प्रगतिशील उद्योग

या ७ गोष्टी केल्यात तर तुमच्या व्यवसायात विक्री निश्चित वाढेल

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


विक्री ही प्रत्येक व्यवसायाचा कणा आहे. उत्पादन तयार केले म्हणजे ते विकायला हवे. आपला ग्राहक शोधणे, त्याला योग्य उत्पादन विकणे, आपले उत्पादन योग्य ग्राहकापर्यंत पोहचवणे यासाठी साखळी पार करणे असे अनेक दुवे पार करत व्यवसायिक आपल्या ग्राहकापर्यंत उत्पादन पोहचवतो. शब्दश: आपण वाचताना आपल्याला याचा अंदाज येणार नाही, पण प्रत्यक्षात विक्री करताना अनेक प्रकारची आव्हाने समोर असतात.

आपली विक्री वाढवण्यासाठी खूप मेहनतीची गरज असते. त्यासाठी विविध संकल्पना, युक्त्या कराव्या लागतात. नवनवे मार्ग तयार करावे लागतात. या लेखात असेच काही विक्री वाढवण्यासाठी मार्ग सांगणार आहोत.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

१. वर्तमान ग्राहकांशी बोला : व्यवसायात उत्पादन वाढवण्यासाठी तुमचे वर्तमान ग्राहक हे आपल्या सर्वोत्तम स्रोतांपैकी एक आहेत. त्या ग्राहकांना आपली अगोदरपासूनच माहिती आहे. ते तुमच्या उत्पादनाच्या आणि सेवांच्या गुणवत्तेशी परिचित आहेत अशा ग्राहकांना आपल्या उत्पादनाची विक्री करणे तुलनेने जास्त सोपे आहे.

आपल्या उत्पादनात आपण ग्राहकांची गरज आणि मागणी याचा विचार कसा केला आहे, हे त्याला पटवून द्या. जेणेकरून ग्राहक आपल्या उत्पादनाकडे आकर्षित होईल. चांगली ग्राहकसेवा हा आपले उत्पादन विक्रीचा राजमार्ग असतो हे कायम लक्षात ठेवा.

२. ग्राहकांना ‘पॅकेज डील’ द्या : पॅकेज डील म्हणजे सामान किंवा पूरक वस्तू किंवा सेवेची एकत्रित खरेदी. ग्राहकांना पॅकेज डील जास्त आवडतात. त्यामुळे विविध उत्पादनाची किंवा उत्पादकांची उत्पादने एकत्र करून पॅकेज डील आपण देवू शकतो.

अशा डील ग्राहकांचा पैसा वाचवतात त्यामुळे ग्राहक अशा गोष्टींकडे ओढले जातात. त्यामुळे विक्री करणे तुमच्यासाठी खूप सोपे होते. आपल्या सेवा आणि उत्पादनांच्या पॅकेज डील या फ्लेक्जीबल ठेवा. ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार निवड करण्यास सोपे जाईल असे पॅकेज तयार करा. याचा तुम्हालाही फायदा होतो.

३. योजना तयार करा : आपल्या मागील विक्रीचे आलेख डोळ्यासमोर ठेवून कामाचे योग्य विश्‍लेषण करा. मागील अनुभवावरून नवीन योजना तयार करा. आपल्याकडील उत्पादन त्याची उपलब्धता आणि ग्राहकांपर्यंत आपले उत्पादन पुरवणार्‍या लॉजिस्टिक अशा पुरवठा साखळीचा नीट लेखाजोखा मांडा. जेणेकरून विक्रीची चेन कोठेही खंडीत होणार नाही आणि आपले उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत नीट पोहचेल.

४. रेफरल्स तयार करा : तुमचे वर्तमान ग्राहक तुम्हाला नवीन ग्राहकांचे रेफरन्स देऊ शकतात. त्यामुळे आपला डाटाबेस नेहमी अपडेट ठेवत जा. आपल्या संतुष्ट ग्राहकांकडून तुम्ही इतरही लोकांशी जोडले जाल. याशिवाय अशा ग्राहकांना आपल्या इतरही सेवा विकू शकतो. समाधानी ग्राहकांकडून प्रशंसापत्रेदेखील मागू शकता आणि नंतर ते तुमच्या वेबसाइटवर किंवा जाहिरातीतही वापरू शकता. ग्राहक प्रशंसापत्रे वापरताना, नेहमी त्यांची प्रथम परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे.

५. ई-कॉमर्सचा वापर करा : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म हे आपले उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे व विक्री करण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे अशा प्लॅटफॉर्मचा वापर करून आपले उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला हवे.

या ठिकाणी आपल्यासारखेच अनेक विक्रेते असतील तरीही आपले वेगळेपण आपण आपल्या जाहिरातीतून ग्राहकांना सतत दाखवत राहायला हवे. अशा प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त सवलत दिली जाते. आपणही यााच योग्य वापर करून ग्राहकांना सवलती कशा देता येतील ते पाहायला हवे व त्या त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

६. ग्राहकांचे ऐका : आपल्या ग्राहकांचे किंवा संभाव्य ग्राहकांचे ऐकणे हा त्यांच्या गरजा समजून घेण्याचा आणि पूर्ण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. विविध माध्यमातून आपल्या ग्राहकांशी सतत संपर्क केला पाहिजे. त्यांना बोलते केले पाहिजे.

ग्राहकांशी विश्‍वासार्ह व दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्यास यातून मदत होते. विक्री हे एक सांघिक काम आहे. त्यामुळे ग्राहकांना काय हवे हे नीट समजून घ्यावे. त्यांच्या तक्रारी, सुचना नेहमी अग्रणी ठेवाव्यात.

७. सोशल मीडियाचा योग्य वापर करा : आज आपल्या आजूबाजूची जवळपास प्रत्येक व्यक्ती ही स्मार्टफोन वापरते. फेसबुक, इन्स्टाग्राम, टि्वटर अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर प्रत्येक जण करतो. त्यामुळे आपल्या व्यवसायीच जाहिरात करण्यासाठी, आपली कार्यपद्धती मांडण्यासाठी, आपले वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी सोशल मीडिया खूप मोलाची मदत करतो.

आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून आपण लोकांना जास्तीत जास्त चांगल्या ऑफर्स देवू शकतो. हा ग्राहक जागरूकता वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ग्राहक प्रशंसापत्रे सोशल मीडिया फीडवर पोस्ट केली तर तुमच्या ऑफरमध्ये इतर ग्राहकांचे स्वारस्य निर्माण करू शकतात.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!