविस्तर माहिती देणारे लेख लिहा आणि ते ग्राहकांपर्यंत पोचवा.

३.  ऑफलाइनसुद्धा विक्री करा

लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन विक्री करणाऱ्यांना फार त्रास झाला नाही, हे ऐकून बरेच उद्योजक ऑनलाइन विक्रीला प्राधान्य देतील. पण त्यासोबत ऑफलाइन अर्थात प्रत्यक्ष विक्रीकडेसुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे.

तुमचे स्वतःचे दुकान नसेल तर छोट्या-मोठ्या का होईना, परंतु इतरांच्या दुकानांत आपली उत्पादने ठेवल्याचा नक्कीच फायदा होईल.

४. उत्पादनांचे मोफत वाटप करा

आता तुम्हाला वाटेल मोफत वाटून टाकली तर तोटा कमी कसा काय होणार! बरोबर आहे. आता जरी तोटा झाला तरी याचा भविष्यात फायदाच होणार आहे. तुमचा जो माल उरला आहे त्याची लहान लहान सॅम्पल तयार करा. ही सॅम्पल जास्तीत जास्त नवीन लोकांमध्ये वाटा. न पैसे देता नवीन गोष्ट वापरून बघायला फार कुणाची ना नसेल. या लोकांपैकी ज्यांना आपले उत्पादन आवडेल, ते नक्कीच भविष्यात आपले ग्राहक होतील.

वरील प्रत्येक गोष्ट प्रत्येकालाच लागू होईल असं नाही. त्यामुळे आपल्या व्यवसायानुसार यातली जी गोष्ट करता येऊ शकते ती करण्याचा प्रयत्न करा.लक्षात ठेवा, संकटकाळी जो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काढतो, तोच यशस्वी होऊ शकतो!.

– शैवाली बर्वे

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?