Advertisement
उद्योगोपयोगी

कोल्ड कॉलिंग; विक्री वाढवण्यासाठी आजही तितकंच महत्त्वाचं

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


कोणत्याही कंपनीची वाढ होण्यासाठी तिच्या विक्रीमध्ये वाढ होणं गरजेचं असतं. आपल्या नेहमीच्या ग्राहकांकडूनच जास्तीत जास्त काम मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा नवीन ग्राहक मिळवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असत. याचा अर्थ असलेल्या ग्राहकांवर लक्ष न देता नवीन मिळवण्यासाठीच धावणे असा नाही, तर विद्यमान ग्राहक कायम ठेवून वाढीसाठी नवीन ग्राहक मिळवण्यासाठी प्रयत्न करणं.

नवीन ग्राहक मिळवून विक्रीत वाढ होण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांमध्ये  कोल्ड कॉलिंग ही पहिली पायरी येते. कोल्ड कॉलिंग म्हणजे एखाद्या अनोळखी व्यक्तीला आपला ग्राहक करून घेण्यासाठी फोन, इमेल अथवा सोशल मीडियावरून संबंध साधणे तसेच प्रत्यक्ष जाऊन भेटणे हेसुद्धा येते.

सेल्स प्रोसेसमधील कोल्ड कॉलिंग ही पहिली पायरी. विक्री व मार्केटिंगमधील तज्ज्ञांची या बाबतीत दोन टोकाची मतं असतात. काही तज्ज्ञांच्या मते घरोघरी जाऊन विक्री करणं जास्त महत्त्वाचं आहे, तर काहींच्या मते दूरध्वनीवरून संवाद साधणं आवश्यक.

विक्री विभागात कोल्ड कॉलिंग हे नावडतं आणि हलकं काम समजलं जातं, कारण अनेकदा ग्राहकांकडून मिळणारा अपमानास्पद आणि नकारात्मक प्रतिसाद हा त्रासदायक असतो. मात्र विक्रीत वाढ करण्यासाठी कोल्ड कॉलिंग हे अतिमहत्त्वाचे असते. अनोळखी ग्राहकांशी संवाद साधून त्यांना आपलंसं करून त्याचे विक्रीत रुपांतर करणे हीच विक्री प्रतिनिधीसाठी खरी कसोटी असते.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!