उद्योगसंधी

उत्पादन व्यवसायात असलेल्या संधी आणि धोके

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


प्रचंड वाढणारी स्पर्धा, अस्थैर्य आणि आव्हानाच्या या काळात मोठमोठे प्रश्‍न भेडसावत असतात. यात व्यवसाय क्षेत्रही मागे नाही. किंबहुना व्यवसायात जास्त स्पर्धा आणि जोखीम असते. व्यवसाय करणार्‍याला याचा चांगलाच अनुभव असतो, पण व्यवसायात नव्याने येवू इच्छिणार्‍याला याची किमान जाणीव तरी असणे गरजेचे आहे, कारण आज अनेक व्यवसाय जोरशोरमध्ये सुरू होतात आणि तेवढ्याच वेगाने बंदसुद्धा होतात. याची अनेक कारणे असतात, पण अपुरी माहिती हे त्यातलेच एक कारण आहे.

व्यवसायात उतरताना कोणता व्यवसाय करू असा प्रश्‍न असणार्‍यांना किमान व्यवसायाचे चांगले पर्याय माहिती असणे जास्त गरजेचे आहे. हीच गरज हेरून आपल्याला उत्पादन प्रकारच्या व्यवसायाची ओळख करून देणार आहोत; जो एक चांगली कमाई करून देवू शकतो. मॅन्युफॅक्‍चरिंग हा एक असा व्यवसाय आहे जो आपल्याला चांगला व्यवसाय आणि यातून उत्पन्न मिळवून देवू शकतो.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

उत्पादन म्हणजेच वस्तू तयार करणे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग होय. कोणत्याही प्रकारचे उत्पादन तयार करण्यासाठी साहित्य, यंत्रसामग्री, जागा अशा अनेक गोष्टींची गरज असते. तुम्ही कोणत्याही वस्तूचे उत्पादन करू शकता. मात्र असा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तो कसा चालतो हे समजून घेणे आवश्यक आहे.

दोन प्रकारची उत्पादने यशस्वी होऊ शकतात. एखादे उत्पादन जे बाजारात उपलब्ध नाही असे किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही उत्पादनातून उत्तम दर्जाचे उत्पादन तयार करणे.

कोणकोणत्या प्रकारचे उत्पादनाचे व्यवसाय असू शकतात?

उत्पादन कोणत्याही वस्तूचे असू शकते. तुमच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर तुम्ही विविध संधी तयार करू शकता. खाद्यपदार्थांचाच विचार केला तर लोणचे-पापड व्यवसाय, मसाले, बिस्किटे आणि कुकीज, स्नॅक्स आणि चिप्स, चॉकलेट आणि केक किंवा विविध सरबते अशी विविध उत्पादने असू शकतात. याशिवाय डिटर्जंट पावडर, अगरबत्ती, मेणबत्ती, टिश्यू पेपर, कागदी पिशव्या/कापडी पिशव्या तयार करू शकता.

अन्न आणि खाद्य प्रकारातले व्यवसाय हे अगदी बारमाही चालणारे आहेत. लग्न, पार्टी तसेच रोजच्या जेवणात मसाले हे लागतातच. त्यामुळे हाही एक चांगला व्यवसाय आहे. मुख्य म्हणजे हे व्यवसाय हे घरातून करता येतील व कमी गुंतवणूक लागतील असे व्यवसाय आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच खर्च कमी व कमाई जास्त होवू शकते.

बदलत्या काळातील जागरुकतेमुळे प्लास्टिक वस्तूंना आता लोक स्वत:हून नकार देवू लागले आहेत. प्लास्टिकला पर्याय शोधू लागलेत. तेव्हा अगदी पिशव्यांचाच विचार केला तर प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या किंवा वाणसामानासाठी कागदी पिशव्या हे पर्याय जोर धरू लागलेत. याचा चांगला व्यवसाय होवू शकतो आणि त्याचा जम बसू शकतो. त्यातून मोठा नफा मिळू शकतो.

अनेक प्रकारच्या व्यवसायात कच्चा माल लागतो. हा कच्चा माल पुरवणे हासुद्धा एक चांगला व्यवसाय आहे.

उत्पादन व्यवसायाचे फायदे

१. ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन तयार करू शकता किंवा तुमच्या सर्जनशीलतेनुसार नवीन उत्पादनही बाजारात आणू शकता.

२. उत्पादन व्यवसायात गुणवत्ता नियंत्रण आपल्या हातात असते.

३. उत्पादने तयार करून तुम्ही प्रत्येक उत्पादनावर जास्त मार्जिन मिळवू शकता.

४. तुम्ही तुमचे उत्पादन बाजारात विकलेच पाहिजे असे नाही, तुमचे उत्पादन चांगले असेल तर बाजारात उपस्थित असलेले वितरकही तुमचे उत्पादन किरकोळ विक्रेत्यापर्यंत पोहोचवू शकतात.

५. तुम्हाला फक्त उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. वितरक तुमचे उत्पादन बाजारातील दुकानात पोहोचवेल.

६. किरकोळ विक्रेते आणि घाऊक विक्रेते वस्तूंचे उत्पादन वाढवण्यास चांगली मदत करू शकतात.

या क्षेत्रात इतर अनेक व्यवसाय कल्पना आहेत, ज्या तुम्ही कमी खर्चात सुरू करू शकता. बारमाही चालणारे व्यवसाय, वर्षभर नफा कमवण्याची संधी, एवढेच नाही तर सुरुवातीच्या काळात वेगळ्या जागेचीही गरज भासणार नाही, पण कोणताही व्यवसाय असला तरी त्याचे योग्य पद्धतीने मार्केटिंग झाले पाहिजे.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!