स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
माझे एक प्राध्यापक मित्र अमेरिकेतील विद्यापीठात काही ठरावीक जाती-पंथाचे लोक उदा. ज्यू, जैन, पारशी का यशस्वी व श्रीमंत असतात या विषयावर पीएच.डी. करत आहेत. एक मित्र व बिझनेस कन्सल्टंट म्हणून या पीएच.डी. कामासंदर्भात त्यांचे माझे बरेच बोलणे चालू असते.
माझ्या मित्राला हे काम करत असताना अमेरिकेतील विद्यापीठात काही रीसर्च पेपर हाती लागले, त्याचा सारांश सांगतोय. ज्यू लोक मुख्यत: इस्रायल, युरोप, अमेरिकेत ज्यू लोक आढळतात, जगाच्या लोकसंख्येच्या फक्त ०.२ टक्के एवढीच त्यांची संख्या आहे, पण जगाच्या ७० टक्के अर्थव्यवस्था, मीडिया, सैनिकी साहित्य इत्यादींवर त्यांची पकड आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
अमेरिकेत ज्यू हे राजकीयदृष्ट्या सर्वाधिक प्रभावी माणसे मानली जातात. जसे महाराष्ट्रात मराठा प्रभावी आहेत, तसे अमेरिकेत ज्यू: पण मराठा ३० टक्के आहेत. ज्यू फक्त ०.२ टक्के. एवढी कमी संख्या असूनसुद्धा एवढा मोठा प्रभाव आहे.
काही प्रसिद्ध ज्यू व्यक्तींची नावे बघा म्हणजे तुमच्या आपोआप लक्षात येईल. आइन्स्टाइन (शास्त्रज्ञ), लॅरी पेज व सेर्जे ब्रिन (गुगल संस्थापक), मार्क झकरबर्ग (फेसबुक संस्थापक), जॅकोब (जे. पी. मॉर्गन), रॉबर्ट (सिटी बँक संस्थापक), अडॉल्फ (न्यूयार्क टाइम्स), बिल गेट्स, (मायक्रोसॉफ्ट), जिमी (विकीपीडिया संस्थापक), मायकल (डीजनी कार्टून्स), स्टीव्ह स्पीलबर्ग (ज्यूरासिक पार्क), अल्बर्ट (ऑरेन ब्रदर्स), अमेरिकेतील एकूण अब्जाधीशांपैकी सुमारे ४८ टक्के अब्जाधीश ज्यू आहेत. एवढेच नव्हे तर जगातील ४० टक्क्यांहून अधिक पेटंट व नोबल पुरस्कार ज्यू लोकांच्या नावावर आहेत.
ज्यूंमधील वैशिष्ट्ये
१) शारीरिकदृष्ट्या सक्षम : वरील प्रत्येक व्यक्ती ही शरीराने धष्टपुष्ट आहे, उंची ६.२ सरासरीपेक्षा जास्त आहे, म्हणजे त्यांचा वंश, आईवडील त्यांचे लहानपणी संगोपन खूप चांगले झाले आहे, त्यामुळे त्यांचा मेंदू खूप विकसित झाला आहे, त्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक क्षमता खूप असते.
२) उच्च बुद्ध्यांक : ज्यू लोकांचा बुद्ध्यांक हा जगातील कोणत्याही जाती-धर्मातील लोकांपेक्षा जास्त असतो. जगातील सर्व लोकांचा विचार करता सरासरी बुद्ध्यांक ७९.१ टक्के आहे, तर ज्यू लोकांचा सरासरी बुद्ध्यांक ११५ आहे. ज्यूंचा बुद्ध्यांक जगातील इतर लोकांपेक्षा ४० टक्के अधिक आहे. ज्यू धर्मातील उच्चपदी असलेल्या लोकांचा बुद्ध्यांक १४० हून अधिक असतो. आपल्यातील एखाद्या पीएच.डी. प्राध्यापकाला जेवढे ज्ञान असते तेवढे ज्यू धर्मातील बारावीच्या विद्यार्थ्याला असते.
३) सर्वोच्चतेचा ध्यास : कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च पदवी व यश संपादन करण्याचा त्यांचा ध्यास असतो. एखाद्या गोष्टीला पूर्ण आयुष्य वाहून घेतात, त्यामुळेच हॉलीवूड चित्रपट, नोबल पुरस्कार, गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट हे त्यांनी बनवले.
४) जगाच्या पंचवीस वर्षे पुढे : हे लोक नेहमी जगाच्या पुढे २५ वर्षे चालत असतात. आपण स्वप्नातही विचार करत नाही अशा गोष्टींमध्ये हे लोक काम करत असतात.
५) नेटवर्क : ज्यू लोक व्यापारानिमित्त जगभर पसरले आहेत, त्यांचे एकमेकांत जबरदस्त नेटवर्क आहे, एकमेकांच्या मदतीने ते प्रचंड वेगाने जगावर अधिराज्य गाजवत आहेत.
६) नवजात शिशू : ज्यू धर्मात जन्मलेले बाळ हे सरासरी वजनापेक्षा जास्त असते, त्यांचा टाळू हा जन्मत:च पूर्ण भरलेला असतो. आपल्याकडे बाळ जन्मल्यानंतर कित्येक महिने बाळाचा टाळू भरण्यासाठी तेल घातले जाते, कारण आपल्याकडे गर्भवती महिलेचे चांगल्या प्रकारे मानसिक व शारीरिक संगोपन झालेले नसते व आपण यशवंत वंशाच्या दिव्याची अपेक्षा करतो.
७) विवाह चिंता नाही : ज्यू धर्मात तरुण-तरुणींना विवाहाची अजिबात चिंता नसते. आपल्या इच्छेनुसार ते केव्हाही व कोणत्याही आपल्या आवडीच्या व्यक्तीशी विवाह करू शकतात. त्यांच्या घरात मुलामुलींच्या विवाहाची चिंता व चर्चा अजिबात होत नाही. आपल्याकडे घरोघरी कामधंद्यापेक्षा विवाहाची चिंता जास्त आढळते.
८) सेल्फ रिस्पेक्ट : सेल्फ रिस्पेक्ट म्हणजेच स्वाभिमान, हा ज्यू धर्मामध्ये त्यांच्या धर्मसाहित्यात लिहिला आहे, त्यांच्यातील प्रत्येक व्यक्तीला तो असणे खूप महत्त्वाचे आहे. बालपणापासून स्वाभिमानाची भावना रुजल्यामुळे ज्यू लोक कुणाच्याही हाताखाली काम करत नाहीत. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी स्वत:चे कर्तृत्व करून दाखवतात.
९) सर्व ज्यू लोक शहरात राहतात : गेली शेकडो वर्षे जगातील सर्व ज्यू हे जगभरातील मोठ्या शहरात स्थलांतरित झालेत. शक्यतो एकही ज्यू खेड्यात राहत नाही, त्यामुळे त्यांना सर्व आधुनिक जीवन व संधीचा संपर्क ताबडतोब होतो.
१०) आवडेल ते करा : ज्यूंच्या मुलांना तुम्हाला आवडेल ते करा अशी मुभा असते. आपल्यासारखे तू इंजिनीयरिंग, मेडिकल, बी.एड. कर, अशी कुटुंबाकडून अपेक्षा नसते.
मी या विषयावर अधिक संशोधन करीत आहे. त्यांचे कोणकोणते गुण आपण घ्यायचे व कसे आपल्या आयुष्यात राबवून श्रीमंत व्हायचे, हा माझ्या लेखनाचा विषय असणार आहे. त्यांच्यातील १ टक्का गुण जर घेऊ शकलात तर सहज कोट्याधीश व्हाल.
– प्रकाश भोसले
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.