व्यवसाय सुरू करताना तरुण उद्योजकांनी या ६ गोष्टींची काळजी घ्यायला हवी


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


तरुण वयात व्यावसायिक बीज रोवली गेली, तर त्याचे दीर्घकालीन फायदे खूप होतात. कारण या वयात सुरू केलेले व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. मात्र तरुण वयात व्यवसाय करताना काही गोष्टींची कटाक्षाने काळजी घ्यावी लागते. अशा सहा महत्त्वाच्या गोष्टी खाली देत आहोत.

१. तुमची व्यवसाय कल्पना व्यवहार्य आहे का?

जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करता तेव्हा तुम्हाला तो यशस्वी व्हावा असे वाटत असते. तथापि, नवोद्योजकांसाठी किंवा कोणत्याही वयात अव्यवहार्य कल्पनेवर आधारित व्यवसाय यशस्वी होणे महत कठीण गोष्ट आहे.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात एखादी नवसंकल्पना किती यशस्वी होऊ शकते याचे आडाखे बांधणे कठीण नाही. त्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या यशाच्या शक्यता वाढवण्यासाठी, उत्पादन / सेवेच्या निर्मितीपासून ते मार्केटिंगपर्यंत माहिती करून त्याप्रकारे व्यावसायिक कल्पना निवडा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

२. तुमचा ग्राहक कोण आहे आणि त्यांना कशाची गरज आहे हे ओळखा.

एकदा तुम्ही कल्पना निश्चित केल्यानंतर व्यवसायानुसार तुम्हाला हे उत्पादन कोणाला विकायचे आहे किंवा तुमची सेवा वापरायची आहे हे शोधून काढणे आवश्यक आहे. यासाठी स्वत:ला काही प्रश्न विचारा. जसे की तुमचा व्यवसाय तुमच्या ग्राहकाची कोणती समस्या सोडवत आहे?

तुमच्या संभाव्य ग्राहकांच्या आवडी आणि नापसंती काय आहेत? तुमचा संभाव्य ग्राहक तुम्ही देत ​​असलेल्या उत्पादन/सेवा शोधण्याची शक्यता कुठे आहे? ही एक प्रारंभिक पायरी आहे असे समजा. यावर अधिक संशोधन करू शकता आणि ग्राहक प्रोफाइल तयार करू शकता.

३. कायदेशीर बाबी समजून घेणे

अमेरिकेसारख्या देशात तुमचे वय कितीही असले तरीही पैसे कमवणार्‍या प्रत्येक व्यवसायिकाने कायदेशीर बाबींचे पालन करावेच लागते. किशोरवयीन आहात आणि नवोद्योग सुरू करताय म्हणून प्रथम कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात. यासाठी तुम्हाला परवानग्या आणि कागदपत्रे मिळणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही ग्राहकांना विक्री किंवा सेवा सुरू करू शकता.

४. तुमचा युनिक सेलिंग पॉइंट (USP) शोधा

आता तुम्हाला तुमचे उत्पादन/सेवा काय आहे आणि तुमचा ग्राहक कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे, पण तुमचे ग्राहक तुमच्याकडून का खरेदी करतील, तुम्हाला का निवडतील हे शोधून काढणे आवश्यक आहे. हा तुमचा युनिक सेलिंग पॉइंट (USP) आहे.

तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूपच कमी किमतीत उत्पादन/सेवा देत आहात? तुम्ही असा अनुभव देत आहात, जो तुमच्या ग्राहकाला इतरत्र कुठेही मिळत नाही? असा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना समाधान देण्यासाठी तुमच्या व्यवसायाचा यूएसपी शोधा.

५. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग कसे करणार आहात?

“पिकेल ते विकेल” असे म्हणणे व्यवसायाच्या आधुनिक जगात तितकेसं सुसंगत नाही. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा गगनाला भिडलेली आहे, कारण उद्योजकतेकडे ओढा वाढत चालला आहे. तरुण उद्योजकांना आर्थिक नियोजन फार कटाक्षाने पाळावे लागते.

सुरुवातीला पैसे फार कमी असतात त्यामुळे आपण मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर कमीत कमी खर्चात ग्राहक कसे मिळवायचे हे शोधले पाहिजे. सध्या सोशल मीडिया हे एक चांगले माध्यम आहे. आपला ग्राहक ओळखून आणि शोधून त्यालाच टार्गेट करणे सोशल मीडियामुळे शक्य झालंय.

आपला व्यवसाय जर ऑनलाईन घेऊन जात येत असेल तर उत्तम, पण जर तुम्ही स्थानिक सेवा देत असाल तर तुमच्या ओळखीच्या लोकांच्या नेटवर्कद्वारे जाहिरात करणे, बिझनेस कार्ड छापणे आणि ते पोस्ट करणे आणि फ्लायर्स लावणे हा स्थानिक लीड्सला लक्ष्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

६. व्यवसायाच्या भविष्यासाठी तुमची योजना काय आहे?

तरुण वयात असताना, तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. तुम्ही तारुण्याच्या उंबरठ्यावर असता. अनेक बदल हे याच वयात होत असतात. त्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये तुमचा व्यवसाय कुठे जायला हवा आहे यावर तुम्हाला अतिरिक्त विचार करावा लागेल. त्यानुसार पुढील पाच-दहा-वीस वर्षांची योजना आखून त्यानुसार कामाला लागा.

– टीम स्मार्ट उद्योजक

error: Content is protected !!
Scroll to Top