श्याम : काही होत नाही रे. आयुष्यात सर्व मजा करून घ्यायची. मरायचं तेव्हा मरणारच (सिगरेटचा धूर सोडता सोडता उदगार कानावर आले.)
राम : तू म्युच्युअल फंडबद्दल ऐकलं आहे का?
श्याम : हो ऐकलं आहे. नको रे बाबा ती भानगड. जॅम रिस्क असते त्यात. (धूर सोडता सोडता)
राम : तू माहिती घेतली आहेस का?
श्याम : माहिती काय करून घ्यायची त्यात रिस्क आहे हे स्पष्ट लिहिलेलं असतं. जाहिरातमध्ये ऐकत असतो तुला माहीत नाही का?
संवाद बराच वेळ सुरू होता. यातून काही गोष्टी लक्षात आल्या त्या पुढीलप्रमाणे :
१) पैसे म्हणजे सर्व नाही म्हणणारे दररोज चौदा ते सोळा तास त्यासाठी काम करत असतात व इतके करून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात.
२) आपल्या गुंतवणूकीला किमान महागाई दरापेक्षा एक टक्का तरी जास्त परतावा आला तर ती गुंतवणूक योग्य म्हणता येईल व ती भविष्यात किमान महागाईवर मात करेल.
३) गुंतवणूक केवळ कंटाळवाणा, वेळखाऊ प्रक्रिया म्हणून आपण टाळत असतो.
४) आता येऊ म्युच्युअल फंडकडे. “म्युच्युअल फंड मार्केट रिस्क के अधिन है।” इतकं ऐकून वरचे महाशय त्यामध्ये गुंतवणूक करत नाहीत. पण सिगारेट, दारू (टेन्शनवर उपाय), तंबाखू, गुटखा यापासून फायदा नाहीच उलट हे शरीराला हानिकारक हे माहीत असूनही त्याचा वापर अनेकदा होताना दिसतो.
५) म्युच्युअल फंडमधील रिस्क ओळखून मग त्यात गुंतवणूक करण कधीही उत्तम.
इतिहासात बघाल तर दीर्घकालावधी म्युच्युअल फंडनी उत्तम परतावा दिला आहे. तो नेहमीच तसा देईल याची खात्री नाही हे जरी खरे असले तरीही सुज्ञ गुंतवणूकदार हा गुंतवणूक पर्याय का योग्य ते जाणतात.
म्युच्युअल फंडमधील काही खुबी आपण पाहूया :
१) विविधता :- म्युच्युअल फंड अनेक शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतात. नुसतेच शेअर नाहीत तर त्यातील वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्यामुळे जोखीम कमी होते. (१ शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये केल्यास अनेक प्रकारचे शेअर युनिटमार्फत आपल्या स्कीममध्ये येतात.)
२) कमी गुंतवणूक : म्युच्युअल फंडमध्ये अगदी तुम्ही १०० ही गुंतवणूक करू शकता.
३) गुंतवणूकदारांत भेदभाव नाही : तुमची गुंतवणूक १०० असो की १०० करोड परतावा हा सर्वांना सारखाच.
४) तज्ज्ञ व्यक्ती : फंड मॅनेजर जे म्युच्युअल फंड हाताळतात, ते शेअर मार्केटमधील तज्ज्ञ असतात. त्यांची टीम त्याना या कामासाठी मदत करत असते.
५) तरलता : म्युच्युअल फंडमध्ये समजा तुम्ही १० हजार रुपये गुंतवणूक केलेत व तुम्हला आता पाचशेची गरज आहे तर तुम्ही काढू शकता, कितीही वेळा, व कितीही रक्कम त्याला बंधन नाही (ELSS/CLOSE ENDED स्कीम सोडून) फक्त त्यावर येणारा टॅक्स, EXIT LOAD ची माहिती करून घ्या, पण तरलता सर्वात जास्त.
६) पारदर्शकता : म्युच्युअल फंड कुठल्या शेअरमध्ये गुंतवणूक करते, त्याचे प्रमाण किती हे सर्व जाहीर करत असते ऋरलीींहशशीं मध्ये याची सर्व माहिती असते.
७) सुरक्षितता : गुंतवणूकदारांचे हित व फसवणूक टाळण्यासाठी सेबी, AMFI सारख्या संस्था यावर लक्ष ठेवून असतात त्यामुळे ही गुंतवणूक सुरक्षित असते.
८) करप्रणाली : म्युच्युअल फंडमध्ये असणारी करप्रणाली ही सुटसुटीत व किफायतशीर असते.
म्युच्युअल फंड इतके चांगले आहेत तर अजून तुमच्यापर्यत का नाही पोहचले? बाकी गुंतवणूक पर्यायाबाबत अनेक जण माहिती देताना आढळतात. फोन करत असतात मग म्युच्युअल फंडबद्दल असे का नाही? विचार करून बघा लक्षात येईलच तुमच्या.
धूम्रपान हानिकारक असूनही त्याचे सेवन करता, पण म्युच्युअल फंड गुंतवणूक पर्यायामध्ये सर्व पर्यायात उजव असूनही ‘रिस्क’ शब्द पकडून त्याकडे दुर्लक्ष करता. असे का?
– दीपक जोशी
9967072125
(लेखक म्युच्युअल फंड वितरक आहेत)
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.