प्राचीन योगाचे ऑनलाइन प्रशिक्षण देणारे गजेंद्र राजपूत


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मी गजेंद्र राजपूत. माझे शिक्षण जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात झाले. मी मुंबईमध्ये २००१ पासून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होतो. नोकरी करत असताना समाधानी नव्हतो, मी बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. पण तिकडे बाहेरून मायानगरी वाटते, पण खूप मेहनत आणि भविष्य दिसत नव्हते. मी अन्डर १९ वयोगटात राज्य पातळीवर हातोडाफेक प्राविण्य मिळाले आहे.

मला खेळामध्ये खूप आवड होती. माझी भेट २००७ साली उत्तरखंडातील योग गुरूंशी झाली व त्यांच्याकडून योगबद्दल महिती घेतली आणि करियरबद्दल मार्गदर्शन मिळाले. मला मनापासून वाटले की हेच ते आहे जे मला आवडीचे स्वतंत्र आणि आर्थिक दोन्ही गरज पूर्ण करणारे मार्ग आहे. त्यांच्याकडून योगाचे प्रशिक्षण घेतले आणि योग असा विषय आहे शिकण्याची भूक वाढत गेली त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आणि अनुभव मिळाला.

नंतर मे २०११ साली योग विद्याधामला जाऊन योगप्रवेश, योगपरिचय, योगशिक्षकचे प्रशिक्षण घेतले. जुलै २०११ आंतर्व दोष निवारण व गर्भसंस्कार प्रशिक्षण पूर्ण केले. मी फक्त बिझनेसमॅन, सेलेब्रेटी यांना घरी जावून शिकवत असे आणि हळूहळू काम वाढत गेले नंतर कॉर्पोरेटमध्ये संधी मिळाली. ग्रुप क्लासेस घेतले आणि स्वतःला upgrade करत राहिलो.

२०१२-१३ डिप्लोमा इन फिजिकल Education, शिवाजी पार्क येथे घेतले. २०१४ साली K11 School of Fitness Sciences येथे सर्टिफिकेट पर्सनल ट्रेनर प्रशिक्षण घेतले. २०१७ साली The Yog Institute Santacruze मुंबई येथे सात दिवसांचे वर्कशॉप पूर्ण केले आणि मे २०१८ योग विद्या धाम प्रबोध वर्ग पूर्ण केला. २०१९ एप्रिल वशिष्ठ योग फाऊंडेशन अहमदाबाद गुजरात येथे योग शिक्षक ट्रेनिंग पूर्ण केले असा हा प्रवास खूप काही शिकवून गेला.

योग हे प्राचीन भारतातील सहा दर्शनापैकी म्हणजेच तत्त्वज्ञानापैकी एक दर्शन होय. योग म्हणजे बुद्धी,मन,भावना आणि संकल्प यांचे नियमन, योगाच्या साधनेमुळे लयबद्धता आणि प्रमाणबद्धता याची जाणीव निर्माण होते त्यामुळे अविरत चिकाटीने आपण रोज युद्धाला उभे राहतो आणि शरीरातील प्रत्येक पेशीला विशुद्धता,सूक्ष्मता आणि चैतन्य देतो.

गेल्या अकरा वर्षापासून भारतातील व भारताबाहेरील १,००० हून अधिक लोकांना ऑनलाइन व ऑफलाइनच्या माध्यमातून प्राचीन योग अभ्यासाने प्रशिक्षित व समाधानी केले आहे. अकरा वर्षांच्या योगाभ्यासामुळे माझी खात्री होऊन चुकली आहे की जीवनाविषयीच्या आपल्या अगदी मूलभूत प्रवृत्तींना समांतर असे पैलू शरीरामध्ये असतात.

शारीरिक आणि मानसिक आजारांना प्रतिबंध करणे शरीराचे सर्वसामान्यपणे संरक्षण करणे आणि आत्मनिर्भरता व आत्मविश्वास यांची अपरिहार्य अशी जाणीव विकसित करणे या उद्दिष्टाच्या दृष्टीने हे आदर्श असे तंत्र आहे. आता आपण आपल्या सर्वांसाठी फक्त ऑनलाइन (zoom application) योग अभ्यासाचे वर्ग घेऊन आलो आहोत.

तसेच वैयक्तिक, गट वर्ग (ग्रुप क्लास), लहान मुलांसाठी वयोगट (१० वर्षे पुढील ते अठरापर्यंत), महिलांसाठी तसेच इतर काही आजारांवर व समस्यांवर योग्य मार्गदर्शन करून निरोगी आयुष्य जगण्याचा मार्ग योगाच्या प्रशिक्षण देऊन समाधानी करणे तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एक तरी योग अभ्यासी व योग शिक्षक घडावा आणि संपूर्ण महाराष्ट्र निरोगी व्हावा, हा माझा ध्यास आहे. तसेच निसर्गरम्य वातावरणात एक ते दोन दिवस निवासी वर्गही आयोजित केले जातात.

मला एक गोष्ट सर्वाना सांगवीशी वाटते. सध्या योगाच्या नावाने बऱ्याच चुकीच्या गोष्टी शिकवल्या जात आहेत. योग ही एक साधना आहे. प्राचीन ऋषिमुनींनी सांगितलेला योग संपूर्ण समाजाला मिळावा, त्याचा अनुभव घेता यावा आणि त्याने आपले जीवन दीर्घायुषी, निरोगी व्हावे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतोय.

गजेंद्र जयसिंग राजपूत

कंपनीचे नाव : वशिष्ठ योग महाराष्ट्र
आपला हुद्दा : योग अभ्यासक
व्यवसायातील अनुभव : ११ वर्षे

व्यवसायाचा पत्ता : आधीचा पत्ता- ११४/३ मजला, पारेख महल, एल. जे. रोड, शिवाजी पार्क, माहिम वेस्ट, मुंबई ४०००१६.
तात्पुरता पत्ता – ४९/ब, महाराणा प्रताप हाऊसिंग सोसाइटी, जुने विमानतळ, चाळीसगाव, जि. जळगाव, महाराष्ट्र

विद्यमान जिल्हा : मुंबई
ई-मेल : gajendrarajput2017yoga@gmail.com
मोबाइल : 9867357913

प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी थोडक्यात माहिती : आपल्या सर्वांसाठी फक्त ऑनलाइन (zoom application) योग अभ्यासाचे वर्ग घेऊन आलो आहोत.

१) वैयक्तिक,
२) गट वर्ग (ग्रुप क्लास ) ,
३) लहान मुलांसाठी वयोगट (१० वर्षे पुढील ते १८ पर्यन्त ),
३) महिलांसाठी
४) वाढलेले वजन कमी करण्यासाठी
५) थायरॉईड
६) बद्धकोष्ठता

इतर काही आजारावर व समस्या वर योग्य मार्गदर्शन करून निरोगी आयुष्य जगण्याचा मार्ग योगाच्या प्रशिक्षण देऊन समाधानी करणे.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?