प्रगतिशील उद्योग

लक्ष्मणराव किर्लोस्कर :: मराठी उद्योगजगताचे शिलेदार

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


लक्ष्मणराव यांचा जन्म १८६९ सालचा. त्यांना दोन गोष्टींची आवड होती. एक यंत्रसामग्री आणि दुसरे चित्रकला. १८८५ मध्ये वडिलांची इच्छा आणि मोठा भाऊ रामन्ना यांच्या आर्थिक पाठबळाच्या जोरावर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. दोन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर थोड्याशा रंगांधळेपणामुळे चित्रकलेतून त्यांना माघार घ्यावी लागली, परंतु तिथेच त्यांनी मॅकेनिकल ड्रॉइंग शिकायला सुरुवात केली.

याच्या जोरावर व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीजेटीआय) ते सहप्राध्यापक म्हणून शिकवू लागले. महिन्याला पंचेचाळीस रुपये पगार मिळत होता. इथेच लक्ष्मणरावांमध्ये अमेरिकन यांत्रिक इंडस्ट्रीविषयी वाचनाची आवड रुजली.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox

इन्स्टिट्यूटमध्ये मशीन कसे हाताळावे, तयार कसे करावे, मशीनची दुरुस्ती कशी करावी, पुन्हा नव्याने मशीन कसे तयार करावे, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास ते करू लागले आणि त्यावर काम करू लागले. त्यांनी हळूहळू मशीन दुरुस्ती आणि इतर कामे घ्यायला सुरुवात केली. लवकरच ते प्रोफेसर किर्लोस्कर म्हणून ओळखले जाऊ लागले.

१८९० च्या सुरुवातीच्या काळात लक्ष्मणरावांनी सायकल विक्रीला सुरुवात केली. मुंबईत सायकल खरेदी करून ते बेळगावला भावाकडे विक्रीसाठी पाठवत. सातशे ते हजार रुपयांच्या सायकली पंधरा रुपये आकारून त्यांचा भाऊ सायकल चालवायला शिकवत होता.

१८९७ मध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. लक्ष्मणरावांनी व्हीजेटीआयची नोकरी सोडून पूर्णवेळासाठी बेळगावला भावाच्या सायकल विक्रीच्या उद्योगात प्रवेश केला. थोड्याच काळात पवनचक्की या उद्योगात त्यांनी प्रवेश केला. सॅमसन कंपनीची पवनचक्कीची डिलरशीप त्यांनी घेतली. वर्षभरात त्यांनी मोठ्या प्रमाणात पवनचक्की विक्री केली.

औंध संस्थानाच्या दरबाराच्या बांधकामाचे कंत्राट १९०१ मध्ये औंधच्या राजाने त्यांना दिले, परंतु नजीकच्या काळातच औंध संस्थानाच्या राजाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यात वितुष्ट आले आणि त्यांची गुंतवणूक बुडाली आणि ते पुन्हा बेळगावला परतले. या घटनेमुळे लक्ष्मणराव आर्थिक स्थैर्य मिळविण्याच्या दृष्टीने विचार करू लागले. यातूनच जास्तीत जास्त लोकांना गरजेचे असेल असे प्रॉडक्ट बनविण्यासाठी ते विचार करू लागले. विशेषत: त्यांच्या नजरेसमोर होते ते म्हणजे शेतकरी.

लक्ष्मणरावांनी अमेरिकेतील एका मासिकातील कापणी यंत्र पाहिले आणि आपल्याकडेही असे यंत्र बनवायचे ठरवले. दुकानातील काही भागांत मुंबईहून यंत्रसामग्री आणून चारा कापणी यंत्र बनवण्यास त्यांनी सुरुवात केली. १९०१ मध्ये बनवलेले किर्लोस्करांचे हे पहिले उत्पादन. याची विक्री वाढत गेली. लक्ष्मणरावांनी त्यानंतर छोटी लेथ मशीन, ड्रिलिंग मशीन व छोटी एमरी ग्राइंडर अशी यंत्रे त्या छोट्याशा झोपडीतच बनवली.

किर्लोस्करवाडी ही औद्योगिक वसाहत लक्ष्मणरावांनी उभारली. भारतातील विसाव्या शतकातील आघाडीच्या उद्योगांपैकी किर्लोस्कर बंधूंचा उद्योग हाही एक आहे.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!