सहकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवा, पुरेसे अधिकारही द्या मग येणारा result बघा!


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


ता. ८ फेब्रु २०१६

ट्रिंग ट्रिंग..

हा बोल.. तुलापण आताच कॉल करावासा वाटला?

अरे, काय झालं चिडायला, मी सहजच कॉल केला. मला माहीत होतं आज तुमचा सोमवार, विकली मीटिंगचा दिवस म्हणून सकाळपासून नाही कॉल केला. वाटलं तू फ्री झाला असशील आतापर्यंत म्हणून कॉल केला. एवढा का चिडला आहेस?

अरे, माझा स्टाफ…! युजलेस आहेत सगळे..

एक मिनिट, आता गेल्याच आठवड्यात तू तुझ्या स्टाफची तारीफ करत होतास आणि आज बडबडतो आहेस.

चल जाऊ दे. नंतर बोलू, माझं डोकं एकदम गरम झालंय. आज घेतलय मी एकेकाला फैलावर. बसलेले नंतर मान खाली घालून. यांना काही नाही गं, कंपनी, क्लायंटस, टार्गेट्स कशाचं काही पडलेलं नाही.

गेले दोन महिने एकाचंही सेल्स टार्गेट पूर्ण होत नाही, काही शिस्तच नाही कामाची..

अरे बापरे.. अरे पण तू त्यांना सांगत असशील ना, तुला काय अपेक्षित आहे, टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, कामे कशाप्रकारे केली गेली पाहिजेत. मग तरीपण स्टाफ करत नाही आहे का?

आ…. हो! तसं सांगितलंय सगळं, पण…

हा ‘पण’ सर्व गोष्टी अर्धवट ठेवतो आणि स्टाफला कळत नाही की, आपल्याकडून नक्की अपेक्षित काय आहे आणि अपेक्षा सांगितल्या गेल्या, तर मी सारखं कसं विचारू, की मी हे कशाप्रकारे केलं पाहिजे. या द्विधा मनस्थितीत स्टाफ येतील-जमतील तशी कामे करत राहतो.

हो, इथे आपण डेलीगेशनबद्दल बोलतोय. अपेक्षा आणि प्रक्रिया स्पष्टपणे सांगितली गेली नाही तर हवा असलेला निकाल मिळण्याची अपेक्षा करणे म्हणजे निकाल ‘नशिबावर’ सोडण्यासारखं आहे. कर्मचारी कितीही अनुभवी, सुशिक्षित असला तरीही कंपनीची प्रत्येक नवीन आलेल्या कामातील, प्रोजेक्टमधील अपेक्षा ही वेगळी असणारच आणि कंपनी प्रमुखाने त्याबद्दल स्टाफला प्रशिक्षित न केल्यास त्याचा योग्य परिणाम कंपनीला मिळणे शक्य नाही.

डेलीगेशन म्हणजे प्रतिनिधीला अधिकार सुपूर्द करणे, म्हणजेच स्टाफ जो आता कंपनीमध्ये असलेल्या कामांना जबाबदार आहे त्याला त्याच्या कामाची पूर्ण माहिती करून देणे आणि ती माहिती दिल्यानंतर त्या कामांमध्ये जे निर्णय घ्यावे लागणार आहेत ते घ्यायचे अधिकार देणे.

डेलीगेशन सर्वात महत्त्वाचे व्यवस्थापन कौशल्य एक आहे. नियम आणि तंत्र समजतील अशा पद्धतीने सांगितल्यास स्टाफला त्यांची कामे परिणामकारक पद्धतीने करता येतील आणि जबाबदारी सांभाळून योग्य निकाल देण्यास स्टाफ सक्षम होईल. योग्य डेलीगेशन वेळ वाचवते, स्टाफला विकसित करण्यास मदत करते आणि स्टाफला कामासाठी प्रेरणा मिळते. डेलीगेशन व्यवस्थित न केल्यास कामामध्ये निराशा निर्माण होते, वेळ वाया जातो आणि हेतू साध्य होत नाही.

डेलीगेशन यशस्वी करण्याच्या पद्धती :

१. कामाबाबतची स्पष्टता : आधी स्वतः काम समजून नंतर ते करण्यासाठी दिल्यास त्या कामाची आखणी योग्य प्रकारे समजावली जाऊ शकते. आपल्याला असलेल्या कामाबद्दलची स्पष्टता, काम ज्या स्टाफला दिलं गेलंय त्याची जबाबदारी आणि जागृतता वाढवते.

२. योग्य व्यक्ती किंवा टीमची निवड : कंपनीतील प्रत्येक स्टाफची काही शक्तिस्थाने (strengths) असतात, ती योग्य हेरून अमुक एका स्टाफला किंवा टीमला त्या कामाची जबाबदारी दिल्यास, स्टाफला/टीमलासुद्धा ते काम करण्यास आनंददायक ठरणार आणि त्या कामास ते न्यायसुद्धा देऊ शकणार.

३. क्षमता आणि प्रशिक्षणाची गरज समजून घेणे : काम तोपर्यंत डेलीगेट केले जाऊ शकत नाही जोपर्यंत ते काम हाती घेणारी व्यक्ती/टीम सक्षम आहे का याची खात्री केली जात नाही. ती व्यक्ती/टीम काम करण्यास सक्षम असल्यास ते अधिक योग्य आणि तांत्रिकदृष्ट्या परिणामकारक करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असल्यास ते काम सुरू होण्यापूर्वी दिले गेले पाहिजे.

४. काम डेलीगेट केल्याचे कारण : काम ज्या व्यक्ती/टीमला डेलीगेट केले गेलेय ते का केलं गेलंय याची पूर्ण माहिती त्या व्यक्ती/टीमला देणे गरजेचे आहे. हे सांगितल्यामुळे आपल्यावर महत्त्वाच्या कामाची जबाबदारी दिल्याचा आनंद व्यक्ती/टीमला होतो. त्याचबरोबरीने कंपनीने आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाचा योग्य निकाल देऊन विश्वासनिर्मिती अधिक प्रबळ करण्याची व्यक्ती/टीमला प्रेरणा मिळते.

५. आवश्यक सामग्रीचा पुरवठा : ज्याप्रमाणे योग्य व्यक्ती/टीमला क्षमतेप्रमाणे कामे दिली जातात त्याचप्रमाणे ती कामे पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या सामग्रीचा पुरवठा व्यक्ती/टीमबरोबर चर्चा करून दिला गेला पाहिजे. थशश्रश्र लशर्सीप ळी हरश्रष वेपश. कामासाठी लागणारी योग्य माणसे, उपकरणे, तंत्रज्ञान, पैसा आणि इतर सेवा-साधने वेळीच पुरवणे गरजेचे आहे.

६. संवाद आणि मार्गदर्शन : कामे डेलीगेट केली म्हणजे कंपनी व्यवस्थापकाचे काम संपले नाही. वेळो-वेळी कार्यप्रमुखाशी संवाद साधून कामातील प्रगतीची माहिती घेणे आणि गरज असल्यास अधिक परिणामकारक निकालासाठी मार्गदर्शन करणे हे गरजेचे आहे. यामुळे टीम अधिक जागृत राहून काम करेल.

७. डेड-लाइन्स बाबतची जबाबदारी : डेडलाइन्स म्हणजेच काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत. प्रत्येक कामाला महत्त्च तेव्हाच आहे जेव्हा ते दिलेल्या वेळेत पूर्ण केले तर. डेडलाइन्स न ठरल्यास अंतिम क्षणी कामात बदल, कंपनी व्यवस्थापकाचा काम पूर्ण करण्यासाठी सहभाग किंवा ग्राहकाचा विश्वास गमावण्याची शक्यता संभवते.

डेडलाइन्सची पूर्ण टीमला माहिती काम सुरू होण्यापूर्वी करून देणे अति-महत्त्वाचे आहे, जेणेकरून कामातील प्राधान्यक्रम (priorities) आधीच ठरवता येऊ शकतात.

८. अभिप्राय : कोणाही व्यक्तीला एखादे काम नेमून दिल्यानंतर आपण करत असलेल्या कामाची दखल घेतली जात आहे हे समजणे सुखद आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर त्यावर कंपनी व्यवस्थापकाचे मत किंवा अभिप्राय हा स्टाफ/टीमला याहून मोठी आणि आव्हानात्मक कामे पूर्ण करण्याची प्रेरणा देतो.

डेलीगेशनमुळे स्टाफला अधिकार मिळतात, योग्य दिशा मिळते जी स्टाफला त्याच्या वैयक्तिक विकासास पूरक ठरते. डेलीगेशनमुळे कंपनीतील डिपार्टमेंट्स, स्टाफमध्ये पारदर्शकता येते, कामांमध्ये गुंतागुंत न होता कामे प्रभावीपणे पूर्ण केली जातात.

आपल्या माहितीतील अनेक कंपन्या ह्या योग्य आणि यशस्वी डेलीगेशन झाल्यामुळे प्रथितयश झाल्या आहेत. यशस्वी डेलीगेशन झाल्याने कंपनी आणि तेथील स्टाफ सतत नवनवीन आव्हाने घेऊन ती प्रभावीपणे पूर्ण करतात, यशाची शिखरे गाठतात.

– अमित आचरेकर
९३२३५०५१७१

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?