कमजोर पुरवठा साखळी हे तुमच्या अपयशाचे मोठे कारण असू शकते

आपण कधी विचार केला आहे की; आपण कोणतीही वस्तू ऑर्डर केल्यावर ती इतक्या लवकर आपल्यापर्यंत कशी पोहोचते? कोणत्याही कंपनीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहक आणि त्याच्या गरजा समजून घेऊन त्याच्यापर्यंत वस्तू पोहोचवणे हेच असते.

जेव्हा एखादे उत्पादन कारखान्यात तयार झाल्यानंतर ग्राहकापर्यंत पोहोचते तेव्हा त्याचे विविध घटक एक साखळी तयार करतात, ज्याला पुरवठा साखळी म्हणतात. कोणताही माल या साखळीतून गेल्याशिवाय ग्राहकापर्यंत पोहोचू शकत नाही. आज आपण ही पुरवठा साखळी काय आहे आणि व्यवसायाच्या यशात तिची भूमिका काय आहे हे जाणून घेवू.

पुरवठा साखळी म्हणजे काय?

जेव्हा एखादी वस्तू कंपनीमध्ये बनवली जाते, तेव्हा त्या वस्तूचा कच्चा माल मिळण्यापासून ते ती वस्तू बनण्यापर्यंत आणि ग्राहकापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया ज्या साखळीतून पार पडते त्याला पुरवठा साखळी म्हणतात. कोणत्याही व्यवसायात या साखळीशिवाय माल ग्राहकापर्यंत पोहोचू शकत नाही.

पुरवठा साखळीचे विविध घटक

कोणत्याही व्यवसायासाठी, बनवलेला माल सतत ग्राहकापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. त्यासाठी योग्य पुरवठा साखळी असणे अत्यंत आवश्यक असते. पुरवठा साखळीतील महत्त्वाचे घटक जाणून घ्या.

कच्चा माल : कोणत्याही वस्तूच्या निर्मितीसाठी प्रथम कच्चा माल लागतो, जो प्रत्येक व्यवसायासाठी वेगळा असतो. पुरवठा साखळीतील पहिली कडी ही कच्चा माल उत्पादक हा आहे. कोणताही व्यवसाय सुरू करताना त्याला कच्चा माल सहज मिळू शकेल हे पाहणे आवश्यक असते.

यासाठी ज्या ठिकाणी व्यवसाय असतो त्याच्या आजूबाजूला कच्च्या मालाचे निर्मातेदेखील असतात. पण असे अनेक व्यवसाय आहेत ज्यात कच्चा माल मिळणे कठीण असते. त्यामुळे अशा परिस्थितीत कच्चा माल सहज उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करावी लागते.

निर्माता : कच्च्या मालाचा पुरवठा झाल्यावर त्या उत्पादनाची निर्मिती सुरू होते. हा व्यवसायाच्या पुरवठा साखळीचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कच्चा माल मिळताच तो कच्चा माल तयार मालामध्ये परावर्तित केला जातो. माल तयार झाला की तो पुढच्या टप्प्यावर जायला तयार होतो.

वितरक : उत्पादकाने माल तयार केल्यावर तो पुरवठा साखळीतील पुढच्या घटकाकडे पाठवला जातो. अनेक कंपन्यांचे अधिकृत डीलर असतात. तसेच अनेक मोठे व्यापारीही कंपनीचा माल मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, त्यांना वितरक म्हणतात.

किरकोळ विक्रेता : वितरक किंवा विक्रेता त्याचा नफा जोडून किरकोळ विक्रेत्याला वस्तू विकतो. किरकोळ विक्रेता हा ग्राहकांना वस्तू पोहोचवण्याचा शेवटचा दुवा असतो. वितरक किंवा डीलर्स मोठ्या प्रमाणात मालाची ऑर्डर घेतात, परंतु किरकोळ विक्रेते त्यांच्याकडून थोडा थोडा माल घेवून विकतात.
आपल्या आजूबाजूचे दुकानदार हे किरकोळ विक्रेते आहेत. त्यानंतर माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवला जातो.

ग्राहक : पुरवठा साखळीतील शेवटचा दुवा ग्राहक असतो. जे काही साहित्य निर्माण होते, त्याचा उद्देश इथेच संपतो. यानंतर मालामध्ये काही गडबड असल्यास ग्राहकाला तो परत केला जातो किंवा बदलून दिला जातो. उत्पादनास कोणत्याही प्रकारच्या सेवेची आवश्यकता असल्यास, तीदेखील दिली जाते.

व्यवसायात पुरवठा साखळीची भूमिका

पुरवठा साखळीच्या घटकांमध्ये, प्रत्येक घटक आवश्यक आहे. कोणत्याही व्यवसायाच्या प्रगतीसाठी ग्राहकांची प्रत्येक मागणी वेळेवर पूर्ण करणे आवश्यक असते. जेव्हा ही सारी साखळी चांगली चालते, तेव्हाच व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. आजच्या काळात, स्टार्टअप किंवा व्यवसाय अयशस्वी होण्याचे मुख्य कारण म्हणजे योग्य पुरवठा साखळीचा अभाव हा असतो.

ज्याप्रमाणे साखळीतील प्रत्येक दुवा मजबूत असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे व्यवसाय यशस्वी होण्यासाठी त्याच्या पुरवठा साखळीतील प्रत्येक घटक योग्य रीतीने आणि नेहमी कार्यरत असणे आवश्यक आहे.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?