नाव : सागर शेडगे
शिक्षण : बी. कॉम.
विद्यमान जिल्हा : मुंबई
व्यवसायाची माहिती
व्यवसायाचे नाव : BreakComfort Business Registration Services
व्यवसायाची स्थापना : फेब्रुवारी २०२०
व्यवसाय नोंदणी : Sole Proprietorship
व्यवसायातील हुद्दा : संस्थापक
व्यवसायातील अनुभव : ३ वर्षे
व्यवसायाचा पत्ता : 125, Ajinkyatara Welfare Society, Kranti nagar, Nr Anudatt Vidyalaya, Kandivali East, Mumbai – 400101.
मी सागर शेडगे. माझं बालपण मुंबईमधील कांदिवली येथील क्रंतीनगरसारख्या छोट्या चाळीमध्ये गेलं. मध्यमवर्गीय मराठी कुटुंब ज्यामध्ये वडील एका छोट्या कंपनीमध्ये कामगार आणि आई गृहिणी एक भाऊ, एक बहिण असा आमचा छोटस कुटुंब. अभ्यासामध्ये तसा सामान्यच पण स्वप्नं फार मोठी होती.
दहावीपर्यंत आईसोबत घरी पापड लाटून तिला त्या कामामधे मदत करून, अकरावी ते पहिल वर्ष बी. कॉम असं शिक्षण करताना छोटी मोठी कामे व सकाळी बाजूच्या इमारतींमध्ये गाडी धुण्याचे काम करून शिक्षण केल. नंतर गणिताची भीती म्हणून पहिल वर्ष बी. कॉममधील गणिताच्या पेपरला गेलोच नाही आणि साहजिकच बाकी विषयांमध्ये पास पण गणितात अपयश आले.
पुढे एका शैक्षणिक कोचिंग सेंटरमध्ये कामाला लागलो आणि शिक्षण सुटले, पण काही वर्षांनी शिक्षण पूर्ण करावे म्हणून ओपन युनिव्हर्सिटीमधून बी. कॉम पूर्ण केले आणि एका सी ए फर्ममध्ये कामाला लागलो. प्रामाणिकपणा, सतत नवीन शिकण्याची आवड यामुळे फार कमी काळामध्ये व्यावसायिक नोंदणी व इतर गोष्टी शिकलो.
या काळामध्ये जाणवल व्यावसायिक नोंदणी करताना उद्योजकांच्या समस्या काय आहेत व बाजारात भरमसाठ फी घेतली जात आहे. या समस्या सोडवण्यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये स्वत:च्या व्यवसायाची म्हणजे Breakcomfort® Business Registration services ची सुरुवात करून व्यावसायिक पर्वाला सुरवात केली.
नंतर लगेच कोरोनाचं संकट आलं. सर्वच व्यवसाय ठप्प झाले. पुढील सात महिने असेच गेले, पण जशी परिस्थिती पूर्वपदावर आली उत्तम जलद सेवा माफक किंमत यामुळे मागील ३ वर्षात १ हजारपेक्षा जास्त व्यावसायिक नोंदणी आपल्या कंपनीने केल्या आहेत आणि एक विश्वासाच नातं आपल्या ग्राहकांसोबत निर्माण केलं.
व्हिजन : व्यावसायिक नोंदणी क्षेत्रात पारदर्शकता , परवडणारी किंमत आणि नावीन्यपूर्ण सेवा प्रदान करणे व प्रदान करण्यात आलेल्या सेवेबद्दल पूर्ण ज्ञान देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे व्यावसायिक आपला निर्णय अत्यंत चांगल्या प्रकारे घेईल.
मिशन : आम्ही ज्या काही सेवा प्रदान करू त्याचा विचार करताना ग्राहकाच्या काय समस्या आहेत याचा विचार करूनच त्या सेवा देऊ त्यामध्ये सतत नावीन्य असेल , आमच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांच्या हिताचा त्यांच्या शिकण्यावर सतत गुंतवणूक करू हे करताना सामाजिक दायित्व व व्यवसायाचा फायदेशीरपणा याचा समतोल राखू.
प्रॉडक्ट किँवा सर्व्हिस याच्याबद्दल थोडक्यात : All Types Of Business Registration & Licence
- Proprietorship registration
- Pvt ltd company registration
- One Person Company) registration
- Partnership Firm registration
- Limited Liability Partnership) registration
- Passport
- Partnership deed and Pan card
- Trademark ™® Registration
- MSME Udyam Registration
- Shop Act Registration
- Gumasta
- FSSAI Food Registration Basic
- GST Registration
- Professional Tax PTEC
- IEC (Import And Export) Code Registration Certificate
संपर्क
मोबाइल : 9867008910
ई-मेल : ceo@breakcomfort.com
वेबसाइट : www.breakcomfort.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/BreakComfort?mibextid=ZbWKwL
गुगल बिझनेस पेज :
लिन्क्डइन प्रोफाइल : https://www.linkedin.com/in/sagarentrepreneur2020
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.