उद्योजक आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी उपयुक्त अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स

तुमच्या व्यवसायात तुम्ही नफ्यात आहात की तोट्यात हेच अनेकांना माहीत नसतं. याचं मुख्य कारण म्हणजे ते आपल्या व्यवसायचं नियमित अकाउंटिंग करत नाहीत. या लेखात तुम्हाला उपयुक्त अशा मोफत व प्रीमियम अशा दोन्ही अकाउंटिंग सॉफ्टवेअर्सची माहिती मिळेल.

Zoho books : Zoho books हे प्रसिद्ध Zoho CRM या कंपनीचे सॉफ्टवेअर आहे. ते २५ लाखांच्या आत उलाढाल (turnover) असलेल्या छोट्या उद्योगांसाठी मोफत उपलब्ध आहे.

झोहो बुक्समध्ये तुम्ही vendors ना contact मध्ये add करू शकता. त्यांचे जीएसटी नंबर त्यात नमूद करू शकता आणि जीएसटी बिलेही तयार करू शकता. हे क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर असून तुमच्या कॉम्प्युटर किंवा तुमच्या फोनमध्येही access करू शकता.

जीएसटी फायलिंगसाठी लागणारे वेगवेगळे रिपोर्ट झोहो बुक्समध्ये तुम्ही तयार करू शकता. Zoho books हे जीएसटी पोर्टलशी संलग्न असून तुम्ही झोहोमध्ये काम करून त्याची थेट जोडणी जीएसटीशी करू शकता.

झोहोमध्ये तुमचा स्टॉक व inventory चे व्यवस्थापन करण्याची प्रणालीही अंतर्भूत केलेली आहे. सॉफ्टवेअर वापरण्यात काही अडचण आल्यास आठवड्यातले पाच दिवस तुम्ही झोहो कार्यालयात संपर्क करून सहाय्य मिळवू शकता.

व्यापार : व्यापार हे क्लाउड बेस्ड तसेच डेस्कटॉप अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर आहे. त्याचे मोबाईल आणि डेस्कटॉप असे दोन्ही वर्जन उपलब्ध आहेत.

झोहोमध्ये उपलब्ध असलेल्या बहुतांश गोष्टी व्यापार मध्येही उपलब्ध आहेत. व्यापारच्या मोबाईल वर्जनमध्ये मोफत व paid असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. डेस्कटॉप वर्जन मात्र paid मध्येच उपलब्ध आहे.

Odoo accounting : ओडू हे नवीन सॉफ्टवेअर आहे. जे सध्या मोफत उपलब्ध आहे. यामध्ये अकाउंटिंगच्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेतच, सोबत quotation तयार करणे आणि customer relationship management म्हणजेच CRM सुद्धा उपलब्ध आहे.

GoGST billing : GoGST billing ही वेबसाईट आहे. त्यावर तुम्ही क्लाउड बेस्ड अकाउंटिंग करू शकता. तुम्ही कुठूनही लॉगिन करून यावरून invoice तयार करून शकता. ग्राहकांना ईमेल किंवा व्हॉट्सॲपद्वारे पाठवू शकता.

‘गो-जीएसटी’मध्ये अकाउंटिंगचे मर्यादित पर्यायच उपलब्ध आहेत. Invoice तयार करणे तसेच जमा-खर्चाच्या नोंदी ठेवणे यासाठी हा साधा आणि सोपा पर्याय उपलब्ध आहे.

(जाहिरात)

खाताबुक : ‘व्यापार’प्रमाणेच खाताबुकही फ्री व प्रीमियम अशा दो न्ही व्हर्जन मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही जीएसटी आणि नॉन जीएसटी अशा दोन्ही प्रकारचे अकाउंटिंग करू शकता.

Tally Prime: अकाउंटिंग म्हणजे टॅली सॉफ्टवेअर असेच समीकरण काही वर्षांपूर्वीपर्यंत रूढ होते. बहुतांश सर्व सीए फर्म व अकाउंटिंग प्रोफेशनल्स हे टॅली सॉफ्टवेअरच वापरतात. यामध्ये अकाउंटिंगच्या जवळजवळ सर्व फीचर्स उपलब्ध आहेत.

मात्र टॅली हे paid सॉफ्टवेअर असून मासिक किंवा वार्षिक शुल्क भरून तुम्ही ते वापरू शकता. शिवाय तुम्हाला टॅलीमध्ये अकाउंटिंग करण्यासाठी टॅली शिकलेले असणे गरजेचं आहे. टॅली हे एक उत्तम ERP सुद्धा आहे.

GNU cash: GnuCash हे व्यक्तिगत तसेच छोट्या व्यवसायांसाठीचे पूर्णपणे मोफत असे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. Microsoft Windows, Mac OS आणि Linux साठी याचे स्वतंत्र सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत.

Akaunting: Akaunting हेसुद्धा हे मोफत आणि ओपन सोर्स अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे.

याव्यतिरिक्त खालील अकाउंटिंग सॉफ्टवेअर किंवा ॲप्स उपलब्ध आहेत. यापैकी काही फ्री तर काही paid version मध्ये आहेत. तुमच्या कामाच्या गरजेनुसार तुम्ही अकाउंटिंग सॉफ्टवेअर निवडू शकता.

 • Zip Book
 • Fresh Book
 • Wave accounting
 • Manager
 • Profit Books

Author

 • शैलेश राजपूत

  शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

  व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

  संपर्क : ९७७३३०१२९२

  View all posts
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?