जगभरात भारतीय खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी ‘कामत ग्रुप’ पुन्हा सज्ज

आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येत चालल्याने ‘कामत ग्रुप’ची परदेशातील रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दक्षिणपूर्व आशियातील व्हिएतनाम, श्रीलंका या देशांनी पर्यटकांसाठी पायघड्या घातल्या असून हळूहळू इतरत्रही पर्यटन सुरू होत आहे.

देशात लोकप्रिय अशी शाकाहारी रेस्टॉरंट चालवणाऱ्या ‘कामत ग्रुप’ची सिंगापूर तसेच थायलँडमधील फुकेत, पट्टाया येथील रेस्टॉरंटही आता लवकरच पुन्हा सुरू होणार आहेत, अशी माहिती ‘कामत ग्रुप’चे अध्यक्ष डॉ. विक्रम कामत यांनी दिली.

डॉ. विक्रम म्हणाले की,”भारतीय खाद्यपदार्थ जगात लोकप्रिय व्हावेत, यासाठी आमची धडपड नेहमी सुरूच असून परिस्थिती सुरळीत झाली की लवकरच युरोप व अन्यत्रही नवी रेस्टॉरंट उघडण्याचे लक्ष्य आहे. केवळ परदेशातच नव्हे तर पंढरपूर, शिर्डीसारख्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहरातील, कोरोना काळात बंद पडलेली रेस्टॉरंटही आता सुरू होत आहेत.

‘कामत ग्रुप’ने आता अन्य क्षेत्रात पदार्पण करताना ‘व्हिट्स’ ब्रॅण्डची २७ चार तारांकित हॉटेल सुरू केली असून कल्याणला खास प्रशिक्षण अकादमीही सुरू केली आहे. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरणाऱ्या स्वयंपाकघरातील दोन नव्या उपकरणांसाठी ‘कामत ग्रुप’ला पेटंटही मिळाले आहे. या वर्षात आणखी दहा रेस्टॉरंट व दहा व्हिट्स हॉटेल उघडण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

शंभर खोल्या असलेली व्हिट्स हॉटेल ही मुख्यतः दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमधील विवाह सोहळे, समारंभ, कार्यक्रम या गरजांसाठी उघडण्यात आली आहेत. कामतच्या सर्व हॉटेलांमधील अत्यंत स्वच्छ स्वच्छतागृहे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. आज लोक आपल्या आरोग्याप्रती जागरूक झाले असल्याने कमी तेलातील ताजे व आरोग्यदायी खाद्यपदार्थ देण्यावर आमचा कामतचा कटाक्ष असतो.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?