उद्योगसंधी

कसे सुरू कराल मेडिकल शॉप म्हणजेच केमिस्टचे दुकान?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत पण त्याचसोबत औषध हीसुद्धा आजच्या काळाची गरज म्हणावी लागेल. विविध आजार आणि त्यावरील औषधोपचार करताना लागणारी औषध यासाठी प्रत्येकाला औषध खरेदी करावेच लागते.

अशी औषध ही केवळ औषधालये म्हणजेच मेडिकल शॉपमध्येच मिळतात. आपल्या देशात आता खेडोपाडी डॉक्टर पोहचलेत. त्यामुळे औषधालये म्हणजेच मेडिकल शॉपची मागणी वाढतेय. ही एक व्यवसायाची संधी आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

मेडिकल शॉप म्हणजे काय?

डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे एकाच छताखाली उपलब्ध असतात त्याला मेडिकल शॉप म्हणतात. हे सुरू करण्यासाठी योग्य त्या सर्व परवान्यांची आवश्यकता असते. सुरुवात कशी करता येईल तर तुम्हाला दोन वेगवेगळे मार्ग आहेत.

पहिल्या मार्गाद्वारे आपण एक वैद्यकीय दुकान मोठ्या स्तरावर उघडू शकता, ज्यामध्ये आपण एक फार्मासिस्ट पदवीधारक ठेवू शकता आणि आपले दुकान सहजपणे चालवू शकता.

दुसरा मार्ग आपल्यासाठी आहे, की आपण कोर्स करून लहान स्तरावर सहजपणे मेडिकल शॉप उघडू शकता. सर्वप्रथम आपला या क्षेत्रातील अभ्यास असावा लागतो. मेडिकल शॉप उघडण्यासाठी यासंदर्भातील काही कोर्स करावे लागतील किंवा केलेले असावेत. काही कोर्स म्हणजे कोणते त्याची थोडक्यात माहिती पाहू.

डी फार्मा : फार्मा करण्यासाठी विद्यार्थ्याला बारावीमध्ये पीसीएम विषय निवडावा लागेल. नंतर डी फार्माचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. दोन वर्षांच्या या कोर्समध्ये, वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव मिळविण्यासाठी आपल्याला किमान तीन महिने मेडिकल कॉलेजमधून इंटर्नशिप करावी लागते.

एम फार्मा : एम फार्माचा कोर्स करण्यासाठी प्रथम बी फार्माचा कोर्स पूर्ण करावा लागेल. या कोर्सचा कालावधी सुमारे दोन वर्षे आहे. तुम्ही किमान ५० टक्के गुणांसह बी फार्मा अभ्यासक्रम उत्तीर्ण केला असेल तरच हा प्रवेश घेण्यासाठी तुमचा प्रवेश निश्चित केला जाऊ शकतो.

बी फार्मा : हा कोर्स करण्यासाठी सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत स्वत:ला सिद्ध केले पाहिजे, तरच तुम्हाला या कोर्समध्ये प्रवेश मिळू शकेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला हे करायचे असेल तर त्याला बारावीमध्ये पीसीएम विषय निवडावा लागेल. या कोर्सचा कालावधी तीन वर्षे आहे.

फार्मा डी : हा कोर्स पूर्ण करण्यासाठी सर्व प्रथम बारावीमध्ये पीसीएम विषय निवडावा लागेल आणि त्यानंतर बी फार्माचा दोन वर्षाचा अभ्यासक्रमदेखील त्यांना पूर्ण करावा लागेल. फार्मा डी कोर्स करण्यास सुमारे चार वर्षे लागतात, एकूणच हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहा वर्षे द्यावी लागतात.

वरीलपैकी कोणताही कोर्स पूर्ण करून तुम्ही यासाठी पात्र ठरता. पुढे या संदर्भात काम करणार्‍या ठिकाणी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.

आता भाग येतो प्रत्यक्ष दुकानाची सुरुवात करण्याची. पण इथेही प्रथम आपल्याकडे औषध परवाना हवा. कोणत्या स्तरावर सुरुवात केली; छोट्या अथवा मोठ्या तरी दोन्हीसाठी परवाना आवश्यक आहे. राज्य औषध मानक नियंत्रण विभागाकडून दोन प्रकारचे परवाने मिळू शकतात.

किरकोळ औषध विक्रेता परवाना किंवा घाऊक औषध विक्रेता परवाना. त्यानंतर आपण मोठ्या अथवा लहान स्तरावर सुरुवात करू शकतो. औषधालय उघडण्यासाठी जागेची निवड करताना अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा. म्हणजे जिथे एखादे रुग्णालय किंवा जवळपास लहान रुग्णालये असतील.

याचा आपल्या या दुकानाला फायदा होईल. यासाठी सुरुवातीला कमीत कमी पाच ते सहा लाखाची गुंतवणूक आवश्यक आहे. यात आपण छोटेखानी औषधालाय सुरू करू शकतो. फार्मासिस्ट कोर्स, सामान भरणे ही सगळी गुंतवणूकच असेल.

वैद्यकीय दुकान हा एक व्यवसाय आहे, जो कधीही संपणार नाही आणि त्याची मागणीदेखील तेथे कायमची असेल. या व्यवसायाद्वारे आपण दरमहा ८० हजार रुपयांपासून १ लाखापेक्षा अधिक पैसे कमवू शकता. आपल्या ग्राहकाला जपणे आणि त्याच्या गरजेला औषध उपलब्ध करून देणे हे आपल्याला सांभाळायला जमले की आपण व्यवसायात भक्कम पाय रोवून उभे राहू शकतो.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!