चांगला विक्रेता होण्यासाठी तुमच्यात असायलाच हवेत हे ३ गुण

मागणी आणि पुरवठा याच्या परस्परातील बॅलन्सनुसार प्रत्येक उद्योगधंदा उभा असतो. प्रत्येक उद्योजकाला आपला उद्योग टिकवण्यासाठी, त्यात वाढ करण्यासाठी आवश्यकता असते ती चांगल्या विक्रीची आणि या विक्रीमध्ये सतत वाढ करू शकणारा चांगला विक्रेता अथवा विक्री प्रतिनिधी म्हणजेच सेल्समॅनची.

व्यवसायात विक्री ही एक कला आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी विक्रेत्याचे व्यक्तिमत्त्व आहे. विक्री तंत्र आणि रणनीती याचा कितीही वाटा असला तरीही विक्रेत्यामधील गुण व कौशल्ये नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतात. चांगला विक्रेता हा फक्त एखादे उत्पादन किंवा सेवा विकू शकणारा नसतो; तर नातेसंबंध निर्माण करण्यात, मानवी भावभावना समजून घेण्यात पारंगत असतो.

चांगला विक्रेता होण्यासाठी विविध गुणांचे मिश्रण तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असायला हवं, तरच तुम्ही चांगले विक्रेता म्हणून सिद्ध होऊ शकता.

१. व्यक्तिमत्त्व : व्यक्तिमत्त्व ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. विक्रेता म्हणून आपण लोकांसमोर जातो त्यावेळी तुमचं व्यक्तिमत्त्व हे आकर्षक आणि समोरच्याला आपलंस करणारं असावं. विक्रेत्याची ठेवण ही इतरांमध्ये उठून दिसेल अशी असावी.

एक प्रभावी व्यक्तिमत्व हे चांगल्या विक्रेत्याच्या शस्त्रागारातील एक शक्तिशाली साधन आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व त्यांना तुम्हाला लोकांशी जोडतं आणि त्यांच्या अंतर्मनावर प्रभाव टाकतं. तुमच्या व्यवतीमत्त्वाचं चुंबकीय आकर्षण ग्राहकांना आकर्षित करते, जे तुम्हाला काय म्हणायचे आहे ते ऐकण्यासाठी अधिक प्रवृत्त करतं.

आकर्षक व्यक्तिमत्त्वामध्ये विक्रेत्याच्या वागणुकीतील प्रोफेशनलिझमसुद्धा येते. पाच मिनिटांच्या भेटीनेही ग्राहक तुम्हाला लक्षात ठेवील अशाप्रकारची तुमची छाप त्याच्यावर पडली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा तितका विकास केला पाहिजेत.

२. आत्मविश्वास : आत्मविश्वास हा प्रभावी विक्रीकौशल्याचा पाया आहे. एक चांगला विक्रेता स्वतःवर, त्यांच्या उत्पादनांवर आणि त्यांच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो.

हा आत्मविश्वास व्रिक्रेत्याकडून ग्राहकांमध्ये परावर्तित होतो आणि या विश्वासाच्या बळावरच ग्राहक तुमच्याकडून खरेदी करत असतो.

चांगला विक्रेता होण्यासाठी आत्मविश्वास असणं खूप गरजेचं असतं. स्वत:वर आणि आपण जे उत्पादन अथवा सेवा विकतो आहोत, त्यावर विश्वास ठेवून तुम्ही ग्राहकांसमोर जाता तेव्हा तुम्ही निम्मी लढाई जिंकलेले असता.

३. प्रसंगावधानता : चांगल्या विक्रेत्यामध्ये चपळता आणि हजरजबाबीपणा असला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीला त्याला सांभाळून घेता आलं पाहिजे. तुम्ही एखाद्या ग्राहकाला जे प्रेझेंटेशन देता त्याने तो समाधानी होईलच असे नसते.

अशा वेळी तो तुम्हाला निरनिराळे प्रश्न विचारू शकतो. तेव्हा तुम्हाला प्रसंगावधानता दाखवून शांतपणे तो समाधानी होईपर्यंत त्याला उत्तर द्यावीच लागतात. कोणताही असमाधानी ग्राहक हा तुमच्याकडून माल खरेदी करत नाही.

Author

  • हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?