मार्केटिंगसाठी कसे वापरावे व्हॉट्सअ‍ॅप?
उद्योगोपयोगी

मार्केटिंगसाठी कसे वापरावे व्हॉट्सअ‍ॅप?

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा आणि दिवाळी अंकापासून रजिस्टर्ड पोस्टाद्वारे घरपोच मासिके मिळवा फक्त ₹५०० मध्ये!
Book Now: https://rzp.io/l/15JEP6xIy

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर, हाइक, वायबर, लाइन, टेलिग्राम अशा विविध इंन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर आपल्यापैकी बरेच जण करतात. यापैकी व्हॉट्सअप वापरकर्त्यांची संख्या ही जगात सर्वात जास्त आहे. भारतात सुमारे ७ कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. शहरी वा निमशहरी भागांत व्हॉट्अ‍ॅपचा वापर न करणारी व्यक्ती दुर्मिळच.

एवढ्या मोठ्या व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना याचा उपयोग आपल्या प्रमोशनसाठी करण्याचा मोह टाळता येणे कठीणच आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपचा आपल्या प्रमोशनसाठी उपयोग करताना बर्‍याच गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा व्हॉट्सअ‍ॅपवरील हेच आपले प्रमोशन हे आपल्या व्यवसायाबद्दल लोकांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण करण्यासाठीचे सर्वात मोठे साधन ठरू शकते.


वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/smartudyojak
प्रथम व्हॉट्सअ‍ॅप या अ‍ॅपबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हे पूर्णपणे मोफत असलेले अ‍ॅप सर्व प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टम्सवर उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या यशाचे मूळ कारण हे त्याच्या वापरातील सहजता हे आहे. आपल्या कॉन्टॅक्ट यादीत नोंद असलेल्या कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्याशी आपण या अ‍ॅपद्वारे चॅट करू शकतो. शिवाय ग्रुप चॅट व ब्रॉडकास्ट या दोन सेवाही उपलब्ध आहेत.

सामान्यपणे उद्योजक व्हॉट्सअ‍ॅप मार्केटिंगमध्ये चूक ही करतात की, ते सरसकट सगळ्यांना वारंवार आपली जाहिरात ब्रॉडकास्ट करत असतात. अशाने लोक तुमच्या जाहिरातीला कंटाळू लागतात आणि त्याने तुमच्या ब्रॅण्डबद्दल नकारात्मकता निर्माण होते.

एक महत्त्वाची गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे, की व्हॉट्सअ‍ॅप कंपनीच्या नियमावलीनुसार या अ‍ॅपचा कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यासाठी उपयोग करता येऊ शकत नाही. कंपनीला कोणताही वापरकर्ता याचा जाहिरातीसाठी वापर करत असल्याचे लक्षात आल्यास कंपनी तो नंबर काही काळासाठी किंवा कायमस्वरूपी बंद करू शकते. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रत्यक्ष मार्केटिंग करणे हे बेकायदेशीर व अनैतिक आहे.

या मूळ गोष्टीचा विचार करून व्हॉट्सअ‍ॅपचा मार्केटिंगसाठी पद्धतशीर वापर कसा करता येईल हे पाहू.

व्हॉट्सअ‍ॅपवर सरसकट सगळ्यांना जाहीरात पाठवण्याऐवजी ठराविक लोकांचा डेटा तयार करणे गरजेचे आहे, ज्यामध्ये आपले ग्राहक व संभाव्य ग्राहक असू शकतात. एक नंबर फक्त कंपनीचा व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्ट म्हणून वेगळा ठेवावा. हा नंबर आपल्या ग्राहकांनाही देऊन त्यांना त्यावर आपल्याशी संपर्क करता येण्याची संधी द्यावी, म्हणजे ग्राहक आपल्याला या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार, सूचना, चौकशी करू शकतील, जेणेकरून ग्राहकांना आपल्याशी जोडले जाणे सोपे जाते व त्यांचा आपल्या कंपनीशी/ब्रॅण्डशी संपर्क वाढतो.

या क्रमांकावरून ग्राहकांची प्रतिक्रिया, अभिप्राय वगैरे घेऊ शकता. अनेक लोकांना अभिप्राय देणे आवडते. त्यामुळे तुम्ही जर त्यांना म्हटलेत की, ‘प्रॉडक्टच्या गुणवत्तेत सुधार करण्यासाठी आपण वापरलेल्या प्रॉडक्टबद्दल आपली बहुमूल्य प्रतिक्रिया द्या’ तर ग्राहकही अशा प्रकारच्या संवादाने खूश होतात व ते आपल्या ब्रॅण्डशी दीर्घकाळापर्यंत जोडले जातात.

अशा प्रकारे सरसकट सगळ्यांवर जाहिरातींचा भडिमार करण्यापेक्षा आपले ग्राहक व संभाव्य ग्राहक यांच्यापर्यंत पद्धतशीररीत्या पोहोचल्यास हळूहळू याचा विक्रीवर परिणाम होताना नक्की दिसू शकेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सचा वापर : व्हॉट्सअ‍ॅपवर सतत जाहिरातींचा भडिमार करूनही हाती काही लागणे कठीण आहे. ग्रुपचा उपयोग एकमेकांना मदत करणे, माहिती-ज्ञानाचे आदानप्रदान करणे व प्रश्‍न, समस्या, अडचणी सोडवणे यासाठी करणे श्रेयस्कर ठरू शकते.

व्हॉट्सअ‍ॅप मार्केटिंगचे काम जर एखाद्या एजेन्सीला देत असाल तेव्हा त्यांच्याकडूनही याच प्रकारे प्रमोशन होईल याची काळजी घ्या. बर्‍याच एजन्सीज् व्हॉट्सअ‍ॅपच्या नाव फक्त व्हॉट्सअ‍ॅप स्पॅमिंग करताना आढळतात.

– शैलेश राजपूत


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!