व्यक्तिगत माहिती
नाव : जान्हवी बोरगे
शिक्षण : BMM, Animation
जन्मदिनांक : २१ ऑक्टोबर १९९७
विद्यमान जिल्हा : मुंबई
व्यवसायाची माहिती
व्यवसायाचे नाव : Dream Creation
व्यवसायाची स्थापना : २०१६
व्यवसायातील हुद्दा : Designer
कर्मचारी संख्या : ३
व्यवसायाचा पत्ता : F-101, Triveni Sangam society, Andheri East, Mumbai.
मी जान्हवी बोरगे. मुंबईला माझ्या आई, वडील आणि भावासोबत राहते. मी माझे शिक्षण BMM मधून केले आहे. बारावी नंतर Arena Animation मधून माझे अनिमेशनचे शिक्षण घेतले. डिग्री कॉलेज आणि अनिमेशन हे दोन्ही सोबत केले.
आयुष्याला कलाटणी देणारा क्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तसाच माझ्या ही आला. तेरावीत शिकत असताना माझ्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यातच त्यांची नोकरी गेली. त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी माझ्यावर आली.
त्यावेळी मी नोकरी करायचे ठरवले. कॉलेज, क्लास, नोकरी हे सर्व एकत्र चालू केले. सकाळी अंधेरीवरून विरारला कॉलेजसाठी जात तिथून पुन्हा अनिमेशनचे क्लास त्यांनतर नोकरी हे सर्व करत घरी १२ वाजता पोहोचायचे.
त्या दिवसांनी खूप काही शिकवले. आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली होती. त्यामुळे शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर मी ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होते. त्यावेळी पगारही खूप कमी होता. कामाचा अनुभव मिळाल्यावर मी स्वतःचा स्टार्टअप चालू करण्याचा विचार केला व नोकरी सोडली. सुरुवातीला खूप वाईट अनुभवही आले.
काही वेळेला खूप असे ग्राहक मिळाले, ज्यांनी वेळेवर काम करूनही पैसे दिले नाहीत. त्यामुळे घर चालवण्यातही खूप त्रास होऊ लागला. परंतु हळूहळू सर्व गोष्टी manage करून काही गोष्टीवर मेहनत घेऊन चांगले ग्राहक मिळवले, जे अजूनही सोबत काम करत आहेत.
खूप वेळा काही लोकांना वाटते की freelancing असणे म्हणजे डीटीपीसारखे काम असेल म्हणजे चार्जेसही कमी असतील. खूप वेळा लोकांना समजावण्यासाठी प्रयत्न करावा लागला की डीटीपी ऑपरेटरचे काम वेगळे असते आणि प्रोफेशनल काम वेगळे असते.
Dream Creation चालू करण्याचा उद्देशच हा आहे की माझ्यासारख्या संघर्षातून उभ्या राहत असलेल्या स्टार्टअप्सना त्यांचे बिझनेस मोठे करण्यात मदत करता येईल.
Dream Creation हे सोशल मीडिया मार्केटिंग सोबत डिझायनिंग सेवा कस्टर्मरपर्यंत पोहोचवतो. ह्यामध्ये बिझनेस कार्ड, stationery डिझाईन, सोशल मीडिया मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग, प्रिंट ad वैगरे सेवा उपलब्ध आहेत. आमचा उद्देश हा स्टार्टअप असलेल्यांना जास्त ह्याचा उपयोग व्हावा हाच आहे
संपर्क
मोबाइल : 7045102697
ई-मेल : janhavib2197@gmail.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.