फेसबुक मार्केटिंग न चालण्याची प्रमुख कारणे

पहिले कारण : पुरेसे फॉलोअर्स नसणे

जेवढे जास्त फॉलोअर्स तेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकाल. निश्चित करा की, तुम्ही सगळ्या मित्रांना तुमचे बिसनेस पेज लाइक करण्यासाठी इन्व्हाइट करता आहात. तुमच्या वेबसाइटवर एक फेसबुक लाइकचे बटन असणे महत्त्वाचे आहे. फेसबुक पेजद्वारे आपल्या व्यवसायाची जाहिरात करणे व त्याला जास्त लाइक मिळवणे ही एक परिणामकारक आणि खर्चीक नसलेली पद्धत आहे.

दुसरे कारण : तुमच्या पोस्ट्स

अशा पोस्ट लोकांना आवडतात ज्या त्यांच्या उपयोगाच्या असतील, त्यांना हसवतील किंवा माहिती देतील. तुम्ही जर लोकांना जे वाचायचं ते नाही टाकलं तर ते तुम्हाला डिसलाइक करतील. फेसबुकवरील तुमच्या प्रत्येक पोस्टचा हेतू असला पाहिजे की, जास्तीत जास्त लाइक, शेअर व कमेंट मिळवणे. ज्या पोस्ट्स प्रसिद्ध असतात त्यामध्ये जोक्स, प्रेरणादायी गोष्टी, छान फोटो व व्हिडीयोचा समावेश असतो. तुम्ही ज्या काही गोष्टी शेअर कराल त्या तुमच्या व्यवसायाशी संबंधित असायलाच हव्या.

तुमच्या फेसबुक फ्रेंड्सना प्रश्न विचारून, पोल्स घेऊन व वेगवेगळे स्पर्धा घेऊन गुंतवून ठेवा. तुम्ही हे सगळे करूनसुद्धा तुमच्या फेसबुक मार्केटिंगचा उपयोग होत नसेल तर एखाद्या एजन्सीला तुमचे फेसबुक पेज हाताळण्यासाठी आऊटसोर्स करा.

तिसरे कारण : तुम्ही तुमचे प्रॉडक्ट किवा सर्व्हिस विकतच नाहीत

तुमचे फेसबुक पेज खूप प्रसिद्ध आहे आणि त्यातून तुम्हाला ROI (Return of investment) मिळत नाही, तर त्याचे कारण आहे की, तुम्ही विक्रीसाठी विचारतच नाही. चार ते पाच माहितीपर, विनोदी किंवा इतर पोस्ट्सनंतर एक पोस्ट्स तुमच्या प्रॉडक्ट किवा सर्व्हिसला अनुसरून टाका. त्या सेल्स पोस्टला तुमच्या वेबसाइटची लिंक द्या म्हणजे तुमच्या वेबसाइटच्या व्हिजिट्स वाढतील व त्यातून लोक तुमचे प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिस घेतील.

चौथे कारण : पेज इंसाइटसकडे दुर्लक्ष

फेसबुक इंसाइट नावाचे खूप छान टूल फेसबुकने, फेसबुक पेजवर कोण फॉलो करत आहे? कोण जास्त प्रतिसाद देतंय? ते मोजण्यासाठी बनवले आहे. ही सेवा फक्त पेजसाठी असून पर्सनल प्रोफाइलसाठी नाही. म्हणूनच तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करण्यासाठी तुमची पर्सनल प्रोफाइल न वापरता पेज वापरा.

एकदा का तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या नावाने फेसबुक पेज तयार केले, की कमीत कमीत तीस लाइक्स पूर्ण केल्यावर आपण इंसाइट्स बघू शकता. यात तुम्हाला कुठल्या क्षेत्रातून तुमचे पेज बघितले जाते, किती वयोगटातले लोक ते बघत आहेत, यातून तुम्हाला तुमचा टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोचताय की नाही हेसुद्धा पडताळता येते.

तुमच्या केलेल्या पोस्ट्सना किती लाइक्स मिळाल्या, किती शेअर झाले, किती कमेंट आल्या आणि ती पोस्ट किती लोकांपर्यंत पोहोचली हे समजते. यातून तुम्ही काय पोस्ट केले पाहिजे व कुठल्या वेळेस लोक बघतात या गोष्टींचे मोजमाप समजते. तुमच्या वेबसाइटला कुठल्या पोस्टमुळे जास्त ट्रॅफिक आले याचा अंदाज घेऊ शकता.

– निखील महाडेश्‍वर

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?