इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग व्यवसाय कसा सुरू कराल?

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती आणि मागणीमुळे खरंतर ऑटोमोबाइल क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. यावर उपाय म्हणून भारतासह अनेक देश हे इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. सर्वसामान्य जनतेला याचा त्रास जास्त होतो. जगभर इलेक्ट्रिक वाहनाला प्राधान्य दिलं जातंय. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आता भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर विशेष लक्ष देत आहे.

भारतात नुकतीच इलेक्ट्रिक वाहनांची सुरुवात होत आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीने इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा व्यवसाय सुरू केला तर आतापासून त्याला खूप चांगले फायदे मिळू लागेल.

जेव्हा भारतात जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने धावू लागतील तेव्हा त्याचा व्यवसाय खूप वेगाने वाढेल. म्हणूनच, जे लोक इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्याकडे लक्ष देत आहेत त्यांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन व्यवसाय कसा सेट करायचा किंवा व्यवसाय कसा सुरू करायचा हे जाणून घेवू.

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन काय आहे?

सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल वाहनांसाठी ज्याप्रमाणे ठिकठिकाणी पेट्रोल पंप बसवण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे.

जेणेकरून जे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात, ते चार्जिंग कमी असताना किंवा बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनमधून काही पैसे देऊन त्यांचे वाहन चार्ज करू शकतात.

अशा अनेक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन स्थापन करणार्‍या कंपन्या भारतात उदयास येत आहेत. लोकांना त्यांच्यासोबत भागीदारी करून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन व्यवसाय सुरू करण्याची संधी देतात. जर तुमच्याकडे चांगला निधी असेल तर तुम्ही तुमचे स्वतःचे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करू शकता किंवा तुम्ही एखाद्या कंपनीची फ्रँचायझीदेखील घेऊ शकता.

चार्जिंग स्टेशन कुठे उघडायचे?

तुम्ही मोठ्या बस स्टँडच्या बाहेर, रेल्वे स्टेशनच्या बाहेर, पेट्रोल पंपाजवळ किंवा शॉपिंग मॉलजवळ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करू शकता. याशिवाय महामार्गाच्या बाजूला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनही उभारण्यात येत आहेत.

चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी काय करावे?

तुमचे स्वतःचे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी तुम्ही थेट भारताच्या उर्जा मंत्रालयाकडे अर्ज करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, एखाद्या प्रसिद्ध कंपनीची फ्रँचायझी घेऊनही तुम्ही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा व्यवसाय सुरू करू शकता, कारण भारतात सध्या अनेक कंपन्या त्याची फ्रेंचायझी देत आहेत.

चार्जिंग स्टेशनसाठी लागणारा खर्च

तुम्हाला तुमचे स्वतःचे चार्जिंग स्टेशन उघडायचे आहे की कंपनीची फ्रँचायझी घेऊन हा व्यवसाय करायचा आहे यावर गुंतवणूक ठरते, परंतु या व्यवसायात गुंतवणूक ही मोठी लागते.

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागेल. यामध्ये वेळोवेळी बदलही होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमांच्या बाबतीत तुम्हाला कायम updated राहण्याची गरज आहे.

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन व्यवसायातील नफा

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची कमाई तुम्ही वाहन मालकांकडून चार्जिंगसाठी किती पैसे आकारता यावर तसेच तुमच्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा प्रकार आणि किंमत यावर अवलंबून असते. एक मात्र नक्की की या व्यवसायाला भविष्यात खूप वाव आहे. म्हणूनच जो माणूस आतापासून या व्यवसायात उतरलात तर पुढे या व्यवसायात खूप फायदा आहे.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?