स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
‘देशाच्या विकासात महिला उद्योजकांचं योगदान’, याचा विचार केला तर आता आतापर्यंत भारतीय ‘स्त्री’च्या उपजत कलागुणांना म्हणावा तसा वाव मिळालेला नाही. त्यामुळे भारतीय स्त्री ही काही काळापर्यंत ‘चूल आणि मूल’ यातच अडकून पडली होती. पण मागील काही दशकांचा ढांडोळा घेतला तर असं लक्षात येतं की भारतीय महिलांचं उद्योगविश्वात तसंच आर्थिक सक्षमीकरणाच्या जगात स्वतंत्र स्थान निर्माण झालंय.
इतर आणि आपल्या देशातील महिला उद्योजक यांचा तुलनात्मकदृ्ष्ट्या अभ्यास केला तर लक्षात येतं की आपल्याकडील महिला उद्योजक इतर देशांशी तुलना करता मागे आहेत. त्याची काही कारणही आहेत. आत्मविश्वासाची कमी, व्यावसायिक धोके, सामाजिक-सांस्कृतिक, पारंपारिक विचार पाळणारी संस्कृती अशा अनेक गोष्टींशी भारतीय स्त्री सतत दोन हात करत असते.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
थोड्याफार फरकाने प्रत्येक उद्योजकाला अशा गोष्टींचा सतत सामना करावाच लागतो, त्यामुळे अशा गोष्टींकडे थोडे दुर्लक्ष करून नव्या उमेदिने उद्योगजगतात येऊ पाहणाऱ्यांनी आणि काही काळ व्यवसायात स्थिरावलेल्यांनीही काही गोष्टींकडे डोळसपणे पाहावे आणि नानाविध गोष्टींचा सतत अभ्यास करून व्यवसायाची गणित आखावीत. जेणेकरून भविष्यातील व्यावसायिक अडचणी थोड्या कमी होतील.
महिला उद्योजकांचा विचार केला तर घर आणि समाज यांच्या विकासाला पोषक वातावरण देण्याकडे त्यांचा जास्त कल असतो असे दिसून येते. व्यवसाय करणाऱ्या महिला या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात हे महत्त्वाचं आहे. इंटिरिअर डिझायनर, गार्मेंट, फॅशन डिझायनर, ब्युटी इंडस्ट्री अशा अनेक क्षेत्रात आज महिला उद्योजक आघाडीवर दिसतात.
या गोष्टींकडे महिलांनी कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे
स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करा : आपल्या कलागुणांवर विश्वास ठेवायला शिका. भारतीय स्त्री स्वत:वर विश्वास ठेवण्यात कमी पडते. समोर येणाऱ्या आव्हानांना बेधडक सामोरे जा.
घर आणि व्यवसाय यांच्यात ताळमेळ साधा : घर आणि व्यवसाय सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच. पण म्हणून आपल्या व्यावसायिक करिअरकडे डोळेझाक करू नका. आपल्याकडे घर आणि करिअर याकडे पाहतांना स्त्रियांचा ओढा घराकडे जास्त असतो. अशावेळी दोन्ही गोष्टींची योग्य ती सांगड घालून वेळेचे नियोजन करा.
स्वत:च स्वत:ची प्रेरणा व्हा : उत्तम आणि यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर आपला दृष्टिकोन सकारात्मक करा. स्वत:च स्वत:ला सतत motivate करा.
वेगवेगळ्या सरकारी योजनांचा अभ्यास करून त्या समजून घ्या. त्यांच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाला काही मदत होत असल्यास त्याचा फायदा जरूर घ्या.
आपण ज्या व्यवसायात उतरू इच्छिता अथवा ज्या व्यवसायात आहात त्या व्यवसायाचा, त्याच्या मार्केटचा नीट अभ्यास करा. त्यातील अडचणी, अडथळे समजून घ्या. व्यावसायिक धोके कमी करण्यासाठी आपल्याला त्याची मदतच होईल.
आर्थिक साहाय्य करणाऱ्या संस्था, त्यासाठी लागणारी कागदपत्रे आदी गोष्टींचा अभ्यास उत्तम व्यवसायाची सुरुवात करण्यास साहाय्यक ठरेल. व्यवसायाच्या व्यवस्थापनाकडेही काटेकोर लक्ष द्या. यामध्ये अधिक प्रशिक्षणासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, त्यांचाही विचार करा. आपल्याकडे विविध ठिकाणी वर्कशॉप होत असतात.
ट्रेनिंग प्रोग्रॅमही भरवले जातात. त्यात सहभागी व्हा. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उद्योजकांची अशा कार्यक्रमांतून भेट होते. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेताना सतत आशावादी, प्रयत्नवादी, दिशादर्शक आणि यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायक मानसिकतेची आपल्याला जणू येथे भेटच मिळते.
जास्तीत जास्त महिला उद्योजक घडण्याची आपल्या देशाची आणि पर्यायाने आपल्या समाजाची गरज आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी व्यवसायाकडे वळण्याची आवश्यकता आहे.
– प्रतिभा राजपूत
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.