उद्योजक सूची उद्योजकता विकास

Soft Skills मध्ये कच्चे राहिल्याने अनेक ग्रामीण, निमशहरी तरुण राहतात मागे : झाकी हुसेन

'स्मार्ट उद्योजक' मासिक वर्षभरासाठी घरपोच मागवून वाचा फक्त रु. ५०० मध्ये!

आजच वर्गणीदार व्हा! https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

परिचय :

  • जन्म दिनांक : १३ एप्रिल, १९८७
  • जन्म ठिकाण : कोल्हापूर
  • ई-मेल : zakiaur@gmail.com
  • भ्रमणध्वनी : ९५९५९०७८४७
  • विद्यमान जिल्हा : कोल्हापूर
  • शिक्षण : MPharm, PDCR
  • फेसबुक अकाऊंटची लिंक : https://www.facebook.com/AZed-Skill-Training-Education-1494587270860617/
  • कंपनीचे नाव : AZed Consultancy
  • उत्पादने/सेवा: Soft Skill Development, Life Skills, Corporate Etiquettes, Communication Skills Teaching & Training

माझं नाव झाकी हुसैन. AZed Consultancy चा संस्थापक. ज्यात विद्यार्थी वर्गाला स्वानुभूती कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जातं.

मी स्वतः आठ वर्ष फार्मसी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. त्यातील पाच वर्षे प्रशिक्षण विभागात व त्याचबरोबर जवळपास एक वर्ष प्रभारी प्राचार्य म्हणूनही महाविद्यालयाचा कार्यभार सांभाळला. इतक्या वर्षांत मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, आपल्या ग्रामीण, निम-ग्रामीण किंवा निमशहरी भागातील विद्यार्थी हा तांत्रिक कौशल्यामध्ये अव्वल असूनही Soft Skills म्हणजेच स्वानुभूती कौशल्यात कमी पडत असल्यामुळे त्याला चांगली नोकरी, प्रकल्प किंवा व्यवसाय सुरू करताना असंख्य अडचणीत येतात. असा वंचित विद्यार्थी वर्ग खूप मोठा आहे, मग पूर्ण वेळ यासाठी देऊन, AZed Consultancy ची स्थापना केली.

Advertisement

एवढ्या वर्षांत, मी खूप विद्यार्थ्यांना याबद्दल प्रशिक्षण दिलं व नुकतेच ते सर्व अनुभव एका अहवालाच्या रूपात पंतप्रधान, मुख्यमंत्री व कौशल्य विकास मंत्री यांना पोच केली आहे. यात मी हे अधोरेखित केले आहे, की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही समान संधी, योग्य प्रशिक्षण दिल्यास तेही उत्तम कर्मचारी किंवा उद्योजक बनू शकतात. शेवटी कौशल्य एक अशी गोष्ट आहे जी सरावाने यशस्वीपणे बिंबवता येते. यासाठी लागेल फक्त दृढ इच्छाशक्ती. कॉर्पोरेट वर्तुळात आज अशा प्रशिक्षणावर खूप वेळ खर्च होत असल्यामुळे, महाविद्यालयीन काळातच यासाठी कष्ट घेतल्यास, उत्तम नोकरी मिळण्यास भरपूर वाव मिळतो आणि उद्योजकता वाढवण्यास ही मदत होते.

प्रशिक्षित विद्यार्थी असतील, तर महाविद्यालयाला ही NAAC / NBA / ISO मानांकनमध्ये उच्च गुणांक प्राप्त होऊ शकतील. एकूणच, शिक्षणाचा दर्जा सध्या आहे त्यापेक्षा ही जास्त सुधारता येईल आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे, कुठेही थांबा घेता कामा नये.

व्यक्तिमत्व विकासाच्या नावाखाली पुण्या-मुंबईला जाऊन, नंतर हजारो रुपये आपलेच विद्यार्थी खर्च करतात आणि योग्य परिणाम न मिळाल्यामुळे हताश होतात. ज्या मातीतील विद्यार्थी, त्याच भाषेतील प्रशिक्षण त्यांना समजता येईल. या अनुषंगाने, अत्यंत माफक शुल्कात त्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रामाणिक ध्यास मी घेतला आहे.

आपलीही कथा महाराष्ट्रातील लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकता ‘स्मार्ट उद्योजक :: महाराष्ट्र उद्योजक सूची’च्या माध्यमातून.

Help-Desk
%d bloggers like this: