उद्योगसंधी

कार अ‍ॅक्सेसरीज व्यवसाय

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आर्थिक महासत्ता होवू पाहणार्‍या भारतात उत्पन्नाच्या संधी दिवसेंदिवस वाढत जातायत. लोकांकडे त्यातूनच पैसाही खेळू लागलाय. आजच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच एक तरी वाहन घरपती पाहायला मिळते. त्यातही आपण कार घ्यावी असे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे ऑटोमोबाइल क्षेत्राची चलती आहे.

एखाद्याने नवी कार आणली तर त्यांच्या अ‍ॅक्सेसरीजसुद्धा आल्याच. जसे कार साउंड सिस्टीम, नंबर प्लेट, व्हील कव्हर, सीट कव्हर, स्टिकर, स्टिअरिंग कव्हर, बंपर, डॅशबोर्डवरील स्टायलिश वस्तू एक ना अनेक. याचसारखी कार अ‍ॅक्सेसरीजची इतर अनेक उत्पादने आहेत आणि या उत्पादन करणार्‍या कंपन्या करोडोंचा व्यवसाय करत आहेत.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

तुम्हीसुद्धा कार अ‍ॅक्सेसरीजच्या व्यवसायाचा विचार करू शकता. सुरुवातीपासूनच चांगली कमाई करू शकता. कोणीही हा व्यवसाय सुरू करू शकते. व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठमोठ्या परवान्यांची आवश्यकता नसते. आस्थापनाची नोंदणी करून जीएसीटी क्रमांक घेवून व्यवसाय सुरू करू शकतो, पण कार आणि त्यातील अ‍ॅक्सेसरीजबद्दल चांगली माहिती असेल तर हे काम तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता.

कार अ‍ॅक्सेसरीज हा बारमाही चालणारा व्यवसाय आहे. बाजारात आज कारची मागणी वेगाने वाढतेय. गरज म्हणून कार खरेदी करणार्‍यांसोबतच स्टेट्स सिंबॉल म्हणूनसुद्धा कार खरेदीकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे कारसोबतच त्याच्या अ‍ॅक्सेसरीजचीही मागणी वाढत आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच नफ्यातच व्यवसाय करू शकता.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काळ ऑनलाइनचा असला तरी या अ‍ॅक्सेसरीज लोकं प्रत्यक्ष पाहून खरेदी करण्यावर जास्त भर देतात, त्यामुळेही या व्यवसायाला चांगला वाव आहे.

व्यवसायाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून आपले खर्च कमीत कमी होतील. भाड्याच्या जागी दुकान सुरू करत असाल तर आजूबाजूचा परिसर, जागेची निवड, जागेचे भाडे या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून निर्णय घ्या. दुकानात माल भरताना विविध अ‍ॅक्सेसरीजचा स्टॉक हा पुरेसा असेल याची काळजी घ्या.

सुरुवातीलाच जर ग्राहकांना असे वाटले की कोणत्याही उत्पादनाविषयी विचारले असता सध्या उपलब्ध नाही असे उत्तर येते तर यामुळे तुमच्याविषयी विश्‍वास निर्माण होण्यास अडथळे निर्माण होतील. जिथे आपण व्यवसाय सुरू केला आहे, त्या ठिकाणी कोणकोणत्या उत्पादनांना जास्त मागणी आहे याची अगोदर माहिती काढावी लागेल जेणेकरून आपण त्या वस्तू किंवा उत्पादने वाढवू.

बाजारात कोण कोणत्या उत्पादनांना जास्त मागणी आहे याची एक यादी आपण करायला हवी. बाजारपेठेचा अभ्यास करून आपल्या दुकानात दोन प्रकारची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली पाहिजेत. एक म्हणजे स्थानिक उत्पादने आणि दुसरी ब्रँडेड.

ग्राहक हा दोन्ही प्रकारची उत्पादने हवी असणारा असणार आहे. ब्रँडेड उत्पादने प्रत्येकालाच परवडणारी नसतात त्यामुळे लोकल उत्पादनांचा पर्यायही आपल्याकडे असेल तर येणार्‍या प्रत्येक ग्राहकाला आपण समाधानी करू शकतो.

मार्केटिंग हे प्रत्येक व्यवसायात अविभाज्य असते. सुरुवातीच्या काळात आपण लोकांना जास्त माहीत नसतो त्यामुळे आपणच आपल्या व्यवसायाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असते. सध्याच्या काळात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे आपण आपले मार्केटिंग सुरू करू शकतो.

सोशल मीडिया हा आजच्या काळात ऑनलाइन मार्केटिंगसाठी सर्वात चांगला आणि कमी खर्चीक पर्याय आहे. आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी याचा वापर जरूर करावा. ऑफलाइन मार्केटिंग करताना, बॅनर, पॅम्पलेट्स, बजेट थोडे जास्त असेल तर होर्डिंग्ज, टीव्ही अ‍ॅड अशा पर्यायांचाही वापर करू शकतो.

व्यवसायाचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त नफा कमावणे हा असतो. कार अ‍ॅक्सेसरीजचा व्यवसाय हा बारमाही चालणारा उद्योग आहे त्यामुळे कमाईसुद्धा चांगली होवू शकते. या व्यवसायात मार्जिनही चांगले असते.

आजच्या काळात जे समोर दिसते ते विकते. यामुळे आपल्या दुकानाची संरचना ही त्यापद्धतीने केलेली असावी. जेणेकरून ग्राहकाची नजर त्यावर खिळली पाहिजे. दुकान पाहून अनेक लोक त्याच्या उत्पादनांविषयी अंदाज तयार करतात. त्यामुळे ग्राहकांचा विश्‍वास यावर निर्माण होण्यास मदत होते.

वर म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे एखादी वस्तू नाही असे ग्राहकाला वाटू नये किंवा एखादी वस्तू आपल्याकडे नसेल तर ग्राहकाला ती उपलब्ध करून देण्याची हमी द्यावी आणि दिलेली वेळ आणि शब्द पाळावा यातूनच आपले ग्राहकाशी चांगले संबंध प्रस्थापित होतील.

आपल्या सेवेविषयी ग्राहकांचा नेहमी अभिप्राय घ्या. आपल्या दुकानात नेहमी दर्जेदार उत्पादने ठेवण्यावर भर द्या. आपल्याला होलसेलमध्ये जिथून चांगला माल मिळेल अशी ठिकाणं शोधून ठेवली की आपला फायदा होईल. विविध ऑफर्स, सेल अशा क्‍लुप्त्या लढवून ग्राहकांना आपण आपल्यापर्यंत आणू शकतो. दुकानाची स्वच्छता, टापटिपपणा याही गोष्टींची योग्य ती खबरदारी घ्यावी.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!