स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
२४ वर्षांचा एक तरुण मुलगा ट्रेनच्या खिडकीशी बसला होता. खिडकीच्या बाहेर पाहून आनंदाने मोठमोठ्याने ओरडतं टाळ्या वाजवत हेाता. मध्येच बाजूला बसलेल्या आपल्या बाबांशी संवाद साधत होता. ‘‘बाबा ती पाहा झाडं कशी छान वाटतायत ना?’’ असं म्हणत टाळ्या वाजवत होता. बाबा मात्र त्याच्या प्रश्नांना होकारार्थी मान हलवत हसत होते.
बाजूला बसलेलं एक तरुण जोडपं हे सगळं पाहत होतं. त्यांना त्या मुलाची दया येत होती. एवढ्यात तो मुलका पुन्हा एकदा ओरडला, बाबा ते पाहा ढगसुद्धा आपल्यासोबत कसे मस्त धावतायेत. आता मात्र त्या जोडप्याला राहवलं नाही. ते त्या वृद्ध माणसाकडे वळले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही तुमच्या मुलाला एखाद्या चांगल्या डॉक्टरला का दाखवत नाही?”
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.
या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p
वृद्ध मनुष्य हसला आणि म्हणाला, “मी त्याला डॉक्टरकडे नेलं होतं. आतासुद्धा आम्ही हॉस्पिटलहूनच परततोय. माझा मुलगा जन्मत: आंधळा होता. आजचं त्याचं ऑपरेशन झालं आणि तो हे जग पहिल्यांदा पाहतोय.
निष्कर्ष : एखाद्या गोष्टीची खात्री केल्याशिवाय अनुमान काढून कुणालाही सल्ले देऊ नयेत. कधी कधी सत्य हे चकवा देणारं असतं.
स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.