शेअर मार्केटसाठी संवत २०८० कसे असेल?

मागचे तीन संवत जे मी सांगत आलेलो आहे, तेच मी सांगणार आहे. मार्केटचा मुड पूर्ण पॉझीटिव्ह आहे.

२०२० मध्ये २७००० असणारा सेन्सेक्स आज ६५००० वर आहे. अचानक आलेल्या आपत्तीमुळे सेलिंग प्रेशर निर्माण झाले होते. त्यामुळे चांगल्या कंपन्या अगदी स्वस्त व्हॅल्यूएशनला उपलब्ध होत्या. त्यावेळी मी व्हिडिओ केला होता, हीच ती वेळ..

काय म्हणता, तुम्ही बस मिस केली.

घाबरु नका, बस मिस होत नाही.

ज्यांनी १९९० मध्ये विप्रोत अमुक अमुक टाकले त्यांचे आज एवढे झाले असे तुम्ही वाचले असेल ना? ती संधी मार्केट कायम देते.

त्यामुळे, आजही तुम्ही मार्केट मध्ये गुंतवायला सुरूवात केलीत तर तो उशीर नसेल. सगळे एकत्र गुंतवू नका. दर महिन्याला थोडं थोडं गुंतवत जा. प्रत्येक महिन्याला ₹५,०००/-.

तर मार्केटचा मुड पॉझिटीव्ह आहे. होय! दोन युद्धे आपण डिस्काउंट केलेली आहेत. त्यामुळे वर खाली होणारे कृड ऑईलचे भाव, रुपयाच्या तुलनेत वाढत गेलेला डॉलर, हे सगळं डिस्काउंट करूनही मार्केट आज ६५००० वर उभे आहे.

याचे कारण आहे, इंडिया इंक म्हणजे आपल्या भारतीय कंपन्यांचा दमदार परफॉर्मन्स. महिंद्रा, लार्सन, टाटा मोटर्स, इन्फोसिस, एसबीआय, भारतीय रेल्वे, डिफेन्स कंपन्या अशा सर्वच कंपन्यांनी प्रचंड तगडी कामगिरी केली आहे.

शेवटी आपण मार्केटमध्ये गुंतवतो म्हणजे काय? ह्या कंपन्यांमध्ये गुंतवतो ना?

ह्या कंपन्यांवर विश्वास ठेवा. भारताच्या ग्रोथ स्टोरीवर विश्वास ठेवा. मॅक्रो इकॉनॉमिक घटना निश्चित मार्केटवर परिणाम करतात, पण त्यांचे वेटेज कमी असते. सर्वात जास्त वेट असते तुमच्या कंपन्यांचा बिझनेस कसा चालू आहे? फायनान्स परफॉर्मन्स कसा आहे. ग्रोथ प्लॅन काय आहेत? कंपनी भविष्याकडे कसे पाहते आहे आणि ह्याचा एक चांगला मार्ग आहे. कंपनीचा EPS, PE Ratio आणि Price to Book रेशीओ, Return on Equity तपासणे. ह्यालाच म्हणतात, फंडामेंटल अनालीसिस.

तर, तुमच्या कंपनीचे फंडामेंटल अनालिसिस करायला शिका. BSE च्या वेबसाईट वर हे सगळे निकष उपलब्ध असतात.

महिंद्रा आणि टाटा ह्या दोन्हीं कंपन्या ऑटोमोबाईलमधल्या दादा कंपन्या आहेत. दोघांचाही परफॉर्मन्स बिझनेस उत्तम चालला आहे. पण, सोबतच इलेक्ट्रिक व्हेईकल ह्या भविष्यवेधी बदलाला दोन्ही कंपन्या सकारात्मक सामोरे जात आहेत. फक्त पेसेंजर नाही तर कमर्शियल सेगमेंट मधेही ह्या कंपन्या इव्ही गाड्या आणत आहेत. थोडक्यात ह्या कंपन्या फ्युचर रेडी आहेत.

असेच रिलायन्स बाबतीत म्हणू शकतो. रिलायन्सने कोरोना काळात दीड लाख कोटी गुंतवणूक फायनान्स, रिटेल आणि टेली कम्यूनीकेशन मध्ये आणली. पारंपरिक पेट्रोकेमिकल असलेल्या कंपनीचा चेहरामोहराच बदलला. त्यामुळे ८००-९०० घरातील शेअर २३०० वर येऊन ठेपलेल्या आहे.

लार्सन टुब्रो मोठी इंजिनिअरिंग कंपनी. तिची एलटीमाइंड ट्री ही माईंड ट्री विकत घेतल्यावर झालेली नवीन कंपनी सुद्धा असाच तगडा परफॉर्मन्स देते आहे.

तर अशा रीतीने तुम्हीही आपल्या कंपन्या निवडा.

इंडियन हॉटेल ही हॉटेलमधली चांगली कंपनी आहे. इंडियन रेल कंपन्या खुप चांगला ग्रोथ दाखवत आहेत. पब्लिक सेक्टर युनिट्स म्हणजे PSU अर्थात गव्हर्मेंट कंपन्या नेहमीच डीव्हिडंड साठी ओळखल्या जातात. पण प्रॉफिट मध्ये असल्याने त्याही चांगल्या ग्रोथ दाखवत आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स, भेल, हिंदुस्थान एरनॉटिक्स, भारत फोर्ज, इंडियन ऑईल, कोल इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, एसबीआय ही अग्रगण्य नावे.

तुमच्या पोतडीत असलेल्या कंपन्यांचे फंडामेंटल अनलीसिस करा आणि पाहा त्या वरच्या पाच कसोटीवर बसतात का ते.

संवत २०८० तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, आरोग्याचे आणि समृद्धीचे जावो.

– हर्षद माने
+91 99677 06150

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?