Advertisement
उद्योगोपयोगी

झिरो बजेट मार्केटिंग

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


सध्याच्या युगात कोणताही व्यवसाय सुरू करणं खूप सोपं झालंय, पण त्या व्यवसायात टिकून राहणं खूप कठीण आहे. या स्पर्धात्मक युगात आपला बाजारवाटा मिळवणं ही खरी परीक्षा आहे. बरेच नवीन व्यवसाय यात अपयशी होतात आणि याचं मुख्य कारण योग्य मार्केटिंगचा अभाव.

बऱ्याच उद्योजकांचा असाच समज आहे की मार्केटिंग करायची तर भरपूर पैसे हवे. खरं तर मार्केटिंगचे बरेचसे पर्याय हे तुमचा एकही पैसा खर्च न करता करण्यासारखे आहेत. आपल्या व्यवसायाची योग्य मार्केटिंग करण्यासाठी प्रथम मार्केटिंग म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. अशी कोणतीही कृती ज्यामुळे आपल्या वस्तू किंवा सेवा यांचा प्रचार आणि प्रसार संभाव्य ग्राहकांपर्यंत होतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

झिरो बजेट मार्केटिंगचा प्रभावी पर्याय म्हणजे मानवी स्नेहसंबंध (PR)

हा पर्याय खूप जुना असला तरी आजही खूप प्रभावी आहे. तुम्हाला जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहायला हवं. यातील काही लोक स्वतःच तुमचे ग्राहक होतील, तर काही तुमच्या व्यवसायाचा प्रचार करून तुम्हाला ग्राहक मिळवून देतील. या लोकांची यादी दर दिवसाला वाढवायला हवी आणि यासाठी सतत नवीन लोकांना भेटायला हवं.

लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत तुमच्या व्यवसायाची जाहिरात होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या व्यवसायातल्या नवीन सेवा किंवा वस्तू, व्यवसायात मिळालेलं यश, ग्राहकांचा किंवा उलाढालीचा ठराविक टप्पा पार केला, तुमच्या वस्तू किंवा सेवा यामुळे तुमच्या ग्राहकांना झालेला फायदा अशी वेगवेगळी माहिती तुम्ही पाठवू शकता.

ही माहिती पोहोचवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू शकता. अशाही लोकांचा समूह करता येऊ शकतो, जे तुमच्या वस्तू किंवा सेवांचा प्रचार करतील आणि तुम्हाला त्यांना योग्य तो मोबदला द्यावा लागेल; तोही तुम्हाला ग्राहक मिळाल्यानंतर.

ज्या इतर व्यवसायांचे ग्राहक जे तुमचेही ग्राहक असू शकतात, अशा व्यावसायिकांसोबत तुम्ही संयुक्तिकपणे तुम्ही मार्केटिंग करू शकता. हे आणि असे इतर बरेच मार्केटिंगचे पर्याय आहेत, ज्यामध्ये तुमचा खर्च हा शून्य असेल. तुमचा व्यवसाय कोणता, कुठे, किती मोठा आणि सर्वात महत्त्वाचे तुमचा ग्राहक कोण हे ठरल्यानंतर मार्केटिंग करणे सोपे आहे.

– अमोल पुंडे
(लेखक मार्केटिंग सल्लागार आहेत.)
98200 17174

स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!