प्रगतिशील उद्योग

ओळख ‘चॅट जीपीटी’ची

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


तंत्रज्ञानाच्या युगात एकविसावं शतक नवी नवी शिखरं पादाक्रांत करतंय. संगणकीकरण आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे तुमची कामं अगदी सोपी झाली आहेत. मानवी हातांच्या बदल्यात यंत्रां जास्त कामं होवू लागलीत. तंत्रज्ञानाचा वेग खूप वेगाने वाढतोय.

सध्या सगळ्यात जास्त बोलबाला आहे तो ‘चॅट जीपीटी’ या नव्या तंत्रज्ञानाचा. नुकतेच ओपन एआय कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित चॅटजीपीटी सॉफ्टवेअर लाँच केले. हे तंत्रज्ञान नक्की काय आहे? व्यापार जगात यामुळे एवढी खळबळ का होतेय? याचा व्यवसायात फायदा-तोटा काय? आपल्या व्यवसायात आपण त्याची मदत कशी करून घेवू शकतो. याविषयी आपण यात जाणून घेवूयात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

चॅट जीपीटी म्हणजे काय?

चॅटजीपीटी हे एआयचे नैसर्गिक लँग्वेज प्रोसेसिंग टूल आहे. तुम्ही कमांड दिली की तुम्हाला जी माहिती हवी किंवा तुमचे काम हे कमीत कमी चुका आणि नैसर्गिक पद्धतीने एआय करतो. जसे आपण आपल्या मित्रांसोबत कोणत्याही विषयावर बोलतो, तसे हा चॅट बॉट तुमच्यासोबत काम करणार आहे.

यामध्ये मजकूर लिहिणे, ईमेल, निबंध लिहिणे, कोड लिहिणे, संगीत तयार करणे अशा विविध गोष्टींचा समावेश आहे. चॅट जीपीटीच्या मदतीने तुम्ही या सर्व गोष्टी करून सहज पैसे कमवू शकता.

त्यामुळे आजघडीला कोणीही चॅट जीपीटी वापरू शकतो. चॅटजीपीटी हे अँड्रॉईड, आयओएस अशा दोन्ही वापरकर्त्यांसाठी आज उपलब्ध आहे. याचा वापर मोबाईलवरूनही करता येतो.

व्यवसाय वाढवण्यास कशी मदत होईल?

व्यवसायाच्या सुरुवातीला विविध गोष्टींची गरज असते. यापैकी विचार केला तर व्यवसायाची वेबसाईट म्हणजे मग त्यासाठी डेव्हलपर, कोडर हवा. त्यासाठी मजकरू लागतो म्हणजे लेखक हवा. तसेच इतरही अनेक कामांसाठी चांगली टीम लागते. या सगळ्यासाठी खर्चही होतोच. व्यवसायाच्या सुरुवातीला आर्थिक तंगी ही प्रत्येकाचीच असते. अशा वेळी पैसा वाचवून ही सर्व काम ही चॅट जीपीटीद्वारे केली जाऊ शकतात.

लेखनासंदर्भात जर व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर चॅट जीपीटी यात मदतगार ठरू शकते. तुम्ही तुमच्या वेबसाइटवरून कंटेंट तयार करू शकता किंवा इतरांसाठी कंटेंट रायटिंगदेखील करू शकता. तुम्ही ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, आर्टिकल रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, प्रूफ रीडिंग, रेझ्युमे रायटिंग यासारख्या कामांसाठी चॅट जीपीटीची मदत घेऊ शकता.

तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी चॅट जीपीटीच्या मदतीने टूल्सदेखील बनवू शकता. जर तुम्हाला कोडिंगचे ज्ञान नसेल किंवा डेव्हलपरची नियुक्ती करू शकत नसाल तर तुम्ही चॅट जीपीटीची मदत घेऊ शकता. यामुळे व्यवसायातील बारकावे शिकण्यासही मदत होईल. याशिवाय तुम्ही ऑनलाइन वेबसाइटवर कोडिंग स्क्रिप्टदेखील विकू शकता.

इतकंच नाही तर चॅट जीपीटीच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी आणखी अनेक टिप्स आणि मार्ग जाणून घेऊ शकता. त्याच्या मदतीने, तुम्ही व्यवसायाच्या कमकुवतपणावर काम करू शकता. एकूणच चॅट जीपीटी आगामी काळात व्यवसाय क्षेत्रासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे व्यवसाय वाढण्यास मदत होईलच शिवाय व्यवसायातील चढउतार टाळण्यासही मदत होईल.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!