मनावरचा ताण कमी करण्यासाठी या ५ गोष्टी करा

रोजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या काळात ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा तणाव आहे. टेन्शन कमी कसे करू किंवा टेन्शन न येण्यासाठी काय करू याचेही टेन्शन येते.

अनेक वेळा आपण विनाकारण ताण घेतो आणि जगणे कठीण करतो. मुलांना अभ्यासाचा ताण, उद्योजक, नोकरदार यांना रोजची कामातली स्पर्धा, आव्हाने याचा ताण. एकूणच हा ताण आपल्या जगण्यावर वाईट परिणाम करतो.

आपले मन, शरीर, प्रकृती यावर होणारा परिणाम जगण्यातला आनंद हिरावून घेतोय. मानसिक ताण कमी करण्याचे उपाय म्हणून खाली दिलेल्या पाच गोष्टी करा.

१. भूत आणि भविष्य याचा अवास्तव विचार टाळा : आपल्याला भूतकाळात घडून गेलेल्या आणि भविष्यात काय घडेल अशा जर-तरच्या विचारात अडकायची सवय असते. यामुळे अतिविचार करून आपण नको असलेला ताण घेत असतो.

या गोष्टी टाळाव्यात. घडून गेलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही तसेच भविष्य आपल्या हातात नाही, मग तो ताण वर्तमानात घेऊन आपण आरोग्याला हानी का पोहचवावी? म्हणूनच अतिविचार टाळावा.

२. स्वत:मधल्या उणिवांचा ताण घेऊ नका : उणिवा प्रत्येकात असतात, पण आपले मन हे मानायला तयार नसते. आपल्याला स्वत:मधल्या उणिवा पुढे जाण्याच्या मार्गावर मागे खेचत असतात. स्वत:मधल्या उणिवा स्वीकारून त्यावर मात कशी करायची यावर काम केले तर यातून येणारा ताण कमी होईल. नकारात्मकता गेली की ताणही येत नाही त्यामुळे वेळीच हे समजून घ्यावे.

३. हसत राहा : हसणे हे ताण कमी करण्याचे उत्तम औषध आहे. आनंद सकारात्मकता तयार करतो आणि यातून चांगली ऊर्जा निर्माण होते. मुख्य म्हणजे आपला हसरा चेहरा आपल्यासोबत इतरांचाही ताण घालवायला मदत करतो.

४. स्वत:ला उद्योगी ठेवा : आपण सतत कामात व्यग्र असलो की नको असलेले विचार दूर राहतात. यामुळे आपसूकच ताण दूर राहतो. यामुळे स्वत:ला विविध गोष्टीत गुंतवून ठेवावे. मग ती कोणतीही कामे असोत अथवा खेळ किंवा छंद. आनंदी आणि व्यस्त मन नेहमीच तणावमुक्त असते.

५. नातेसंबंध जपा : मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपल्या आयुष्यात नाती, मित्रपरिवार असतातच. जास्तीत जास्त वेळ यांच्यासोबत घालवा. आपली सुखदुःख त्यांच्यासोबत शेअर करा. आपल्या समस्या, अडचणी, यावर बोला. सल्ला घ्या. मदतीची गरज असेल तर मदत मागायला मागे हटू नका. जरूर मदत घ्या.

आपल्या आयुष्यात जास्त ताण हा मदत न मागितल्याने, विश्वास न ठेवल्याने आणि भीतीने येतो. एखाद्याची मदत घेण्यात कमीपणा काहीच नसतो. वेळीच हे ओळखा आणि स्वतःला ताणतणावापासून मोकळे करा.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?