स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
एका खेडेगावातून येऊन या धावत्या पुण्यात व्यवसायाला सुरुवात केली. हातावरील रेषेत भाग्य न शोधता कपाळावरील घामात भविष्य शोधण्यासाठी उद्योजक वैभव अमृत पाटील यांचा प्रवास सांगली शिरढोण ते पुणे व्हाया रायपूर छत्तीसगड, क्लर्क ते सिक्युरिटी कंपनीचा मालक असा झाला.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
वैभव यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात ग्रामीण भागात झाला. आजोबा गावचे पोलीस पाटील आणि वडील एसटी ड्रायव्हर होते. आईचे शिक्षण नसतानाही मुलांना शिकवण्याची तिची तळमळ होती. तसा लहानपणीचा काळ थोडा हलाखीचा गेला. माध्यमिक शिक्षणात लक्ष कमी खेळाकडे जास्त असे.
आर्मीत जाण्याचे आणि सैन्याचा गणवेश चढवण्याचे खूप वेड होते; पण तिथेही अपयश, म्हणून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. यामध्ये एमबीए आणि एम. कॉम अशा पदव्या संपादित केल्या. यानंतर ध्येय निश्चित केले आणि पाच वर्षाच्या कालावधीत जॉब करत जयप्रकाश असोसिएट्स या नावाने इलेक्ट्रिकल कंत्राट घेतले येथे कंत्राटी पद्धतीत काम करत होतो.
काम करत असताना तेथेच सर्व विभागातील ज्ञान आत्मसात केले या अनुभवानंतर ‘यशराज बिझनेस ग्रुप’ या नावाखाली ‘यशराज सिक्युरिटी सर्विस’ आणि ‘यशराज मल्टी सर्विस’ या नावाने कंपनी चालू केली. यात सुरुवातीला खूप अडचणी, अपयश आले, परंतु न डगमगता यशाचा जप कायम ठेवला. या सर्व प्रवासात कुटुंबाने आणि मार्गदर्शकांनी मोलाची साथ दिली. त्यात शिक्षणही कामी आले.
आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे या गोष्टीने झपाटले होते. यशराज बिझनेस ग्रुप यशस्वीरीत्या कार्यरत आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रभर काम वाढवायचे आहे. पुढे खूप काही करायचे आहे, पुढे यश खुणावत आहे.
वैभव अमृत पाटील
व्यवसायाचे नाव : यशराज सिक्युरिटी सर्व्हिस अॅण्ड प्लेसमेंट सर्व्हिस
उत्पादने व सेवा : सिक्युरिटी गार्ड सर्व्हिसेस, ऑल प्लेसमेंट सर्व्हिसेस, फॅसिलिटी मॅनेजमेंट, हाऊस किपिंग, कॉन्ट्रॅक्ट स्टाफिंग, लेबर सप्लाई
कार्यक्षेत्र : संपूर्ण महाराष्ट्र
पूर्ण पत्ता : पाण्याच्या टाकीमागे, शिरढोण, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली 416419.
शाखा 32/1, बी-8, मेट्रो हॉस्पिटल वळ, राहतणी, काळेवाडी फाटा, पुणे 411017.
संपर्क : 9922026107, 09370206241
ई-मेल : yashraj.s87@yahoo.com / hr.yashrajsp@gmail.com
संकेतस्थळ : yashrajsecurityserviceandplacementservice.business.site
फेसबुक : fb.com/Vaibhav.Patil.967
स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.