Advertisement
बिझनेस लिजेंड्स

इंटरनेटची ताकद ओळखून दीप कालरा यांनी २००० साली सुरू केली ‘मेक माय ट्रिप’

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


ते एक अनुभवी बॅंकर होते आणि एबीएन ॲम्रो ह्या प्रसिद्ध बॅंकेत चांगल्या पदावर कार्यरत होते. अनेक वर्ष एकाच प्रकारचं काम आणि रोजचं ठरलेलं आयुष्य जगत असतानां काहीतरी अधिक चांगलं आणि काहीतरी वेगळं करावं हा विचार त्यांच्या मनात येत असे, पण वेगळं म्हणजे नक्की काय, ते मात्र त्यांना कळत नव्हतं.

एबीएन ॲम्रो बॅंकेत तीन वर्ष काम केल्यानंतर त्यांनी बँकेची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना आव्हाने स्वीकारायची आवड होती आणि त्यांच्यावर विजय मिळवण्यात त्यांना आनंद मिळत असे. परदेशात बोलिंग या खेळाची कमालीची क्रेझ आहे आणि जर आपण तो खेळ भारतात उपलब्ध केला, तर या खेळाच्या माध्यमातून एका नवीन पर्वाला सुरुवात होऊ शकते असं त्यांना वाटलं.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

त्या अनुषंगाने त्यांनी एएमएफ बोलिंग ह्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील कंपनीला भारतात आणायचं ठरवलं. पण बोलिंग कंपनीसाठी निधी उभारणे आणि त्यांना आपल्या देशात आणणे त्यांच्यासाठी खूपच कठीण काम झाले आणि त्यांचा हा उपक्रम अयशस्वी ठरला.

मात्र त्यानंतर काय करायचे हे त्यांना कळत नव्हते. खरं तर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता आणि त्यासाठी स्वतःचे एक व्यासपीठ हवे होते पण काही केल्या ते शक्य होत नव्हते. त्यामुळे पुन्हा घरी बसण्याऐवजी जीई कॅपिटल या कंपनीत त्यांना नोकरी घ्यावी लागली ज्याचा त्यांना फायदाच झाला.

या नोकरीमुळे त्यांना इंटरनेटची क्षमता ओळखण्यास मदत झाली आणि त्यांच्यासाठी प्रगतीचे दरवाजे उघडले. जीई कॅपिटलमध्ये असताना त्यांच्या लक्षात आले की नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी इंटरनेट टेक्नॉलॉजीचा फायदा होऊ शकतो. त्यांच्या पत्नीची कार ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न करताना इंटरनेटच्या अनेक शक्यतांबद्दल त्यांना खात्री वाटू लागली.

ऑनलाइन व्यवसायाची मेख काय आहे ते कळताच त्यांनी जीई कॅपिटलचा राजीनामा दिला आणि स्वत:ची कंपनी स्थापन करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. पर्यटन क्षेत्रावर संशोधन करत असतानां त्यांना जणू काही साक्षात्कार झाला. त्यांच्या लक्षात आले की भारतातील लोकांना तिकीट सुरक्षित करण्यासाठी तिकीट काउंटरवर लांबच लांब रांगांमध्ये थांबावे लागते आणि इथेच त्यांना नवीन व्यवसायाचा मार्ग सापडला.

त्यांनी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुलभ करण्याचा निर्णय घेतला. थायलंडला सुट्टीसाठी बुकिंग करत असताना त्यांना समजले की इंटरनेटवरील मध्यस्थांना फाटा देऊन आपण अधिक स्पर्धात्मक किंमतींना तिकिटं देऊ शकतो. त्यानंतर त्यांनी स्वतःची वेबसाइट बनवली आणि त्याला नांव दिले मेकमायट्रिप. त्यांचं नांव आहे दीप कालरा.

मेकमायट्रिपचे संस्थापक दीप कालरा यांचा जन्म हैदराबाद येथे झाला आणि त्यांनी दिल्ली आणि अहमदाबाद येथे शिक्षण घेतले. त्यांनी १९९० मध्ये सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली येथून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि १९९२ मध्ये आयआयएम, अहमदाबाद येथून एमबीए केले.

दीप कालरा थेट आयआयएम अहमदाबादमधून एबीएन ॲम्रोमध्ये सामील झाले जिथे त्यांनी एक वर्षाचा ब्रेक घेण्यापूर्वी तीन वर्षे काम केले. १९९९ मध्ये जीई कॅपिटलमध्ये बिझनेस डेव्हलपमेंटचे व्हाईस प्रेसिडेंट ह्या पद भूषविण्यापूर्वी त्यांनी एएमएफ बॉलिंगसोबत भारतात बॉलिंग ॲली तयार करण्यासाठी काम केले.

भारतातील आघाडीची ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी मेकमायट्रिपची स्थापना दीप कालरा, केयुर जोशी, राजेश मागो, आणि सचिन भाटिया यांनी वर्ष २००० मध्ये केली.

मेकमायट्रिप ही भारतीय ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी आहे जिचे हेड ऑफिस गुरुग्राम, हरियाणा येथे आहे. ही कंपनी विमान तिकिटे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हॉलिडे पॅकेजेस, हॉटेल आरक्षण, रेल्वे आणि बस तिकिटांसह ऑनलाइन प्रवास सेवा पुरवते. मेकमायट्रिप यांची न्यूयॉर्क, सिंगापूर, क्वालालंपूर, फुकेत, ​​बँकॉक आणि दुबई येथेही अनेक आंतरराष्ट्रीय कार्यालये आहेत.

२०१६ मध्ये मेकमायट्रिप आणि आयबीआयबीओ ग्रृप हे भारतातील सर्वात मोठे ट्रॅव्हल बुकिंग पोर्टल स्टॉक व्यवहाराद्वारे एकमेकात विलीन झाले. विलीनीकरणानंतर मेकमायट्रिप समभागधारकांकडे ६०% हिस्सा आहे आणि आयबीआयबीओ ग्रृपच्या भागधारकांना ४०% भागभांडवल प्राप्त होते. नॅस्पर्स आणि टेंन्सेंट जे संयुक्तपणे आयबीआयबीओ ग्रृपचे मालक आहेत, मेकमायट्रिप मधील एकमेव सर्वात मोठे शेअरहोल्डर बनले.

२०१२ मध्ये मेकमायट्रिपने विंडोज फोन, आयफोन, अँड्रॉइड आणि ब्लॅकबेरी उपकरणांसाठी ट्रॅव्हल मोबाइल ॲप्लिकेशन लाँच केले. मेकमायट्रिप रूट प्लॅनर भारतातील १० लाख पेक्षा जास्त मार्गांवर सर्व मूलभूत आवश्यक माहिती प्रदान करतात.

मेकमायट्रिपने २००५ मध्ये टायगर फंडकडून $१० दशलक्षचा निधी उभारला. त्यानंतर २००६ मध्ये $१३ दशलक्ष आणि २००७ मध्ये $१५ दशलक्ष इतका निधी उभारला. २०१६ मध्ये मेकमायट्रिपने त्याचा आयपीओ लाँच केला, ज्यात त्यांनी $१८० दशलक्ष इतका फंड मिळवला. नंतर आणखी एक आयपीओ लाँच केला आणि $३३० दशलक्ष इतकी रक्कम जमा केली.

मेकमायट्रिपकडे डेटा सायंटिस्ट्सची मोठी टीम आहे जे चॅटबॉट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात; आयबीआयबीओ साठी जिया आणि मेकमायट्रिप करीता मायरा. हे चॅटबॉट्स विक्रीनंतरच्या बहुसंख्य प्रश्नांचे निराकरण करण्यात मदत करतात आणि लवकरच स्वतः देखील प्रत्यक्ष विक्रीला सुरुवात करतील. मेकमायट्रिपने मायबिझ द्वारे कॉर्पोरेट ट्रॅव्हल क्षेत्रातही प्रवेश केला आहे.

मेकमायट्रिपच्या काही उपकंपन्यादेखील आहेत, जसे आयबीआयबीओ, इझी टु बुक होल्डिंग, आयटीसी, लक्झरी टूर्स अँड ट्रॅव्हल, क्वेस्ट टु ट्रॅव्हल.

– चंद्रशेखर मराठे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!