यशस्वी होण्यासाठी रतन टाटांनी सांगितलेल्या ११ महत्त्वाच्या गोष्टी


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


१. देणाऱ्याने देत राहावे…

उद्योजकाने विक्री, त्याचे टार्गेटस आणि नफा यापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. आपण ज्या समाजात वाढतो, त्याचे आपण देणं लागतो, ही कृतज्ञता बाळगली पाहिजे. यशस्वी उद्योग हे नेहमीच समाजहितामध्ये देण्यामध्ये तत्पर असतात. त्यामुळे त्यांच्याकडे समाजाला देण्यासाठी यंत्रणा तयार असतात.

तसेच कंपनीमधील निस्वार्थीपणे देण्याच्या या कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेबद्दल आदर निर्माण होतो आणि वाढत राहतो. या सवयीमुळेच परस्परांबद्दल आदर निर्माण होऊन आपण राहत असलेला समाज अधिकाधिक जगण्यालायक बनतो.

२. जिद्द, चिकाटी

यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहण्याची क्षमता निर्माण करा. उद्योजकाला अपयशाशी सामना करून उभं राहावं लागत असते. त्यामुळे चिकाटी ही त्याच्यासाठी यशाची सर्व दारे उघडणारी किल्ली ठरते. वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक आयुष्य चिकाटी म्हणजे दुर्दम्य आत्मविश्वास. कोणत्याही अडचणीवर उपाय शोधण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी कोणतीही गोष्ट करण्याची नवनवीन मार्ग शोधायला शिका.

३. स्वतःमधील गुणवैशिष्ट्ये

प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत कुशल असू शकत नाही. त्यामुळे स्वतःमध्ये असलेली गुणवैशिष्ट्ये ओळखून ती वृद्धिंगत करा. व्यवसाय करताना दृश्य कौशल्यांवर लक्ष केंद्रित करून ती जास्तीत जास्त परिपूर्ण बनण्यावर भर देणं महत्त्वाचं असते. शिवाय हीच गोष्ट आपल्या कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे करून घेणं, ही नेतृत्वाची जबाबदारी असते.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

आपल्या कंपनीमध्ये विकासाला प्रोत्साहन देणारं वातावरण निर्माण करा. आपल्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन करत रहा, त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधा. कौशल्य विकासासाठी कार्यक्रम आयोजित करा. यामुळे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये क्षमता निर्माण करण्याचा उत्साह आणि आत्मविश्वास येईल.

४. शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्या

शिक्षण हे सतत चालू असतं आणि नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी, नवनवीन क्षीतिजाला गवसणी घालण्यास उत्सुक लोकांसाठी ते कधीही थांबत नाही.

५. जीवन

तुमचं जीवन जसं आहे तसं स्वीकारा, त्यावर प्रेम करा, ते प्रत्येक क्षण जगा. इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. याही पुढे जाऊन सांगायचं झाल्यास लोकांना तुमच्यावर करायची तितकी चिखलफेक करू द्या, त्याचाच वापर करून आपण आपला महाल उभा करा.

लक्षात ठेवा, आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करण्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे. जीवनाचे ध्येय ओळखा व पूर्ण ताकद त्याच्या पूर्ततेमध्ये ओता.

६. निर्णयक्षमता

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला निर्णयक्षमता खूप गरजेची असते. यश मिळवण्यासाठी वैचारिक स्पष्टता आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला काय हवंय, याची सर्वप्रथम खात्री करून घ्या आणि मगच त्या अनुषंगाने आपले नियोजन करा.

तुमचे निर्णय चुकले तर? अशी भीती मनात बाळगू नका. चुकीच्या निर्णयांतून योग्य शिकवण घ्या. निर्णय घेण्यासाठी लागू शकणारी, त्याच्या संबंधित गोष्टींची पुरेपूर माहिती मिळवा आणि मग तुमच्याजवळील पर्यायांची तुलना करा. यातून ध्येयाच्या जास्तीत जास्त जवळ पोचता येईल. परिणामांचा अभ्यास आणि पुनरावलोकन केल्याने आपण निवडलेल्या पर्यायाची परिणामकारकता समजून येते.

७. सकारात्मक मानसिकता

तुमच्या मानसिकतेमुळे तुमचं निश्चित ध्येय पूर्ण होतं किंवा होत नाही. यशस्वी होण्यासाठी यशाचा ध्यास घेणारी मानसिकता निर्माण करा. नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा आणि अनावश्यक ताणतणावापासून स्वतःला काही काळ दूर ठेवा.

नवीन कौशल्ये आत्मसात करण्यावर भर द्या आणि स्वतःला आवाहनात्मक परिस्थितीत ढकलत रहा, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या सुदृढ व्हाल आणि तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.

८. बदल आवश्यक आहे

तुम्हाला माहीतच आहे की, बदल ही एकमेव अपरिवर्तनीय गोष्ट आहे. त्यामुळे तो स्वीकारा आणि पुढे वाटचाल करा. नवीन कल्पना मांडत राहा. उद्योगात नवनवीन प्रक्रिया आणत राहा आणि प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करत राहा. होणाऱ्या बदलांना सकारात्मक दिशा द्या.

भविष्याचा अंदाज घ्या आणि जे होईल, त्यासाठी तयार राहा. यामुळे वेगाने बदलणाऱ्या उद्योजकीय विश्वात सहजपणे आणि तयारीने आवाहनांचा सामना करणे तुम्हाला सोपे जाईल. आपल्या मूल्यांवर लक्ष केंद्रित करा, भीतीवर नको. जर बदल अटळ आहे, तर मग तो आत्मसात करताना पुढे-मागे करू नका.

९. आव्हानं स्वीकारा

मार्गातील कोणत्याही अडथळ्यांकडे आव्हान म्हणून बघा आणि त्यावर मात करणे अशक्य नाही, असा विश्वास बाळगा. कठीण परिस्थितीत स्वतः नेत्याची भूमिका घेणेच उद्योजकांसाठी उत्तम ठरते. आपले भागधारक आणि निकटवर्तीय यांना मार्गदर्शन करा.

उद्योगात चढउतार महत्त्वाचे असतात. यांच्यामुळे आपल्या मर्यादा विस्तारायला मदत होते. घाईघाईने निर्णय घेऊन कृती करण्यापूर्वी प्रथम प्रश्न समजून घ्या आणि मगच त्यावर स्वतःचे मत बनवा.

१०. वारसा जपा

तुमच्या पूर्वजांनी मागे ठेवलेला मूल्ये, नैतिकता आणि संस्कृतीचा वारसा जतन करा. फक्त नफेखोरीवर नाही, तर दीर्घकालीन स्थैर्यावर आधारीत उद्योग निर्माण करा. पैसा जरी आवश्यक असला, तरी शाश्वत विकास हा उद्योगाचा आत्मा आहे.

वारसा जतन करताना आणि मागे सोडून जाताना निर्माण केलेल्या मूल्यव्यवस्थेचे समर्थन करण्यात प्रचंड शक्ती आणि गुंतवणूक उभी करावी लागते.

११. वाढ

एकदा काय हवंय म्हणजेच आपल्या ध्येयाबद्दल स्पष्टता आली, की ते मिळवण्यात तुमची संपूर्ण शक्ति केंद्रित होईल आणि हाच व्यावसायिक वृद्धीतील मैलाचा दगड ठरतो.

  • अंतिम ध्येयावर नजर ठेवा : तुमच्या टार्गेटसोबतच आपले, आपल्या टीमचे आणि संस्थेच्या ध्येयाचे मूल्यांकन करत राहा. एकदा ध्येयापासूनचे अंतर कळले की, प्रत्येकजण आपली त्यासाठी आपली ऊर्जा एकत्रित करू लागतो.
  • आपली आवड जीवंत ठेवा : उत्साह आणि उत्सुकता दोन्ही जतन करा, या दोन्ही संसर्गजन्य आहेत, त्यामुळे आपल्या भोवतालच्या लोकांमध्ये त्याचा प्रसार करा.
  • लोकांचा विचार प्रथम करा : भागधारक हा संस्थेचा कणा असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना उत्तेजन देत रहा, ग्राहकांना आनंदी ठेवा आणि इतर भागधारकांना कंपनीच्या कार्यवाहीबद्दल माहिती देत राहा. यशाच्या आराखड्यात या गोष्टीची खूप मोठी भूमिका आहे.

रतन टाटांनी सांगितलेल्या वरील अकरा गोष्टी कोणत्याही निराश व्यक्तीला प्रेरणा देऊन पुन्हा उभं राहण्यास नक्कीच मदत करू शकतात.

– टीम स्मार्ट उद्योजक