अनेक कंपन्यांमध्ये मालक-कर्मचारी संबंध हा सर्वात कळीचा मुद्दा असतो. मुंबईतील गिरणी कामगारांचा संप हे याचे एक प्रमुख उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. तर दुसरीकडे इंफोसिस, टाटा, माईंड ट्रीसारख्या कंपन्यांची प्रगती ही त्या कंपन्यांतील मालक–कर्मचारी संबंध हे उत्तम असल्याचेही लक्षात येते.
जेव्हा तुम्ही एखाद्या कर्मचार्याला तुमच्या कंपनीत निवडता, तेव्हा तुम्ही तुमच्या कार्यशक्तीतही एका व्यक्तीने वाढ होत असते. मालक-कर्मचारी यांच्यातील नव्या नात्याची ही सुरुवात असते. हे संबंध दृढ असल्यावरच कंपनीची प्रगती होऊ शकते, कारण हे दोघ मिळून कंपनीच्या प्रगतीसाठी कार्यरत असतात.
सामान्यपणे या दोघांमधील नातं हे किती जवळच असावं, हे त्या दोघांच्या प्रवृत्तीवर अवलंबून असतं, पण त्या दोघांनी एकमेकांचा योग्य तो आदर राखणं गरजेचं असतं. मालकाने पदाचा योग्य तो मान राखत कर्मचार्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्यास तेही मालकाला कायम सकारात्मक प्रतिसाद देतात.
मालक-कर्मचारी यांच्यात परस्पर विश्वास निर्माण होणंही तितकंच आवश्यक आहे. मालकाने आपण दिलेले काम आपले कर्मचारी योग्य वेळेत आणि आवश्यक त्या गुणवत्तेप्रमाणे पूर्ण करतील यावर विश्वास ठेवून त्यांच्यावर काम सोपवले, तर ते काम अधिक सुरळीतपणे होऊ शकेल.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)याच्याच दुसर्या बाजूला कर्मचार्यांनीही आपल्यावर मालकाचा हा विश्वास निर्माण होईल या पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. कर्मचार्यांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी मालकाने त्यांच्याशी कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्तही संबंध प्रस्थापित करणं गरजेचं असतं.
जसे की त्यांचे कौटुंबिक जीवन, त्यातील अडीअडचणी, त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य इत्यादींचीही मालकाला माहिती असावी. अर्थात कोणत्याही गोष्टीत अतिरेक हा वाईटच ठरतो. त्यामुळे प्रत्येक संबंध हे कोणत्या पातळीपर्यंत असावेत, याचा विवेक मालकाने पाळावाच.
मालक-कर्मचारी यांच्या संबंधात कटाक्षाने टाळाव्यात अशा काही गोष्टी म्हणजे मालकाने कर्मचार्याचे कोणत्याही प्रकारचे शोषण करू नये. त्यामुळे मालक-कर्मचारी संबंधात दरी वाढत जाते. याचा परिणाम अन्य कर्मचार्यांवरही होतो आणि एकूणच कार्यालयीन शिस्त बिघडून हवी तशी प्रगती साधता येत नाही.
दुसरे म्हणजे मालक-कर्मचारी यांनी परस्परांत कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यापूर्वी योग्य तो विवेक पाळावा, कारण मानवी संबंध हे कोणत्याही ठराविक परिमाणांनुसार मोजले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्याचे परिणाम आणि इतर गोष्टींचा विचार हा त्या त्या काळ-वेळ-परिस्थितीनुसार भिन्न असण्याची शक्यता आहे.
सकारात्मक मालक-कर्मचारी संबंध निर्माण करण्यासाठी खालील गोष्टी करणे गरजेचे :
१. संवाद महत्त्वाचा : तुमच्या कंपनीत मुक्त, पारदर्शक आणि थेट संवादाची संस्कृती निर्माण करा. कर्मचाऱ्यांना तुमच्यापर्यंत कोणतीही गोष्ट पोहोचवायची असेल, ते तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा पर्याय उपलब्ध ठेवा. जसे की एखादी सूचना पेटी, डेडिकेटेड ई-मेल आयडी यासाठी ठेवा, ज्यावर कर्मचारी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील.
टीम मीटिंग्ज, वन-ऑन-वन सेशन आणि फीडबॅक मेकॅनिझमद्वारे नियमित संवादाला प्रोत्साहन द्या. कर्मचाऱ्यांना बदलाच्या भीतीशिवाय त्यांच्या चिंता, कल्पना आणि अभिप्राय व्यक्त करण्याचे मार्ग तयार करा.
२. विश्वास वाढवा : विश्वास हा कोणत्याही निरोगी नात्याचा आधारस्तंभ असतो. मालकाने त्यांच्या कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवून, निर्णय घेण्याची मुभा देऊन त्यांच्यावरील विश्वास प्रदर्शित केला पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांनी सहाय्य, मार्गदर्शन आणि वाढीसाठी संधी प्रदान करण्यासाठी त्यांच्या मालकावर विश्वास ठेवला पाहिजे.
३. कर्मचाऱ्यांच्या विकासाकडे लक्ष द्या : कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यावसायिक वाढ आणि विकासामध्ये गुंतवणूक करणाऱ्या मालकाचे कौतुक वाटते. कौशल्ये, ज्ञान आणि करिअरच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि मार्गदर्शनाची संधी निर्माण करा. वैयक्तिक प्रतिभा आणि आकांक्षा ओळखा, कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये प्रगती करण्याचे मार्ग निर्माण करा.
४. कर्मचाऱ्यांना बक्षीस द्या : कर्मचाऱ्यांचे त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक करा. पण फक्त शाब्दिक कौतुक नको तर सर्वांसमोर त्यांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्र द्या. ऑफिसमध्ये एक नोटीस बोर्ड तयार करून त्यावर या कर्मचाऱ्यांची कामगिरी लिहा. यातून कर्मचाऱ्यांमध्ये एक सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल.
कर्मचाऱ्यांचे कौतुक फक्त ट्रॉफी, प्रशस्तीपत्रापुरते नका करू तर त्यांना उपयोगी पडतील अशी काही बक्षिसेही द्या किंवा पैसे, बढती असे काही द्या. याने त्यांचा आर्थिक विकास होईल आणि ते आणखी जोमाने काम करतील.
५. वर्क-लाइफ बॅलन्स सांभाळा : प्रत्येकासाठीच वर्क-लाइफ बॅलन्स गरजेचा आहे. कारण नुसतं काम काम करून कोणीही सुखी आणि समाधानी होऊ शकत नाही. यासाठी कामाच्या वेळा निश्चित ठेवा. Overtime म्हणजे अतिरिक्त काम शक्यतो टाळा. नोकरी आणि व्यक्तिगत जीवन याचा आदर करा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.