Advertisement
संपत्ती निर्माण

तुमची गुंतवणूक तुमच्या वारसांना सहजरीत्या मिळेल का?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


हे जाऊन आज सात महिने झाले रोज कसली कसली गुंतवणुकीबद्दल पत्र येत असतात. नक्की कुठे काय गुंतवणूक केली आहे कळायला मार्ग नाही. त्या पत्रांवर काही ठिकाणी मोबाइल नंबर चुकीचा आहे तर काही ठिकाणी ई-मेल आयडी.

काही ठिकणी नॉमिनीच ठेवला नाही. काहीच कळायला मार्ग नाही. आलेल्या पत्रावरून इतकंच कळतं की यांनी प्रामाणिकपणे पैसे कमवून ते वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले आहेत, पण आम्हाला त्याबद्दल काहीच सांगितले नाही.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

गुंतवणूक क्षेत्रात असल्याने असे अनुभव वारंवार येत असतात. माझ्या गुंतवणुकदारांना पहिल्यापासून खालील सवयी लावल्याने मी नसलो तरी त्यांचे काही काम अडणार नाही व त्याच्या पाठीमागे वारसांना त्याची गुंतवणूक सहज प्राप्त होईल.

१) गुंतवणूक करताना योग्य व्यक्तीकडून माहिती करून गुंतवणूक करा. ट्रेनमधील मित्र, शेजारचे काका, ऑफिसमधील सहकारी गुंतवणूक क्षेत्रातील असतील तर ठीक नाही तर योग्य मार्गदर्शक, तज्ज्ञ व्यक्तीचाच सल्ला घ्या.

२) नोंद ठेवणे : आपण जे काही करतो त्याची नोंदणी आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या पश्‍चात वारसांना ते सहज सापडेल. म्युच्युअल फंडचे फॉलिओ नंबर, पॉलिसी नंबर, जीएसटी नंबर, पीपीएफ नंबर, लायसन्स इत्यादी.

३) सध्या ऑनलाइनचा जमाना असल्याने सर्व ठिकाणी आपला मोबाईल नंबर, ई-मेल आयडी योग्य आहे का याची खात्री करा. हे ठीक असेल तर अनेक काम आज चुटशीसरशाी होतात. तेव्हा याची काळजी घ्या. मोबाइल नंबर, ई-मेल आयडी बदलला तर त्वरीत तसे बदल करून घ्या.

४) बँक खाते : अनेक वेळा बँकेमध्ये काही बदल होतात. काही बँका बंदही होतात. अशा वेळी तुमच्या गुंतवणुकीमध्ये नवीन बँकेची नोंद न चुकता करा; जेणेकरून पैसे काढताना अडचण येणार नाही.

५) शक्यतो एकट्याच्या नावाने कुठलेही आर्थिक व्यवहार टाळा. गुंतवणूक ही शक्यतो दोघांच्या नावे असावी. नॉमिनेशन आवश्यकच आहे.

६) गुंतवणुकीविषयी माहिती ही मुलांना त्यांच्या भाषेत कळेल त्याप्रमाणे सांगायचा प्रयत्न करा. त्याना बँकेत, पोस्ट ऑफिसमध्ये जाल तेव्हा घेऊन जा. काही गमती सांगून बचत कशी आवश्यक ये शिकवा.

७) मेडिक्लेम, टर्म प्लॅन याची देय तारीख कधीही चुकवू नका. भले आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस विसरा, पण कॅलेंडर आले की पहिले याची नोंद करून ठेवा.

८) मृत्यपत्र : आपल्याकडे मृत्यपत्र विषय काढला की मी काय इतक्यात मरणार आहे का? हा प्रश्न येतो. वारसांमध्येही काही तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे खरच तुम्हाला तुमच्या वारसांना तुमची गुंतवणूक, संपत्ती मिळवी असे वाटत असेल तर योग्य सल्लागार व्यक्तीकडून करून घ्या. (बरेच वेळा वारसदार व गुंतवणूकदार नाव – नात्यात तांत्रिक अडचण येत असते.)

तर अशाप्रकारे आपण योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हे सर्व केले तर आपल्या पश्‍चात आपल्या वारसांना आपण सोप्या पद्धतीने त्याचे अधिकार प्राप्त करून देऊ शकतो. जीवंतपणी जीवाच रान करून कमवलेले करोडो रुपये योग्य काळजी न घेतल्याने वारसांना मिळणे कष्टपद होते.

हे सर्व सांगूनाही ९० टक्के लोक या गोष्टी करत नाहीत, दुर्लक्ष करतात. का ते माहीत नाही, पण तुम्हाला या गोष्टींचा त्रास तुमच्या पुढच्या पिढीला होऊ नये आजच कामाला लागा.

– दीपक जोशी
संपर्क : 9967072125
(लेखक म्युच्युअल फंड वितरक आहेत.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!