पिंटरेस्टवर व्यवसायाचं मार्केटिंग कसं कराल?

आपल्या ह्या धावपळीच्या जीवनात आपण बर्‍याच गोष्टी विसरून जातो किंवा सध्या माहितीचे एवढे ओघ आपल्याकडे येतात, त्यातील आपल्याला हवी असलेली माहिती काही क्षणांतच हरवून जाते. हेच लक्षात घेऊन बेन सिलबरमान, इवान शार्प आणि पॉल स्किआरा यांनी २०१० मध्ये पिंटरेस्टची स्थापना केली.

पिंटरेस्ट नक्की काय आहे?

‘पिंटरेस्ट’ ही अशी एक जागा आहे जिथे लोक विविध गोष्टी एका ठिकाणी सेव्ह म्हणजेच कायमस्वरूपी साठवून ठेवू शकतात. ‘पिंटरेस्ट’च्या भाषेत या जागेला बोर्ड्स किंवा पिनबोर्ड्स असे म्हणतात. आपण आपले बोर्ड्स इतरांसोबत शेअर करू शकतो तसेच इतर लोकांचे बोर्ड्स आपण पाहूसुद्धा शकतो.

माहिती साठवण्यासाठी याचा उपयोग तर होतोच आणि त्यासोबत पिंटरेस्टवर आपण वेगवेगळ्या गोष्टी शोधूसुद्धा शकतो. पिंटरेस्टचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे सगळ्या गोष्टी आटोपत्या स्वरूपात असतात. म्हणजेच एका ७३५ x ११०० आकाराच्या फोटोमधून आपल्याला पाहणार्‍याला सगळे काही सांगायचे असते.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

इतर सोशल मीडियाप्रमाणे पिंटरेस्टवर लोक लेख किंवा डिस्क्रिप्शन्स फार वाचत नाहीत; परंतु एका फोटोमधून आपण त्यांची उत्सुकता जागी केली तर आपले हजारो रुपयांचे उत्पादनसुद्धा ते पटकन विकत घेतील. पिंटरेस्ट वेबसाइटद्वारे किंवा अ‍ॅपद्वारे वापरले जाते.

पिंटरेस्टची एक अनोखी ओळख म्हणजे पिंटरेस्टवरील वापरकर्त्यांत ७९ टक्के या महिला आहेत. त्यामुळे ज्यांचा व्यवसाय हा महिलांवर केंद्रित आहे, त्यासाठी पिंटरेस्ट जणू वरदानच आहे.

पिंटरेस्टवर अकाऊंट तयार करा

पिंटरेस्ट वापरण्यासाठी आधी आपल्याला पिंटरेस्टवर लॉगइन करायला हवे. जर आपल्याला आपल्या व्यवसायासाठी पिंटरेस्ट सुरू करायचे असेल तर आपण ‘बिझनेस अकाऊंट’लाच लॉगइन करत आहात ना याची खात्री करून घ्या. बिझनेस अकाऊंट तयार करण्यासाठी या लिंकवर जाऊ शकता :

पिंटरेस्टवर बिझनेस अकाऊंट बनवणे मोफत आहे. बिझनेस अकाऊंटसोबत इनसाइट्ससारख्या बर्‍याच सुविधा पिंटरेस्ट उद्योजकांना पुरवते. बिझनेस अकाऊंट तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या व्यवसायाचा ई-मेल आयडी, एक पासवर्ड, आपल्या व्यवसायाचे नाव, आपल्या व्यवसायाचा प्रकार आणि आपल्या इच्छेनुसार वेबसाइट या गोष्टी भरायच्या असतात.

आपले बोर्ड्स बनवा

आपला पहिला बोर्ड बनवण्यासाठी आपल्या प्रोफाइलवर जा व Create Board नावाच्या बटणावर क्‍लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर आलेल्या रकान्यांमध्ये आपल्या बोर्डबद्दलची माहिती भरा. ही माहिती जसे बोर्डचे नाव, प्रकार वगैरे आपण जितके अचूक भराल तितका आपला बोर्ड जास्त लोकांना दिसेल.

आपला बोर्ड जर अजूनपर्यंत लोकांसमोर आणण्याइतका तयार झाला नसेल किंवा एखादा बोर्ड आपण फक्त स्वत:साठी बनवला असेल तर आपण त्याला सिक्रेट बोर्ड ठेवू शकता. यामुळे हा बोर्ड फक्त आपल्यालाच दिसेल. त्याचप्रमाणे हा बोर्ड आपण एकाहून अधिक लोकसुद्धा चालवू शकतो म्हणजेच पिंटरेस्ट आपल्याला collaborators चासुद्धा पर्याय देते. त्यामध्ये हा बोर्ड आपण ज्या लोकांसोबत शेअर करतो त्या लोकांच्या प्रोफाइलवरसुद्धा दिसतो.

पिंटरेस्ट पिन्स : एखाद्या बोर्डमधील प्रत्येक पोस्टला ‘पिन’ असे म्हणतात. आपण एखाद्या बोर्डमध्ये जाऊन नवीन पिन तयार करू शकतो किंवा नवीन पिन तयार करून मग तो योग्य त्या बोर्डमध्ये घालू शकतो. तसेच आपण एखाद्या वेबसाइटचा यू.आर.एल. लिहून त्या वेबसाइटवरचे फोटोसुद्धा पिन करू शकतो.

आपल्या स्वत:च्या पिन्ससोबत आपण इतर पिंटरेस्ट वापरकर्त्यांचे पिन्स ‘रि-पिन’सुद्धा करू शकतो. पिंटरेस्टद्वारे सतत लोकांसमोर रहाण्यासाठी रि-पिन हा पर्याय सोपा आणि फायदेशीर आहे.

रिच पिन्स : रिच पिन्स या केवळ फोटोपेक्षा काही तरी जास्त सांगणार्‍या असतात. आज पिंटरेस्टवर सहा प्रकारच्या पिन्स उपलब्ध आहेत.

  • हॅश टॅग्स : पिंटरेस्टवर हॅशटॅग हे जरी खूप महत्त्वाचे नसले तरी ते आपला बोनस ठरू शकते. आपल्या पिन्समध्ये आपण इतरांपेक्षा वेगळे, परंतु सर्वांना माहिती असलेले हॅश टॅग्स वापरले तर त्याचा नक्कीच फायदा होईल. उदा. #recepie हे वापरण्याऐवजी जर आपण #lemonpickle हा हॅश टॅग वापरला तर फायदा होण्याची शक्यता वाढेल.

पिंटरेस्ट जाहिराती

पिंटरेस्टवरून आपण आपल्या पिन्स प्रमोट करू शकतो. म्हणजेच जर आपल्याला एखादी पिन ठरावीक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर आपण पैसे भरून त्या पिनचे पेड प्रमोशन करू शकतो. www.business.pinterest.com वर आपल्याला याची सविस्तर माहिती मिळेल.

पिंटरेस्टवरील बिझनेस अकाऊंट : पिंटरेस्ट आपल्याला आपल्या उद्योगाचे अकाऊंट मोफत उघडू देते. या अकाऊंटमध्ये साध्या अकाऊंटपेक्षा काही जास्त फीचर्स दिले जातात. जसे आपली पिन किती लोकांपर्यंत पोहोचली, किती लोकांनी त्यावर कमेंट, लाइक किंवा शेअर केले. इ.

आतापर्यंत आपण पाहिले की, पिंटरेस्ट नक्की काय आहे आणि ते कसे चालते. आता पुढील टिप्सच्या साहाय्याने आपण आपापल्या उद्योगानुसार पिंटरेस्टचा वापर आपल्या व्यवसायवाढीसाठी करू शकू.

आपली टक्केवारी ठरवा. म्हणजेच कोणत्या प्रकारच्या पिन्स किती करायच्या हे आधीच ठरवा. साधारणत: ४० टक्के पिन्स या प्रेरणादायी असतात. ४० पिन्स प्रत्यक्ष विक्रीच्या असाव्यात.

Author

  • शैवाली बर्वे

    यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून MBA केलेले असून सध्या एका मल्टी नॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत.

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top