सरकारी टेंडर कोण भरू शकतं? टेंडर भरण्याची प्रक्रिया काय?

देशभरात सरकारी आस्थापने व प्राधिकारणांमार्फत करोडो रुपयांची खरेदी होत असते. केंद्र सरकार, विविध राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, रेल्वे, सरकारी बँका, वित्त संस्था, विद्युत बोर्ड, इत्यादींमार्फत करोडो रुपयांची खरेदी दर वर्षी केली जाते.

सामान्य माणसाला याची माहितीसुद्धा नसते. ज्या व्यावसायिकांना या संधी माहीत असतात व त्या कशा मिळवायच्या हे माहीत असते ते अशा संधीचा लाभ घेऊन आपला व्यवसाय शतपटीने वाढवतात.

अनेक मराठी उद्योजक निव्वळ अज्ञान किंवा भीतीपोटी सरकारी कामे मिळवून त्याद्वारे करोडपती होण्यापासून वंचित राहतात. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आपल्याला ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

त्याबद्दल मी या लेखाद्वारे आपलं मार्गदर्शन करणार आहे. खाली यासाठी काही टप्पे देत आहे. तुम्ही या क्षेत्रात येऊन सरकारसोबत व्यवसाय करू इच्छित असाल तर याचा उपयोग होईल.

एमएसएमइ नोंदणी : तुमचा व्यवसाय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग म्हणून नोंदणी झालेला असायला हवा.ही नोंदणी तुम्ही भारत सरकारच्या ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ या संकेतस्थळावर घरबसल्या अगदी मोफत करू शकता. प्रत्येक लघुउद्योजकासाठी ही नोंदणी करणे अनिवार्य आहे.

एनएसआयसी नोंदणी : तुम्ही उत्पादक किंवा सेवा पुरवठादार असाल आणि नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीजकॉर्पोरेशन म्हणजेच एनएसआयसीची नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला Free Tender documents , EMD exemption अनेक फायदे मिळू शकतात.

व्हेंडर रजिस्ट्रेशन : तुम्हाला ज्या सरकारी कंपनी किंवा आस्थापनाचे टेंडर भरायचे आहे, त्याच्याकडे प्रथम व्हेंडर म्हणून रजिस्टर व्हावे लागते. व्हेंडर रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला त्या आस्थापनाला विहित नमुन्यात तुमच्या कंपनीची सर्व माहिती भरून द्यावी लागते.

जोपर्यंत तुम्ही त्या आस्थापनाचे रजिस्टर्ड व्हेंडर होत नाही, तोपर्यंत तिथे तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची आवश्यकता असली तरी तुम्हाला त्याची माहिती मिळत नाही व त्यामुळे जरी त्याचे टेंडर निघाले तरी तुम्ही ते भरू शकत नाही. व्हेंडर रजिस्ट्रेशन दोन प्रकारे होते. ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष कागदपत्रे जमा करून त्यानंतर त्याची पडताळणी करून.

GeM वर नोंदणी करा : भारत सरकारने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस अर्थात ‘जेम’ (GeM) हे सामान्य वापरातील वस्तू आणि सेवांच्या ऑनलाईन विक्रीला सुलभ करण्यासाठी एकथांबा ऑनलाईन व्यासपीठ उभे केले आहे.

फरक इतकाच आहे की येथे तुमचा ग्राहक हा थेट सरकार असेल म्हणजेच वेगवेगळे सरकारी विभाग, संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापने यांना लागणारी उत्पादने सरकार ‘जेम’च्या माध्यमातून तुमच्याकडून खरेदी करते.

‘जेम’ पोर्टलवर रेजिस्ट्रेशन करण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत :

1) २५ हजार रुपयापर्यंत तुम्हाला थेट ऑर्डर ‘जेम’ आधिकारी देऊ शकतात.
2) ५ लाखापर्यंतची ऑर्डर तुम्हाला सिंगल बीड प्रकारामध्ये देऊ शकतात.
3) ५ लाखापेक्षा जास्त व २५ लाखापर्यंत तुम्हाला ढुे इळव सिस्टिममध्ये आपली किंमत सर्वात कमी आल्यास आपणास मिळू शकते.

Pre Qualification Criteria (PQ): टेंडर भरण्याअगोदर तुम्हाला पूर्वअनुभव असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमचा टेंडरमधील Technical specifications, Commercial Terms Conditions यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही Experience / Turnover criteria पूर्ण करत असाल तरच आपण पुढे टेंडर भरायचा विचार करू शकता.

स्टार्टअप नोंदणी : जर तुमचा व्यवसाय नवीन असेल आणि तुमची स्टार्टअप म्हणून नोंदणी झालेली असेल तर टेंडर भरताना पूर्वअनुभवाची अट तुमच्यासाठी शिथिल केली जाते. कोणताही अनुभव नसला तरीही तुम्ही टेंडर भरून कामे मिळवू शकता.

Empanelment Tenders: अनेकदा काही आस्थापने Empanel टेंडर्स काढतात. त्या वेळेला ते टेंडर कोणी भरत नाही, त्यामुळे खूपच कमी व्हेंडर्स रजिस्टर होतात.

अशा वेळेला त्यांना Empanel झाल्यावर काम थेट मिळते किंवा Empanelment supplier मध्ये टेंडर काढले जाते. तेव्हा तेथे स्पर्धा कमी असल्यामुळे काम मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशी Empanel टेंडर्स जरूर भरावीत.

– मकरंद शेरकर
9967578211
ई-मेल : makarand@tendetech.co.in
(लेखक अनेक वर्षांपासून टेंडरिंगच्या व्यवसायात कार्यरत आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?