सध्या १०५ कोटींची गुंतवणूक मॅनेज करत आहेत ‘क्रेस्टा वेल्थ’चे योगेश पिंगळे

Udyojak yogesh pingle pune

आपल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे? आपली आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी गुंतवणूक करताना कोणते पर्याय निवडावेत? गुंतवतणूक करताना जोखीम कुठे कमी असेल? असे अनेक प्रश्न योग्य मार्गाने पैसा कमावणार्‍या प्रत्येकापुढे असतात.

त्यातच सोशल मीडियामधून माहितीचा मारा सतत सुरू असतो. यातले नेमके काय घ्यावे या विचारांनी गुंतवणूकदार गोंधळून जातात. अशा वेळी ‘पैशांचा डॉक्टर’ म्हणजेच गुंतवणूक सल्लागार आणि मुख्यत्वे सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आपल्याला योग्य मदत करू शकतो.

‘क्रेस्टा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड’ ही पुण्यातील इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट करणारी एक विश्वासार्ह कंपनी आहे. योगेश पिंगळे हे तिचे संस्थापक आहेत. ते मागील सोळा वर्षांपासून या क्षेत्रात आहेत. सुरुवातीला त्यांनी इक्विटी सल्लागार म्हणून काम सुरू केले. हे करत असताना लोक फक्त शेअर्समध्ये किंवा ट्रेडिंगसाठी पैसे गुंतवत होते.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

आपल्या ग्राहकांची गुंतवणूक ही वेगवेगळ्या पर्यायांत व्हायला हवी आणि ती अधिक चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी त्यांनी २०१५ साली सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनिंग (सीएफपी) हा कोर्स केला आणि गुंतवणूक सल्लागार म्हणून कामाला सुरुवात केली.

योगेश यांचे शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये झाले आहे. शिक्षण चालू असतानाच त्यांना पैशांच्या व्यवस्थापनाची गोडी निर्माण झाली. आपण पैशांचे योग्य नियोजन करू शकतो व त्याची गुंतवणूकही योग्य ठिकाणी करू शकतो याची त्यांना जाणीव झाली.

बर्‍याचदा लोकांना कळतच नाही की आपला पैसा कुठे गुंतवावा त्यामुळे लोकं चुकीचे पर्याय निवडतात. अनेक लोकांमध्ये गुंतवणुकीविषयी अज्ञान असते. बरेच लोक गुंतवणूक करून फसतात. या सगळ्या गोष्टी योगेश यांनी शिक्षण चालू असताना जवळून पाहिल्या, अभ्यासल्या होत्या.

त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून लोकांना मदत करू शकतो. मग पैशांचे व्यवस्थापन हे योगेश यांचे पॅशन झाले. यातूनच मग शिक्षण संपताच २००८ साली त्यांनी लगेच या क्षेत्रात कामाला सुरुवात केली.

योगेश म्हणतात, ज्या वेळेस एखादी व्यक्ती किंवा कुटुंब आमच्याकडे गुंवणूकीचे मार्गदर्शन घ्यायला येते त्या वेळेस आम्ही त्यांना अमुक अमुक प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक करा, असा सल्ला देत नाही. सर्वप्रथम त्या व्यक्तीचे उत्पन्न, खर्च, संपत्ती, कर्ज या सर्वांची माहिती घेतो.

त्यांचे शॉर्ट टर्म गोल्स जसे की घर किंवा गाडी खरेदी आणि लाँग टर्म गोल्स उदा. मुलांचे शिक्षण, निवृत्ती इ. या सर्वांसाठी पैसे किती आणि कुठे गुंतवावेत, टॅक्स आणि विमा या सर्व बाबींवर सखोल अभ्यास करून एक फायनान्शिअल ब्लू प्रिंट तयार केली जाते.

त्या फॅमिलीची गुंतवणूक ही म्युच्युअल फंड, एनएसपी, पीपीएफ, सुकन्या समृद्धी, सोने, बँक ठेवी इ. पर्यायांत त्यांचे गोल्स आणि रिस्क प्रोफाईलनुसार सुचवली जाते. आपल्या ग्राहकांना कुठलेही प्रॉडक्ट्स विकण्याची भूमिका न ठेवता त्यांना योग्य इन्व्हेस्टमेंट सॉल्युशन्स देण्याचा आमचा भर असतो. अशा प्रकारे प्लांनिंग करून इन्व्हेस्टमेंट सुरू होते त्या वेळेस गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढलेला असतो.

ग्राहकाचा ‘विश्वास’ ही या व्यवसायातील महत्त्वाची बाब आहे. लोकांचा विश्वास निर्माण व्हायला वेळ लागतो, पण एकदा विश्वास बसला की लोक त्यांचे आर्थिक व्यवस्थापन आमच्याकडे सोपवतात. यातूनच माउथ पब्लिसिटी होते आणि एकातून दुसरा असा कस्टमर बेस वाढत जातो.

ग्राहकांशी दृढ नाते तयार होते. या सगळ्याला वेळ द्यावा लागतो. योगेश यांनी हा विश्वास संपादन केला. ज्या फंडस्मध्ये मी गुंतवणूक करतो त्याच पर्यायात मी ग्राहकांचे पैसे गुंतवतो. त्यामुळे गुंतवणुकदाराचा विश्वास वाढतो आणि ते आमच्याशी दीर्घ काळासाठी जोडले जातात, हे पिंगळे आवर्जून नमूद करतात.

हळूहळू रेफरन्स वाढत जाऊन व्यवसायात त्यांचा जम बसला. आज स्वत:सोबत सहा जणांची टीम त्यांच्यासोबत काम करतेय. पुण्यात बाणेर येथे त्यांचे ऑफिस आहे. ‘क्रेस्टा वेल्थ’ सध्या ७५० हून अधिक ग्राहकांचे इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट करते आहे. वर उल्लेख केलेल्या विविध ध्येयांसाठी हे ग्राहक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला १.१० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत.

आता ‘क्रेस्टा वेल्थ’ म्युच्युअल फंडमध्ये या गुंतवणूकदारांचे १०५ कोटी रुपयांचे व्यवस्थापन करत आहे. ही गुंतवणूक २०३० पर्यंत १ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे त्यांचे ध्येय आहे. तर २०३८ पर्यंत हा आकडा ५ हजार कोटींवर न्यायचा त्यांचा मानस आहे. यासाठी कमीत कमी ५ हजार कुटुंबांपर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे योगेश पिंगळे यांनी सांगितले. आमच्या ग्राहकांसोबत मीदेखील माझे आर्थिक स्वातंत्र्य मिळवेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोनानंतर लोक गुंतवणुकीविषयी जास्त जागरूक झालेत. गुंतवणुकीसाठी ते नवनवे मार्ग शोधत आहेत. या विषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणारी माहिती बर्‍याचदा संभ्रमित करणारी असते. अनेकवेळा त्यांची दिशाभूल होते. मग यातून वेगवेगळ्या गोष्टी संदर्भात चुकीची मत तयार होतात आणि ग्राहक गुंतवणुकीत फसतो किंवा गुंतवणुकीपासून दूर जातो.

अशा वेळी गुंतवणूक सल्लागार हाच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. सर्वसामान्य ग्राहकाने हे ओळखून सर्टिफाइड फायनान्शिल प्लॅनरचा सल्ला घ्यायला हवा. यासाठी ‘क्रेस्टा वेल्थ’ नियमितपणे जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करते. कुटुंबाची भक्कम साथ, ग्राहकांचा विश्वास आणि भविष्यातील ध्येय यातून ‘क्रेस्टा वेल्थ’ची वाटचाल चालू आहे.

संपर्क : योगेश पिंगळे – 95884 15845

Author

  • यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?