व्यक्तिमत्त्व विकास

संवाद कौशल्य सुधारण्यासाठी ५ टिप्स

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


संवाद म्हणजेच संभाषण, पण संवाद कौशल्य म्हणजे काय बुवा; तर एखादा मुद्दा दुसर्‍याला किती प्रभावीपणे समजावून देवू शकता असे कसब. एखाद्याच्या यशात त्याचे संवादकौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. संभाषण कौशल्य एखाद्यामध्ये जन्मजात असतेच असे नाही. ते कालांतराने सरावाने विकसित करता येते. संभाषण कौशल्ये केवळ एक चांगला वक्ता होण्यासाठी उपयोगी पडत नाहीत, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा फायदा होतो.

उत्तम संभाषण असेल तर कोणताही जॉब इंटरव्ह्यू चांगल्यारितीने पार पडता येतो. जमावासमोर बोलताना किंवा भाषण करताना, आपले विचार, मुद्दे समोरच्यांसमोर मांडताना, पटवून देताना विश्‍वासाने ते करता येते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

व्यवसायात पदोपदी आपल्याला अनेक प्रकारच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागते. विविध प्रकारची माणसे आपल्याला भेटतात. स्वभावता: ती वेगळी असतात, पण आपल्या संवाद कौशल्याने अशा व्यक्तीना आपण आपलेसे केले तर आपला व्यवसाय वाढवण्यास याची मदत होते.

आपल्यासोबत काम करणार्‍या कर्मचार्‍यांसोबत रोजचा व्यवहार करताना चांगल्या संवादाची आवश्यकता असते. यातून माणसे जोडली जातात. विश्‍वासाचे नाते निर्माण व्हायला मदत होते. व्यावसायिक हा छोटा असो अथवा मोठा त्याला चांगले संवाद कौशल्य असणे फार गरजेचे असते किंवा जर ते कमी असेल किंवा नसेलच तर विकसित करणे अत्यंत गरजेचे असते.

संवाद कौशल्य सुधारण्यासाठी टिप्स खाली काही आवश्यक टिप्स देत आहोत :

१. आत्मविश्वास : जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्याने स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण आपला मुद्दा एखाद्यासमोर मांडतो तेव्हा जर आपल्यात आत्मविश्वास नसेल तर आपण समोरच्याला पटवून देऊ शकत नाही. तुम्ही आत्मविश्वासाने बोलून आपला मुद्दा कोणालाही सहज पटवून देऊ शकता.

२. काळजीपूर्वक ऐकायला शिका : चांगल्या संवादासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐकणे. चांगला वक्ता हा नेहमी बोलण्यापेक्षा ऐकण्याकडे जास्त लक्ष देतो. जेव्हा एखादी व्यक्ती ऐकण्याकडे अधिक लक्ष देते, तेव्हाच ती इतरांच्या शब्दांना योग्य प्रकारे उत्तर देऊ शकते.

३. योग्य देहबोली : ज्याचे संवाद कौशल्य उत्तम असते अशा व्यक्तीचे जर तुम्ही निरिक्षण केले, तर तुमच्या असे लक्षात येईल की ते जे बोलतात त्याच्याशी त्यांचे हातवारे व डोळ्यांच्या हालचाली या मिळत्याजुळत्या असतात. संवाद म्हणजे केवळ मौखिक बोलणे नव्हे तर आपली देहबोलीही खूप काही बोलत असते. यातूनच आपण श्रोत्यांवर छाप पाडू शकतो.

४. सत्य आणि तथ्य मांडा : संवाद करताना कोणती गोष्ट सत्य आणि तथ्य यावर आधारित असायला हवी. जेव्हा तुम्ही एखाद्याशी संवाद साधता तेव्हा फक्त हवेत बोलू नका. मुद्देसुद आणि नेमकं बोला. आपल्या बोलण्यात तथ्य असायलाच हवे. सत्य आणि तथ्य असे आपल्या बोलण्यात असेल तर श्रोत्यांचा आपल्या बोलण्यावर विश्‍वास बसतो आणि आपल्या बोलण्याबाबतची खात्री पटते.

५. टिपणं काढा : आपण कोठेही संवाद साधत असलो तरी आपल्यासोबत आपले पेन आणि वही असावी. आपल्या गरजेचे किंवा चांगले काही आपल्या कानावर आले तर आपण त्याचे टिपण नोंदवू शकतो. जे भविष्यात आपल्याला संदर्भ म्हणून उपयोगी पडू शकते. आपला मुद्दा मांडण्याआधी, मुख्य मुद्दे लक्षात ठेवावेत हे गरजेचे आहे पण समोरची व्यक्ती काय बोलत आहे हेही लक्षपूर्वक ऐकूण त्याचे टिपण केले तर आपले मुद्दे मांडताना त्याचे संदर्भ घेवून आपले बोलणे अधिक प्रभावी करता येवू शकते. यातून ऐकणारा आपल्याशी चांगल्याप्रकारे जोडला जावू शकतो.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!