जीवघेण्या अपघातातून जन्माला आली एक लेखिका

सुजाता चंद्रकांत नायकुडे या तरुणीचा जन्म ३१ डिसेंबर, १९८१ रोजी झाला. मालाड येथील क्वीन मेरी हायस्कूलमधून तिचे एसएससीपर्यंतचे शिक्षण झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण मालाडमधीलच एन. एल. कॉलेज या प्रख्यात महाविद्यालयात झाले. २००३ साली बी. कॉम झाल्यानंतर तिने बीपीएल कॉल सेंटरमध्ये एक वर्ष नोकरी केली.

ही नोकरी करता करताच तिने एनआयआयटी मधून तीन वर्षांचा कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा कोर्स केला. त्यानंतर ती स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेत एक्झीक्युटिव्ह म्हणून नोकरीला लागली. तिथे ती प्रायोरिटी बॅकिंगमध्ये वर्षभर होती. त्यानंतर एचएसबीसी बँकेत एक्झीक्युटिव्ह होती. तिथे ती सेंट्रल मॅनेजमेंट ऑफ इन्फर्मेशन सिस्टिमचे काम करित होती.

काम केल्यावर वर्षभर तिने तिथे ती आयसीआयसीआय लोर्म्बाड जनरल इन्शुरन्स कंपनीत २००६ साली ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून रुजू झाली. तिथे तिने विविध शाखांमध्ये मुलभूत स्वरुपाचे काम केले.

दरम्यान २००७-०८ मध्ये एमबीएसाठी ‘अथर्व स्कूल ऑफ बिझिनेस’मध्ये नोंद सुजाताने नोंदविले. तीन वर्षांच्या अनुभवानंतर या कोर्सला प्रवेश मिळतो. त्यामुळे सुजाताला तिथे प्रवेश मिळाला. २००९ मध्ये तिला आईच्या आजारपणामुळे लोर्म्बाडमधील नोकरी सोडावी लागली. २०१० साली देवदर्शनासाठी गेले असताना, येताना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ सुजाता व तिचे कुटुंब असणाऱ्या टुरिस्ट गाडीला अपघात झाला. पण मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली.

सुजाताची गाडी समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळली. दुर्देवाने तातडीचे उपचार मिळू शकले नाही. सुजाताचा भाऊ सुहास कोमात गेला. पंधरा दिवस तो कोमात होता. तेव्हा तो दहावीत होता. वडिलांच्या कमरेचे हाड तुटले. आईचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले होते. तर सुजाताच्या डाव्या पायाला मार लागला होता. वेळीच उपचार न झाल्याने सुजाताच्या डाव्या पायाला गँगरिन झाले. त्यामुळे सुजाताचा डावा पाय मांडीपासून कापावा लागला. पुढे या कुटुंबाचे दोन-तीन महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यात गेले. वडिल कस्टम अधिकारी होते, ते २०११ साली निवृत्त झाले.

आई गृहिणीच होती. भाऊ आता बारावीची परीक्षा देत आहे. त्याची शरीराची उजवी बाजू सक्षम नाही. त्यामुळे अभ्यासात अडचणी येतात. चार वर्षे तो फिजियोथेरपी घेत होता. म्हणून सर्व वाहन चालकांनी वाहन चालविताना अतोनात काळजी घेतली पाहिजे, असे सुजाताला वाटते. जेणेकरुन असे अपघात टळू शकतील.

या अपघातानंतर सुजाता खचून मात्र गेली नाही. ती घरच्यांची आणि विशेषत: भावाची अधिक काळजी घेऊ लागली. घरी राहून तिने एमबीएच्या शेवटच्या सत्राची परीक्षा दिली आणि ती एमबीए झाली. संस्थेनेही सुजाताने भरलेली जवळपास दोन लाख रुपये फी परत केली आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य दिले. सुजाता याबद्दल संस्थेचे आजही ऋण व्यक्त करते.

अपघातामुळे सुजाताच्या हिंडण्या-फिरण्यावर मर्यादा आल्या. त्यामुळे ती घरीच राहून आई, भावाकडे पाहते. शिवाय मुलांच्या शिकवण्या घेते. तसेच मराठीतून हिंदी, इंग्रजी किंवा हिंदी, इंग्रजीतून मराठी असे भाषांतराचे काम ती करू लागली. शिवाय प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देण्याचेही काम करू लागली. सुजाताचे आजही ही काम चालूच आहे.

एमटीबी या सिनेमाच्या वेबसाईटसाठीही तिने इंग्रजीतून लेखन केले. यापुढे सुजाताला लेखनातच करिअर करायचे आहे. म्हणूनच ती म्हणते, मला अपंग झाल्याचे भांडवल करुन नोकरी मिळवायचीही नाही आणि यापुढे करायचीही नाही.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


या काळातच सुजाताची बॅंकेतील मैत्रीण आणि सहकारी भरती आनंदने तिचे नाव महाराष्ट्र सरकारच्या वेब पोर्टल महान्यूजचे संचालक देवेंद्र भुजबळ यांना सुचवले. भारतीने तिची सर्व हकीकत सांगितली आणि भुजबळसरांनी सुजाताला एक अवसर देण्याचे ठरविले. आता सुजाताने महान्यूजसाठी लेख लिहण्यास सुरुवात केली. एका प्रसिद्ध आणि शासकीय वेब पोर्टलसाठी लिहण्याची हि सुजाताची पहिलीच वेळ.

त्यामुळे तिला प्रचंड दडपण आले होते, पण भुजबळसरांनी तिचा धीर वाढवला व तिला प्रोत्साहित केला. सरांच्या मार्गदर्शनाखाली सुजाताची सुरुवात झाली. भुजबळ सर तिच्या कडून वेगवेगळ्या विषयांवर लेख तयार करून घेत असत. त्यामुळे तिचे वाचन वाढू लागले, तिच्या लेखनाला आणि जिवनाला आता एक सुंदर वळण लाभले होते.

सरांनी तिला लेख लिहण्यापर्यंत मर्यादित न ठेवता मुलाखतीकडे वळवले. आपल्या क्षेत्रात  प्रसिद्ध आणि नामांकित लोकांची सुजाता दूरध्वनीवरून मुलाखत घेऊ लागली. नंतर त्या मुलाखतीचे शब्द रूपांतर ती करत असे आणि ते महान्यूजवर प्रकाशित होत असे.

भुजबळ सर लेखातील चुका व त्रुटी त्वरित सुजाताच्या निदर्शनात आणून देत असत. त्यामुळे तिची प्रगती होत गेली आणि लेखनाचा सूर तिला गवसला. नवनवीन विषय ती सरांबरोबर चर्चा करून हाताळू लागली. सुजाता, भुजबळसरांना आपले गुरु मानते. त्यांनीच माझ्यातील गुणांना वाव दिला आणि मी लेखन करू लागली, असे ती म्हणते.

आता एक वर्ष झाले आहे सुजाता ‘महान्यूज’साठी लेखन करत आहे. तिला त्याचा योग्य मोबदलासुद्धा दिला जातो. इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये सुजाताचे लिखाण चालू आहे. तिला आता कामे मिळत आहेत. भाषांतर, मुलाखती आणि वेगवेगळ्या विषयांवर लेक लिहणे, हे तर आता नित्याचे झाले आहे. कॉर्पोरेट कंपनी, छोटे प्रकाशक आणि ई-कॉमर्स साइटसाठी सुजाता लिखाण करते आणि पैसे कमवते.

अपघातामुळे निर्माण झालेल्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक अडचणींवर मात करत सुजाताची वाटचाल दमदारपणे चालूच आहे. तिच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

सुजाता नायकुडे
९८६७८१०५४५


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?