आत्मविश्वास वाढवणासाठी करा या २० छोट्या छोट्या गोष्टी

आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर, स्वतःच्या क्षमतांवर असलेला विश्वास. फुल जसे त्याच्या सुगंधाने ओळखले जाते तसेच आत्मविश्वासाचे असते. आत्मविश्वासाच्या अभावामुळे अनेकजण काळाच्या, जगाच्या मागे राहतात.

कोणी कितीही हुशार असला तरी त्याची हुशारी आत्मविश्वासाशिवाय उपयोगी नाही. आत्मविश्वास हाच यशाचा पाया असतो असे म्हणणे चूक ठरणार नाही. आत्मविश्वासाच्या अभावाने माणसं स्वतःवरच संशय घेतात आणि नकारात्मक विचारांच्या आहारी जातात.

आत्मविश्वास हा प्रत्येकाकडे असतोच असे नाही तर जे दृढनिश्चयी असतात, मेहनती, साहसी, वचनबद्ध, कृतिशील असतात ते आत्मविश्वासी असतात. तुमचा आत्मविश्वास वाचावा यासाठी खालील टिप्सचा नक्कीच उपयोग होईल.

१. स्वतःवर विश्वास ठेवा. छोटी छोटी लक्ष्य समोर ठेऊन ती वेळेत पूर्ण करा. यातून आपला आत्मविश्वास वाढायला मदत होते.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE

२. ध्येय ठरवताना ते साध्य करू शकाल असेच ठेवा. कारण दृष्टिपथ्यात नसलेले ध्येय आपल्यातील असलेला आत्मविश्वासही कमी करतो. म्हणूनच ध्येय नेहमी SMART असावं. SMART म्हणजे Specific (स्पष्ट), Measurable (मोजता येईल असे), Achievable (साध्य होईल), Realistic (वास्तविक) आणि Time-Bound (वेळेत पूर्ण होईल असे).

३. सदैव हसत राहा. स्वतःला प्रेरणा देत राहा. अपयशाने दुःखी न होता त्यातून योग्य शिक्षा घ्या. कारण अनुभव हा ‘वाईट’ अनुभवातूनच शिकता येतो.

४. नेहमी सोपी कामं प्रथम करा. कठीण काम शेवटी, कारण जेव्हा आपण सोपी काम चांगल्या पद्धतीने पार पाडतो, तेव्हा आपल्यावरील दबाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो.

५. सकारात्मक विचार करा. दिवसाची सुरुवात चांगल्या कामाने करा. विनम्र राहा.

६. अशक्य काहीच नसते. आत्मविश्वासाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे अपयश येण्याची भीती. आपल्याला या भीतीवर विजय मिळवायचा असेल तर ज्याची भीती वाटते ते जरूर करा.

७. लोक काय म्हणतील? या प्रश्नाचा विचार करू नका. खरं तर हा एक प्रकारचा रोगच. कोणतेही काम करण्यापूर्वी अनेक लोक इतर लोक काय म्हणतील असा विचार करत असतात. असा विचार करत बसणाऱ्या लोकांच्या हातातून वेळ निसटून जाते.

असे लोक नेहमी भीत भीत जगतात. म्हणून लोकांचा विचार जास्त करू नका, कारण जगातल्या प्रत्येकालाच दुसऱ्याचे वागणे पटेल असे नाही. त्यामुळे आपल्याला जे योग्य वाटते ते करा.

८. खरं बोला, प्रामाणिक राहा. चांगले कार्य करा. गरजवंताला मदत करा. या चांगल्या गोष्टी आत्मविश्वास वाढवतात.

९. आपल्या आवडीचे काम करा. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करा.

१०. आपल्याला शोभतील असे कपडे परिधान करा. यातून आत्मविश्वास वाढतो. कपडे नेहमी स्वच्छ, टापटीप आणि नीटनेटके असावेत.

११. व्यवहारकुशलता अंगी बाणवा. विनम्र राहा. यातून केवळ आत्मविश्वासच नव्हे, तर चांगले मित्रही वाढतात. चांगले मित्र नेहमी मदतीला धावून येतात.

१२. प्रेरणादायी सेमिनारमध्ये भाग घ्या. प्रेरणादायक व्हिडिओ पाहा. स्वसुधारणा आणि वैयक्तिक विकासाची पुस्तके, लेख, ब्लॉग्स वाचा. ते आपल्याला ताजेतवाने करतात आणि आत्मविश्वास वाढवतात.

१३. वर्तमानात जागा. भूतकाळ अथवा भविष्यकाळावर कोणाचेही नियंत्रण नसते हे सत्य आहे.

१४. सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक विचारांचे चांगले मित्र बनवा. आत्मचिंतन करा.

१५. ध्यान, योग व प्राणायाम करा. स्वतःसाठी वेळ काढा आणि काही काळ एकांतात घालवा. स्वतःशी बोला आणि आपण किती चांगले आहोत ते स्वतःच अनुभवा.

१६. आपले यश आठवा आणि कल्पना करा की तुम्ही काहीही करू शकता. तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही.

१७. नेहमी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. रचनात्मक म्हणजे creative पद्धतीने विचार करा. काहीतरी नवीन आणि सर्जनशील करा. दिवसातील काही वेळ संगीत, रचनात्मक कार्यांसाठी काढा. काहीतरी वेगळे करा.

१८. आत्मनिर्भर व्हा. स्वतःची कामं स्वतः करा. यातून आत्मविश्वास वाढतो.

१९. तुमच्या आवडीचे काम करा. तुम्हाला स्वारस्य नसेल असे कोणतेही काम करू नका. अन्यथा आत्मविश्वास ढासळतो. जे कराल ते सर्वोत्तम करा.

२०. दृढनिश्चय करा. लक्ष्य प्राप्त करायचे असेल तर मेहनत आणि मन लावून काम काम करणे आवश्यक आहे. यासाठी दृढनिश्चय महत्त्वाचा आहे. यातूनच आत्मविश्वास बळकट व्हायला मदत होते.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?