स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
हे तंत्रज्ञानाचे युग आहे, प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल आला आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस हा डिजिटल होत आहे. आजच्या काळात उद्योजकांना आपली उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटली खूप मदत मिळते. त्याच्या रोजच्या कामात त्याला मदत म्हणून अनेक प्रकारची अॅप उपलब्ध आहेत.
याउलट काही वर्षांपूर्वीचा विचार केला तर, जेव्हा सर्वकाही हाताने करावे लागत असे, तेव्हा लोक त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी जी साधन वापरत, ती वेळखाऊ होती. उदाहरण पाहायचे झाले तर; काही महत्त्वाची गोष्ट करताना ती लक्षात ठेवण्यासाठी ती नोटपॅडवर लिहून ठेवली जाई.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
महत्त्वाची कागदपत्रे फाईल केली जात. हाताने पत्र लिहली जात किंवा नंतरनंतर टंकलेखनाद्वारे ती लिहिली जात. टाइपरायटर, शॉर्ट हँड, नोटपॅड, डायरी अशी साधने ही आपली कामे सुखकर करण्यासाठी मदत करत असत. पण काळ बदलला.
काळानुसार अनेक नवी साधने उपलब्ध झालीत. आपल्या कामाला सोपं आणि सुटसुटीत करण्यासाठी अनेक चांगले अॅप्स आज उपलब्ध आहेत. तर आज आम्ही तुम्हाला तुम्ही डिजिटली तुमची उत्पादकता वाढवताना कोणत्या कोणत्या अॅपची मदत घेवू शकता याविषयी या लेखात माहिती देत आहोत.
१) गुगल कॅलेंडर : यशस्वी लोक नेहमी वेळेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देतात. पूर्वी या नियोजनासाठी मॅन्युअली अनेक पद्धती होत्या, पण आता यासाठी एक साधे आणि मोफत अॅप उपलब्ध आहे आणि ते म्हणजे गुगल कॅलेंडर. तुम्ही गुगल कॅलेंडरमध्ये तुमच्या मीटिंग, अपॉइंटमेंट, दैनंदिन कामे इत्यादींबद्दल आधीच reminder सेट करू शकता.
त्या बैठकीची किंवा कार्याची वेळ जवळ येताच गुगल कॅलेंडर तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सूचित करेल. जेणेकरून तुम्ही ते कार्य पूर्ण करू शकाल.
२) मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट : कोणत्याही कार्यालयात डेटाबेस, प्रेझेंटेशन आणि डॉक्युमेंट्स इत्यादी खूप महत्त्वाचे असतात. सध्या या कामांसाठी प्रत्येकजण मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट वापरतात. मायक्रोसॉफ्ट ऑफिस डेटाबेससाठी, विविध गणनेसाठी एमएस एक्सेल, कागदपत्रांसाठी एमएस वर्ड आणि सादरीकरणासाठी एमएस पॉवरपॉइंट वापरले जाते.
३) गुगल ड्राइव्ह : गुगल आता ऑनलाइन जागा उपलब्ध करून देते. गुगल ड्राइव्हमध्ये गुगल शीट, गुगल डॉक्युमेंट, गुगल स्लाईड्स इ. अनेक फंक्शन्स आहेत ज्याद्वारे मोबाईलच्या मदतीने ते कुठेही ऑपरेट करता येतात. आता जर तुम्ही डॉक्युमेंट, पीपीटी किंवा एक्सेल फाईल बनवून ती गुगल ड्राइव्हवर अपलोड केली तर ती कुठूनही सहज access करू शकता.
४) गुगल टास्क : पूर्वीच्या काळी लोक दैनंदिन काम करण्याआधी त्यांच्या कामाची यादी वहीत बनवत असत. तीच गोष्ट करण्यासाठी आज गुगल टास्क आहे. तुम्ही गुगल टास्कमध्ये तुमची टू-डू-लिस्ट ऑनलाइन तयार करू शकता. यासोबतच ते जीमेल आणि गुगल कॅलेंडरशी आपोआप लिंक होते. यामध्ये तुम्ही तुमच्या टास्कची डेडलाइनदेखील ट्रॅक करू शकता.
५) स्टिकी नोट्स : तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या दैनंदिन कामांसाठी वर नमूद केलेले अॅप वापरू शकता, पण जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असता तेव्हा दिवसभरात तुमच्यासमोर अनेक छोटी पण महत्त्वाची कामे येत असतात. या सर्व कामांसाठी तुम्ही स्टिकी नोट्स वापरू शकता.
स्टिकी नोट्स हे छोटे कागद आहेत ज्यावर तुम्ही तुमच्या ऑफिस डेस्कवर किंवा इतर कुठेही काहीही लिहू शकता. स्टिकी नोट्स डिजिटल स्वरूपातदेखील उपलब्ध आहेत. जेव्हा तुम्ही स्टिकी नोट्स अॅप उघडता आणि काहीतरी महत्त्वाचे लिहून सेव्ह करता तेव्हा ते फक्त तुमच्या स्क्रीनवर दिसते. यासह तुम्हाला ते महत्त्वाचे काम आठवते.
आजच्या डिजिटल युगात हे काही सोपे गुगल अॅप्स आहेत, ज्याद्वारे डिजिटल पद्धतीने आपण उत्पादकता वाढवू शकतो.
– टीम स्मार्ट उद्योजक
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.