वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी आवश्यक नियोजन

कोणत्या गोष्टींत आपला वेळ वाया जातो, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तरच आपण वेळेच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यासाठी स्वतःच्या दिनक्रमाच्या दैनंदिनीचे लिखाण करा. त्यामध्ये वाया गेलेल्या वेळाची कारणे लिहून त्यावर उपाययोजना करा.

लक्षात घ्या वेळेचे व्यवस्थापन म्हणजे स्वतःचे व्यवस्थापन. जो स्वतःचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे करू शकतो, तोच इतरांचेही व्यवस्थापन योग्य प्रकारे करू शकेल. यातून आपली कार्यक्षमता वाढते.

“Arise! Awake! and stop not until the goal is reached. Take up one idea make that one idea your life, think of it, dream of it ,live on that idea ,let the brain muscle nerves. Every part of your body. Be full of the ideas but follow to concentrate one by one each moment priorities it what is important when the idea you took up this is the way to get success”, असे काही महापुरुष तत्वज्ञानाचे मत आहे.

दैनंदिन जीवनात जगत असताना एकतर रेल्वेच्या पटरीसारख्या आपले जीवन असते धावतच राहते, पण आपण का धावत आहोत आपल्या जीवनाचे अंतिम साध्य काय आहे याची जाणीव असणे महत्त्वाचे असते.

अनेकदा या गोष्टींची जाणीव असूनही आपल्याला तसे जगता येत नाही किंवा साध्य करता येत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात पण यशस्वी होण्यासाठी या सर्व नकारात्मक गोष्टींवर मात करून आपण आपले अंतिम साध्य साधले पाहिजे.

अडचणी अडथळे कमतरता या आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक समजून त्यावर मात करून पुढे जाता आले पाहिजे. माझ्या जीवनात असेच का घडले? या गोष्टीवर अडकून न पडता त्यातून विविध पर्याय शोधून योग्य पर्यायाची निवड करून आपले जीवन यशस्वी आणि सुखकर करता येते.

मन आणि शरीर या दोन गोष्टींच्या दोन दोघांमध्ये आपण आत्म्याचा आवाज किंवा अंतर्मनाची हाक ऐकतच नाही आणि तिथेच आपली फसगत होते. वेळ हातातून निसटून जाण्यापूर्वीच सावधगिरीने वेळेचा भान ठेवून आपले कार्य सिद्धीस नेता आले पाहिजे.

हे आयुष्यात सगळ्यांनाच शक्य होतेच असे नाही काही ना काही गोष्टी सहज प्राप्त होतात, काहींना खूप मेहनत करावी लागते तर काही आयुष्याच्या शेवटपर्यंत लढता लढताच आपल्या आयुष्यात हतबल होतात.

असे होऊ नये म्हणून आपला जीवनाच्या विविध अवस्थांमध्ये आपणास जागृत असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपले सद्सद्विवेक बुद्धी आणि आत्मा स्थिर ठेवला पाहिजे. आपणास या उदाहरणाची कल्पना असेलच की एका मिलि सेकंदामुळे धावपटूचे मेडल ही जाऊ शकते.

आयुष्यभराची एक एवढी मेहनत एका शुल्लक गोष्टीमुळे जाऊ नये. ते मिळवण्यासाठी प्रयत्न व धडपड असावी म्हणून आपण सतर्क असणे हेच आपल्या जीवनाचे गमक आहे. चला तर आपल्या वेळेचे योग्य नियोजन करू आयुष्य समृद्ध करू या.

– प्रीती जेम्स

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?