Business deal यशस्वी करण्यासाठी या टिप्स follow करा

व्यवसायात वाटाघाटी करणं हे नेहमीच एक आवाहन असतं, अशावेळी एकमेकांचा फायदा दाखवण्यात जर यश आलं तर बोलणी यशस्वी होतातच. यासाठी आपण पुढील तेरा गोष्टी नक्कीच उपयोगी ठरतात :

१. एकमेकांच्या दीर्घकालीन फायद्यांचा विचार करा : Win-win situation म्हणजे सामायिक लाभ. यासाठी फक्त स्वतःचा वैयक्तिक फायदा बाजूला ठेऊन दोन्ही बाजूंचा कसा फायदा होईल, यावर लक्ष केंद्रित करा.

२. सुरुवातीपासूनच मीटिंगमध्ये विश्वास आणि सहकार्य ठेवा : विश्वास आणि परस्परांविषयी आदर यांच्या आधारेच विन-विन परिस्थिती निर्माण करता येते. त्यासाठी १) एकमेकांचा फायदा करून देण्याची ईच्छा व्यक्त करा, २) दीर्घकालीन नातं हवं असल्याची इच्छा बोलून दाखवा, ३) परस्पर हित दर्शवणारे शब्द आपल्या शब्दसंग्रहात वाढवा, ४) तुमची सेवा देण्याची ईच्छा आणि प्रामाणिकपणा पुराव्यांतून दाखवा.

३. पूर्वतयारी करा : मीटिंगमध्ये विचारले जाऊ शकतील, अशा प्रश्नांची उत्तरं शोधा. समोरील ग्राहक किंवा पार्टीची अपेक्षा आणि ईच्छा न जाणून घेता बोलणी सुरू करू नका.

४. प्रथम पुरुषी अनेकवचनी शब्द वापरा : आपले, आपण, आपल्याला असे प्रथमपुरुषी अनेकवचनी शब्द परस्परांचा फायदा ठळकपणे दर्शवतात आणि आपली टीमवर्कची इच्छा दाखवतात.

५. पदांपेक्षा हेतुवर ध्यान द्या : पद हे हवेहवेसे असते, तर हेतू ते कसे मिळवायचे ते सांगतात. एकदा तुम्ही काय करायचे यावरून, का करायचे यावर लक्ष वळवलं की, आपोआपच चर्चा मागणीच्या संभाव्य नकारात्मकतेवरून सामायिक गरजांच्या सकारात्मकतेवर स्थलांतरित होते.

६. वाटाघाटीतील मुद्दे वाढवा : तुम्ही सोडवू शकत असेलेले मुद्दे जितके वाढतील, तितकीच परस्परांना फायदे देणारे परिणाम मिळण्याच्या शक्यता वाढतात. यातून तुम्हा दोघांनाही काही तरी मूल्यवान फायदे होतील.

७. ‘आर या पार’ची परिस्थिती टाळा : ‘घ्या किंवा सोडा’ या दृष्टिकोनातून दबाव निर्माण होतो व पर्यायांवर मर्यादा निर्माण होते. स्वतःला किंवा समोरील व्यक्तीला टोकाच्या परिस्थितीत ढकलू नका. यातून दोघांपैकी एकाला काहीतरी गमावल्याची भावना येईल.

८. देण्यातून मिळवा : तुमची सेवा देण्याची ईच्छा दर्शवा आणि समोरील व्यक्तीला हवं तितकं घेऊ द्या.

९. वाटाघाटीच्या भावनेत स्वतःला अडकू देऊ नका :

आपलं मानसिक स्थैर्य आणि ध्येयनिष्ठा राखून ठेवा. रागामुळे तुम्ही व्यवहारातील समाधान किंवा व्यवहार गमावून बसता.

१०. आपली ऊर्जा प्रश्न नावीन्यपूर्णपणे सोडवण्यावर गुंतवा : तुम्ही किंवा समोरील व्यक्ती सोडवू पाहत असलेला प्रश्न साध्या शब्दांत व्यक्त करता येतो. एकमेकांचा जास्तीत जास्त फायदा करून देणारी, एकेमकांचे किमान नुकसान करणारी, दोन्ही बाजूंना न्याय्य असलेली डील कशी करता येईल?

या तिन्ही गोष्टी एकत्रित साधणाऱ्या सर्व पर्यायांवर विचार करा. या सर्वांतून दोघांनाही जमेल असा पर्याय निवडा.

११. मूल्यवर्धनाचे वेगवेगळे मार्ग शोधत राहा : आपल्याला काय हवं आहे, यापेक्षा समोरील व्यक्तीला जे हवं आहे ते जास्तीत जास्त मूल्यवर्धित करण्याचे विविध मार्ग शोधताना कोणतीही शक्यता सोडू नका.

१२. हळूहळू आणि छोटी छोटी वाढ करत सवलती द्या : बोलणी करताना एकत्र, अचानक, मोठी आणि गंभीर सवलत देण्यापेक्षा छोट्याछोट्या टप्प्यांमधून सवलती देणं जास्त योग्य ठरते. अशा सवलती द्यायला सोप्या आणि कमी भीतीचे असते.

१३. संपूर्ण व्यवहार लेखी करा : व्यवहार मोडू शकेल अशा कोणत्याही गैरसमजाची शक्यता टाळा, अन्यथा दोन्ही बाजूंमध्ये नुकसान झाल्याची भावना निर्माण होऊन एकमेकांचा वेळ फुकट जाईल.

या पुढे वाटाघाटी करायला जाण्यापूर्वी वरील तेरा गोष्टींची तयारी नक्कीच समाधानकारक व्यवहार साकारण्यासाठी सहाय्यक ठरतील.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?