अनेक ब्रॅण्ड्सच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींमध्ये सेलिब्रिटींऐवजी इन्फ्लुएनसर्स काम करताना दिसत आहेत. ज्यामुळे डिजिटल इन्फ्लुएनसर्सचा दबदबा वाढतो आहे, हे स्पष्ट होत आहे.
ब्रॅण्ड्स एकच ऑफर सर्व ग्राहकांना देण्याऐवजी छोट्या छोट्या ऑफर्स फक्त सिलेक्ट केलेल्या ग्राहकांनाच देत आहेत. ज्यामुळे ब्रॅण्ड्सचा जाहिरातींवर होणारा खर्च खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला असून त्यातून त्यांचे उत्पन्न वाढलं आहे. ऑफर सगळ्या ग्राहकांना देण्याऐवजी मोजक्याच ग्राहकांना पर्सनलाईज करून दिल्यामुळे ग्राहक जास्तीत जास्त खरेदी करत आहेत.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये छोटा उद्योजक कुठे आहे? तो काय करतो आहे? त्याच्यावर या २०२३ मधील डिजिटल मार्केटिंग ट्रेंड्सचा काही फरक पडला आहे का?
तर मित्रांनो, छोट्या उद्योजकांनीही या सगळ्या ट्रेंड्सचा वापर करून घेतलेला दिसतो आहे. त्याची काही उदाहरणे पाहू. अनेक छोट्या उद्योजकांनी ChatGPT चा वापर करून आपल्या व्यवसायासाठी लागणारे कंटेंट लिहून घ्यायला सुरुवात केली आहे.
जसे की ई-मेलचा मजकूर, जाहिरातींचा मजकूर, प्रपोजलचे कंटेंट आणि सोशल मीडियावरील कंटेंट हे ChatGPT च्या माध्यमातून लिहून घेतल्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांनी स्वतःचा अमूल्य वेळ वाचवलेला आपल्याला दिसतो आहे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे व्हॉट्सअॅपचा व्यावसायिक वापर करणारे उद्योजक.
कोरोना महामारीमध्ये अनेक व्यावसायिकांनी व्हॉट्सअॅपवर ऑर्डर घ्यायला सुरुवात केली, जी पद्धत अनेक छोटे व्यावसायिक अजूनही अमलात आणत आहेत.
ग्राहकांना दुकानात न बोलवता ऑर्डर विचारून घेणे, त्यांना ऑफर परसनलाईज करून देणे, ऑर्डर कन्फर्म करणे, इ. सगळी कामे व्हॉट्सअॅप व तत्सम मेसेजिंग अॅप्समुळे छोट्या व्यावसायिकांसाठी अतिशय सोपी झाली आहे.
हे तर फक्त एक उदाहरण आहे, पण अनेक छोटे उद्योजक व्हॉट्सअॅप, ChatGPT आणि अशा लेटेस्ट सॉफ्टवेअरचा वापर करून स्वतःचा व्यवसाय वाढवत आहेत.
आपणास लक्षात आले असेल की, डिजिटल मार्केटिंगने २०२३ मध्ये कात टाकली आहे. येणार्या दिवसांमध्ये GPT-4 हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नवीन अल्गोरिदम आपल्या भेटीला येऊ शकतो.
हा अल्गोरिदम आताच्या GPT अल्गोरिदमचे नवीन व्हर्जन असून यात इमेजेस आणि टेक्स्ट या दोन्ही माध्यमातून इनपुट देता येणार आहे. तसेच याच्या आऊटपुटमध्ये मोठ्या प्रमाणात भावनांचा वापर करून टेक्स्ट तयार केले जाईल, ज्यामुळे टेक्स्ट आऊटपुट हे काही प्रमाणात रोबोटिक न राहता भावनिक असेल.
२०२३ हे वर्ष डिजिटल मार्केटिंग ट्रेंड्ससाठी क्रांतिकारी वर्ष ठरले आहे यात शंकाच नाही. अजूनही ६-७ महिन्यात आपणास हे वर्ष नवनवीन सरप्राइज गिफ्ट्स देणार याबद्दल मला खात्री आहे.
मात्र या नवीन ट्रेंड्सला आत्मसात करून त्यांचा आपल्या व्यवसायासाठी उपयोग करून घेण्यासाठी आपल्याला सजग राहावे लागेल आणि नेहमी शिकत राहावे लागेल.
– गणेश नाईक
मोबाईल : 8822757575
(लेखक डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ आहेत.)
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.