व्यक्तिमत्त्व विकास

वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरा हे ९ फॉर्म्युले

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


वेळेचे व्यवस्थापन ही प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट असते. कळतंय पण वळत नाही, अशी आपल्या प्रत्येकाचीच अवस्था असते. प्रत्येकाच्या आयुष्यात दिवस हा चोवीस तासांचाच असतो, पण त्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे अनेकांचा वेळ वाया जातो. याउलट जे त्याचे योग्य नियोजन करतात, त्यांच्या आयुष्यात यश, संपत्ती, सुख, समाधान अशा अनेक गोष्टींचे पदार्पण होताना दिसते.

आता ज्यांना वेळेचे नियोजन कळत नाही अशी लोक मागे राहतात, पण ज्यांना यावर मात करायची आहे त्यांना वेळ वापरण्याची समज म्हणजे वेळ व्यवस्थापन कौशल्य समजून घ्यायला हवे. वेळेचे व्यवस्थापन करण्याच्या चांगल्या कौशल्यांद्वारे तुम्ही तुमची सर्व कामे दिलेल्या वेळेत यशस्वीपणे पूर्ण करू शकता.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

वेळचे व्यवस्थापन हे एक सॉफ्ट स्किल आहे. वेळेचे व्यवस्थापन म्हणजे तुम्ही तुमचा दिवसभराचा वेळ कसा वापरता किंवा कोणती कामे तुमचा वेळ जास्त घेतात याचा अभ्यास करून या सगळ्याचे योग्य व्यवस्थापन करणे याला टाईम मॅनेजमेंट म्हणतात.

अनेक वेळा आपल्याला खूप काम असतं. या काळात जर आपल्याकडे वेळ व्यवस्थापनाचं कौशल्य असेल तर काम करणं सोपं जातं. नोकरी करताना टाइम मॅनेजमेंट कौशल्याची सर्वात जास्त गरज असते, जिथे सर्व कामे निर्धारित वेळेत यशस्वीपणे पूर्ण करणे आवश्यक असते.

वेळ व्यवस्थापन कौशल्य महत्त्वाचे का आहे?

वेळेचा योग्य वापर करणे आजकाल अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाला आपल्या वेळेचा उपयोग जीवनात पुढे जाण्यासाठी तसेच यश मिळवण्यासाठी करायचा असतो, परंतु बर्‍याच लोकांना वेळ व्यवस्थापन कौशल्य माहीत नसते, ज्यामुळे ते त्यांची कामं वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत. वेळेचे व्यवस्थापन कौशल्य वेळेचे मूल्य समजवते व त्याचा योग्य वापर कसा करायचा हेही शिकवते.

१. कामाचे नियोजन करावे

वेळेचा योग्य वापर करण्यासाठी कामाचे नियोजन आवश्यक आहे. नियोजन ही वेळ व्यवस्थापन कौशल्याची सर्वात महत्त्वाची पायरी आहे, कारण कामाच्या चांगल्या नियोजनाशिवाय तुम्ही वेळेचा योग्य वापर करू शकत नाही. नियोजन करताना तुम्ही करावयाच्या कामांची यादी तयार करा, जेणेकरून तुमचा जास्त वेळ विचारात जाणार नाही आणि वेळेचे नुकसानसुद्धा टाळता येईल. यासोबतच आपली सर्व कामे वेळेवर आणि यशस्वीपणे संपतात.

२. सर्व कामे प्राधान्यक्रमानुसार ठेवा

जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व कामांना योग्यरीतीने प्राधान्य देता, तेव्हा तुम्हाला समजते की कोणते काम आधी केले पाहिजे. म्हणूनच वेळेचे व्यवस्थापन करताना तुमच्या सर्व कामांना योग्य महत्त्व देऊन तुम्ही सर्व कामे सहज करू शकता. प्राधान्य देण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला करावयाच्या कामांची यादी तयार करा, जेणेकरून तुम्हाला कोणते काम कधी करायचे आहे तसेच कोणते काम अधिक आवश्यक आहे हे कळेल?

यासाठी तुम्ही तुमच्या कामाचे वर्गीकरण करू शकता. जेणेकरून तुमच्यासाठी कोणते काम सर्वात महत्त्वाचे आहे हे कळू शकेल. तुमच्या वर्गीकरणात तुम्ही अधिक महत्त्वाची अशी ‘अ’ श्रेणी, त्यानंतर त्यापेक्षा थोडी कमी महत्त्वाची अशी ‘ब’ श्रेणी, त्याखालोखाल त्यापेक्षा कमी महत्त्वाची अशी यादी करून कामांचा प्राधान्यक्रम ठरवू शकता.

३. विचलीत होवू नका

तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर ठेवावे लागेल. मन विचलीत होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. यासाठी तुम्ही तुमच्या कामाची वेळ इतर सदस्यांना सांगू शकता; जेणेकरून तुम्ही काम करत असताना मध्येच येऊन कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही. असे केल्याने तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करून वेळेत काम पूर्ण कराल.

४. काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत लिहावी

कामाचे नियोजन तुम्ही कितीही चांगले केले तरी ते काम कोणत्या वेळेत पूर्ण करायचे आहे, हे जोपर्यंत तुम्ही लिहीत नाही तोपर्यंत कोणतेही काम वेळेत पूर्ण करता येणार नाही, त्यामुळे कामाच्या माहितीसह ते किती वेळेत पूर्ण करायचे आहे ते लिहिणेदेखील बंधनकारक आहे, तरच तुमचे वेळ व्यवस्थापन कौशल्य चांगले होईल.

५. वेळ व्यवस्थापन साधन वापरा

वेळ व्यवस्थापन कौशल्य चांगले होण्यासाठी तुम्ही तंत्रज्ञानाचीदेखील मदत घेऊ शकता. हल्ली अनेक टुल्स आणि अ‍ॅप्लिकेशन्स आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही वेळेची संपूर्ण नोंद ठेवून वेळेचा योग्य वापर करू शकता.

६. कामाच्या दरम्यान ब्रेक घेणे आवश्यक आहे

तुम्ही तुमचे काम दिवसभर सतत करू शकत नाही, तुम्हाला मध्ये मध्ये थोड्या विश्रांतीचीही गरज असते. हे करणे महत्त्वाचे आहे कारण जेव्हा तुम्ही कामातून थोडी विश्रांती घेता तेव्हा तुम्ही ते काम अधिक चांगल्या पद्धतीने करता. तुम्ही पाहता की सर्व यशस्वी लोक त्यांच्या कामाच्या दरम्यान ब्रेक घेतात, ज्यामुळे त्यांची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य वाढते.

७. सर्व काही क्रमाने ठेवा

तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात त्या ठिकाणी सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवणे फार महत्त्वाचे आहे. बहुतांश वेळ हा तुमचा कामाशी संबंधित गोष्टी शोधण्यात जातो.

८. एका वेळी एकच गोष्ट करा

जर तुम्हाला जास्त कामे करायची असतील तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व कामे एकाच वेळी करण्याचा प्रयत्न कराल. मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळी अनेक कामे करणे. नेहमी एका वेळी एकच गोष्ट करा. कारण जे लोक मल्टी टास्किंग करतात, त्यांच्यापेक्षा एका वेळी एक गोष्ट करणारे आपल्या कामाला जास्त चांगला न्याय देतात.

९. योग्य वेळ निवडा

प्रत्येक कामाची एक वेळ ठरलेली असते. तसेच व्यक्तीश: प्रत्येकाला दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहराला काम करायची आवड असते किंवा गरज असते. त्यामुळे प्रथम आपण आपल्या कामाची वेळ ठरवायला हवी. जेणेकरून त्या काळात तुम्ही तुमच्या कामात अधिक यशस्वी होऊ शकाल आणि यावेळी तुम्ही कोणतेही काम केले तर ते सर्वोत्तम होईल.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!