स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
कधीच कुठे वेळेवर पोहोचत नाही, नेहमी उशीर करतो, इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार पोहोचतो, लेट लतिफ वगैरे वगैरे अशी लोकांकडून तुम्ही नेहमी बोलणी खात असाल तर या लेखात सांगितलेल्या गोष्टी करा आणि उशीर करण्याची वाईट सवय सोडा.
वेळेआधी पोहोचा : कुठेही दिलेल्या वेळेत पोहोचायचे असेल, उशीर होऊ द्यायचा नसेल तर कमीत कमी दहा मिनिटे आधी तरी पोहोचण्याचे लक्ष्य ठेवा. मुळात “वेळेवर पोहोचणे म्हणजे वेळेआधी पोहोचणे”, ही सवयच लावून घ्या.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
अगदी घराशेजारी अगदी ५ मिनिटांच्या अंतरावर जायचं असेल म्हणून फक्त पाच मिनिटंआधी घर सोडलंत आणि जाता जाता चप्पल तुटली, ठेच लागली अशा कोणत्याही कारणाने वेळेवर न पोहोचता दहा-पंधरा मिनिटांचा उशीर करू शकता. म्हणून वेळेवर म्हणजे वेळेआधी ही सवय स्वतःला लावा.
आलार्म लावा : अनेकदा आपण एखादी गोष्ट विसरतो म्हणून उशीर होतो. यावर तोडगा म्हणजे पुरेसा वेळ आधी अलार्म लावा. आता प्रत्येकाच्या हातात असलेल्या स्मार्टफोनमध्ये ही सोय आहेच. आलर्म लावल्यामुळे तुम्ही विसरला जरी असाल तरी पुरेसं आधी तुम्हाला आठवण होईल आणि तुम्ही उशीर करणं टाळू शकता.
निघता निघता येणाऱ्या गोष्टींना स्पष्ट नकार द्या : ऑफिसला किंवा मीटिंगला वेळेवर पोहोचायचं आहे, पण घरातून निघता निघता आईने किंवा बायकोने समोर चहाचा कप आणला. चहा घेण्यात पाच मिनिटं गेली. पाच मिनिटांच्या उशिराने पुढची ट्रेन किंवा बस सुटली. रिक्षा किंवा कॅब केली ती ट्रॅफिकमध्ये अडकली आणि अशाप्रकारे उशीर झाला. ही अशी उशीर होण्याच्या कारणांची मालिका तोडायची असेल तर निघता निघता उशीर होऊ शकेल अशा ऐनवेळी निघणाऱ्या सगळ्या गोष्टींना तिथेच नकार द्या आणि वेळेवरच निघा.
मन विचलित करणाऱ्या गोष्टी टाळा : तुम्हाला उशीर न करता एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचायच असेल तर फक्त त्यावरच लक्ष्य केंद्रित करा. फोकस व्हा. त्या वेळात सोशल मीडिया, YouTube व्हिडिओ वगैरे बघू नका. या फावल्या वेळेत करायच्या गोष्टी आहेत. त्या फावल्या वेळेतच करा. नाही तर रील स्क्रोल करता करता किती वेळ वाया घालवाल आणि उशीर कराल हे कळणारच नाही.
वेळेचं नियोजन सुटसुटीत करा : एकाच वेळी किंवा दिवसांत तुम्हाला अनेक कार्यक्रम, उपक्रम असतील तर त्यांचं नियोजन करताना मधला निवांत वेळ हा पुरेसा आणि सुटसुटीत द्या. दोन ठिकाणांच्या मधले अंतर जास्त असेल तर प्रवासात लागू शकणारा जास्तीचा वेळ, ट्रॅफिक इत्यादी गोष्टीसुद्धा त्यात मोजा. असं सुयोग्य नियोजन असेल तरच तुम्ही एकाच दिवसांत वेगवेगळ्या गोष्टी वेळेत म्हणजे उशीर न होऊ देता करू शकाल.
उशीर झालाच तर…
इतकं काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध पालन करून ही जर कुठे उशीर होतच असेल तर प्रथम तिथे फोन करून कळवा. त्या ठिकाणी पोहोचल्यावर जे तुमची वाट पाहत होते त्यांच्या वाया गेलेल्या वेळेबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करा.
तुम्ही दुसऱ्यांच्या वेळेची किंमत करू लागलात तरच लोक तुमच्या वेळेची आणि तुमची किंमत करू लागतील. अन्यथा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बेजबाबदार व्यक्ती असाच होईल.
– शैलेश राजपूत
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.