स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक भेटतात. आपल्यावर अनेकांचा प्रभाव पडतो. अनेक यशस्वी माणसे आपण पाहत असतो. या सगळ्या यशस्वी लोकांची जगण्याची काही सूत्रं असतात. त्यांच्या यशामागे, प्रसिद्धीमागे कठोर मेहनत असते. अनेक वेळा अपयशही असते. तरीही ते या सगळ्यावर मात करत यशाच्या एका टप्प्यावर पोहोचलेले असतात.
असे सर्व लोक, जे आज आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत, त्या सर्वांमध्ये काही ना काही गुण किंवा सवयी समान असतात. ज्यामुळे ते आज त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज बनलेले आहेत. यशस्वी लोकांनी त्यांच्या आयुष्यात जे गुण किंवा सवयी केवळ अंगिकारल्या नाहीत तर त्यांचे नेहमीच पालन केले. आपण अशाच काही गुणांबद्दल, सवयींबद्दल जाणून घेवूयात.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
अपयशातून शिका : सर्व यशस्वी लोक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले असे कधीच होत नाही. यशस्वी होण्यापूर्वी त्यांनी आयुष्यात अनेकदा अपयशाची चव चाखलेली असते. आपल्या अपयशाकडे निराश होऊन बघण्यापेक्षा ते अपयशाचे विश्लेषण करतात. त्या विश्लेषणाच्या आधारे त्यांच्या चुकांमधून शिकतात. तुम्हालाही जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर अपयशाला घाबरण्याऐवजी त्यातून शिका आणि आयुष्यात पुन्हा उभारी घ्या.
कामासाठी पूर्ण समर्पण : यशस्वी लोकांच्या सर्वोत्तम गुणांपैकी एक म्हणजे १०० टक्के समर्पण. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तरी तुम्ही तेच काम केले पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही पूर्ण झोकून देऊन काम करू शकता. जेव्हा तुम्ही कोणत्याही कामात तुमचे पूर्ण समर्पण द्याल आणि अर्जुनाप्रमाणे एकाग्र राहाल, तेव्हा यश तुमच्या पायाशी येईल.
वेळेचा सदुपयोग करा : आपल्या सर्वांच्या आयुष्यात वेळ ही सर्वात महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांना थोडा वेळ मिळाला की ते वाया घालवू लागतात. पण यशस्वी लोकांची ओळख हीच असते की ते दिवसातील प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करतात. तुम्हाला माहीत आहे का की; बिल गेट्स जेव्हा सुट्टीवर जातात तेव्हाही ते काही पुस्तके सोबत घेऊन जातात. तुमचा मोकळा वेळ तुम्ही तुमच्या करिअरसाठी कसा वापरायचा हे तुम्ही ठरवायचे आहे.
योग्य वेळी योग्य गोष्टी करणे : मेहनत केली तर यश नक्की मिळेलच असं नाही. तुम्हाला आनंद देणारे काम तुम्ही केले पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीची एखादी गोष्ट करता तेव्हा तुम्ही त्यामध्ये उत्तम होता.
स्व-मूल्यांकन करणे आवश्यक : जेव्हा तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असते, तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला स्वतःचे मूल्यमापन करावे लागते. जेव्हा तुम्ही स्वतःचे मूल्यमापन करता तेव्हा तुम्हाला तुमची ताकद, तुमचा कमकुवतपणा आणि तुमची कौशल्ये कळतात. जेव्हा तुम्ही हे कराल, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकता.
– टीम स्मार्ट उद्योजक
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.