प्रगतिशील उद्योग

एखाद्या पदावर योग्य व्यक्तीची निवड कशी कराल?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


एका स्टार्टअपसमोर सर्वात मोठे आवाहन असते, योग्य पदासाठी योग्य व्यक्ती न मिळणं. याचं सर्वात मूळ कारण असतं फायनान्स अर्थात पैसे. एखाद्या कामासाठी उत्कृष्ट व्यक्ती आणायची तर त्यासाठी उत्तम पगारही द्यायला लागतो आणि ते एखाद्या स्टार्टअपसाठी कठीणच! मग आपल्या ओळखी-पाळखीतील कुणालातरी शोधून त्याला आपण कामावर ठेऊन घेतो.

त्याचा परिणाम? ज्या कामासाठी आपण त्याला ठेवले असते ते तर व्यवस्थित होतच नाही, शिवाय आपल्यालाही त्यातच लक्ष घालत बसावे लागते. या सर्व चक्रातून बाहेर पडून उत्तम प्रकारे काम करण्यासाठी व त्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करताना पुढील टिप्स नक्की लक्षात ठेवा :

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
 • आपल्याला आता एखाद्या व्यक्तीची जरी प्रत्यक्ष गरज नसेल तरी भविष्यात आपल्याला ज्या प्रकारच्या व्यक्तींची गरज लागणार आहे, त्यांच्याशी आतापासूनच चांगले संबंध निर्माण करणे सुरू करा.
 • व्यक्तीची निवड करण्याआधी नक्की कोणत्या कामासाठी आपल्याला त्या व्यक्तीची गरज आहे हे ओळखा.
 • त्यानंतर आपलं बजेट ठरवा; म्हणजे आपण समोरच्याला कामाच्या स्वरूपानुसार आणि त्या व्यक्तीच्या कौशल्यांनुसार जास्तीत जास्त किती पगार देऊ शकतो हे काढा.
 • हे काम सर्वोत्तम प्रकारे कोणत्या प्रकारची व्यक्ती करू शकेल हे लिहून काढा.
 • यावरून आपल्याला कोणते गुण असणारी व्यक्ती हवी आहे याची एक यादी तयार करा.
 • आता आपल्याला आपोआपच कळेल की आपल्याला कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना कामाबद्दल विचारायचे आहे.
 • त्यानंतर व्यक्ती शोधण्यापासून ते काम देण्यापर्यंत सर्वाची एक स्ट्रॅटेजी तयार करा.
 • आपला उद्योग कितीही छोटा असला तरी समोरच्या व्यक्तींचे शिक्षण, अनुभव आणि त्यांना आपल्यासोबत काम करण्याची का इच्छा आहे याबद्दलचे एक पत्र (CV/ Resume) त्यांकडून आधीच घेऊन ठेवा आणि ते जरूर वाचा.
 • प्रत्यक्ष मुलाखतीअगोदार त्यांच्याशी फोनवर बोला.
 • मुलाखतीत आपण नक्की कोणते प्रश्न विचारणार आहोत हे आधीच ठरवा.
 • आपल्या स्टार्टअपची खरी आणि स्पष्ट माहिती त्या व्यक्तींना द्या.
 • पाच वर्षांनंतर आपण आपल्याला कुठे पाहता? हा प्रश्न जरूर विचारा. यावरून आपल्याला कळेल की समोरच्याला किती प्रगती करायची आहे.

आपल्या व्यवसायानुसार यात काही कमी-अधिक होऊ शकते, परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की एखाद्या स्टार्टअपच्या यशाचे मूळ कारण हे त्याच्या टीमच्या उत्पादकतेवर, परिपक्वतेवरच अवलंबून असते. त्यामुळे योग्य व्यक्तींचीच निवड करा!

– शैवाली बर्वे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!