Advertisement
उद्योगोपयोगी

WhatsApp Payment मुळे पैशांची देवाण-घेवाण झाली आणखी सोपी WhatsApp Payment कसे सुरू करावे व वापरावे याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन

आपल्याला ठाऊकच असेल की मेसेजिंगमधील सर्वात मोठे जाळे असलेल्या WhatsApp ने आता आपण आपल्या मित्र-परिवारासोबत पैशांची देवघेव करू शकतो. हे फिचर सध्या फक्त बीटा युजर्स म्हणजेच असे ठराविक वापरकर्ते जे एखादे नवीन फिचर आले की ते वापरून त्यावर आपली प्रतिक्रिया देतात अशांकडेच आले आहे, परंतु लवकरच हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे, त्यामुळे त्याबद्दल एक उद्योजक म्हणून अद्ययावत माहिती असणे गरजेचे आहे.

WhatsApp पेमेंट मागील शास्त्र

WhatsApp च्या आपल्या अकाउंटला यु.पी.आय. अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेसद्वारे आपण आपले कोणतेही बँकेचे खाते जोडू शकतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या बँकेच्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवतो तेच काम WhatsApp आता करत आहे. याद्वारे आपण आपल्या WhatsApp मधून आपल्याकडे ज्यांचे फोन नंबर्स आहेत त्या सर्वांसोबत पैशांची देवाण-घेवाण करू शकतो. ही देवाण-घेवाण WhatsApp मार्फत झाली असली तरी प्रत्यक्षात आपल्या बँकेतील खात्यातून समोरचाच्या बँक खात्यात हे पैसे जात-येत असतात.


मनाची मशागत करून त्यात उद्योजकीय संस्काराचे बीज पेरणारे नितीन साळकर यांचे 'उद्योजकीय मानसिकता' हे सदर वाचा 'स्मार्ट उद्योजक' मासिकात. मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://goo.gl/D3CmYr (Advt)

Smart Udyojak Subscription

Whatsapp पेमेंटबद्दल काही टिपा

 • इतर पेमेंट वॉलेट्सप्रमाणे WhatsApp मध्ये पैसे ठेवणे गरजेचे नाही.
 • आपल्याप्रमाणे समोरच्यानेही WhatsApp पेमेंट चालू करणे अनिवार्य आहे.
 • पैसे पाठवणे आणि स्वीकारणे सोपे असले तरी त्याचे गांभीर्य ठेवणे गरजेचे आहे. कारण आपले बँक खाते यात जोडलेले असते आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो.
 • आपले WhatsApp अद्ययावत असायला हवे. (अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी v2.18.41 किंवा अधिक आणि iOS वापरकर्त्यांसाठी v2.18.22 किंवा अधिक)

Whatsapp पेमेंट कसे चालू करावे?

 • आपले व्हाट्सऍप चॅट उघडून त्यात ‘attach’ (📎) वर जा.
 • त्यात सर्वात मधे आपल्याला ‘Payment’ नावाचा पर्याय दिसेल. –ADD IMAGE–
 • सध्या आपल्याला हे फीचर दिसत नसेल, याचा अर्थ आपल्याकडे अद्याप हे फीचर आलेले नाहे. काळजी करू नका लवकरच पुढील अपडेट्समध्ये आपल्या फोनमध्येसुद्धा हे फीचर येईल.
 • जर आपल्या ओळखीच्यांपैकी कुणाला हे फिचर दिसत असेल तर त्यांमार्फत आपण हे आपल्या फोन वर चालू करू शकता. त्यांनी त्यांचे पेमेंट फिचर चालू केले.
 • ‘Payment’ या पर्यायावर क्लिक करा.
 • बँक अकाउंट या नावाखाली add new account असा पर्याय असेल, तो निवडा.
 • सर्व नियम आणि अटी वाचा, आपल्याला त्या मान्य असतील तर Accept and Continue वर क्लिक करा.
 • त्यानंतर Verify via SMS वर क्लिक करा. याद्वारे आपल्याला एक SMS येईल आणि आपले अकाउंट पडताळले जाईल.
 • त्यापुढील स्क्रीनवरून आपले खाते ज्या बँकेत आहे ती बँक निवडा.
 • त्या बँकेतील ज्या ज्या अकाऊंटमध्ये आपला फोन नंबर नोंदविला असेल ती अकाउंट्स आपल्याला दिसतील. त्यातील आपल्याला हवे असलेले अकाउंट निवडा.
 • जर सर्व व्यवस्थित झाले असेल तर यानंतर आपल्याला UPI Setup Complete असे लिहून येईल.
 • एकाहून अधिक अकाउंट्स आपल्या WhatsApp ला जोडण्यासाठी याच पायऱ्यांचा पुन्हा प्रयोग करा.

Whatsapp पेमेंट कसे वापरावे?

WhatsApp पेमेंट वापरण्याकरिता आपल्याला ज्यांसोबत पैशांची देवाण-घेवाण करायची आहे त्याकडेसुद्धा ते चालू असायला लागते. त्यामुळे ही माहिती त्यांनाही पाठवून WhatsApp पेमेंट कसे सुरू करायचे हे त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा.

व्हाट्सऍप पेमेंट करण्याच्या पायऱ्या :

 • आपल्याला ज्यांना पैसे पाठवायचे असतील त्यांचा चॅट बॉक्स उघडा.
 • अँड्रॉइड वापरकर्त्यांनी त्यात ‘attach’ (📎) वर क्लिक करा आणि iOS धारकांनी प्लस बटनावर क्लिक करा.
 • त्यात सर्वात मधे आपल्याला ‘Payment’ नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 • त्यानंतर आपल्याला किती रक्कम पाठवायची आहे हे निवडा आणि त्यासोबत काही संदेश लिहायचा असल्यास तो सुद्धा ‘Note’ या पर्यायात लिहा.
 • पेमेंट पूर्ण करण्यासाठी आपला चार अंकी UPI पिन भरा.
 • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपण जी रक्कम पाठवलीत आणि जो मजकूर लिहिला तो मेसेज रूपात पाठवला जाईल.

अशा प्रकारे आयत्या वेळी पैसे पाठवणे, छोटीशी रक्कम पाठवणे अशा अनेक कामांसाठी WhatsApp पेमेंटचा वापर आता आपल्याला करता येणार आहे.


Smart Udyojak | e-Magazines | All Issues

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: