यशाच्या शिखरावर चढण्याच्या २१ पायर्‍या

यशस्वी होणं म्हणजे बरेचदा ज्यांनी स्वतःचं ध्येय गाठलं आहे, त्यांच्याकडून शिकून घेणं. उद्योजकासाठी अनुभवी गुरू लाभणे, हासुद्धा एकप्रकारे आशीर्वादच ठरतो, पण प्रत्येकाच्या बाबतीत असं होतच असं नाही. जर आपल्याला व्यवसायात असा गुरू लाभला नसेल, तर सुरुवात करण्यास सहाय्यक ठरणार्‍या या २१ यशस्वी होण्याच्या टिप्स तरुण उद्योजक आणि उद्योजक होऊ इच्छिणार्‍यांनी जरूर वाचाव्यात.

१. स्वतःला आव्हान करत राहा : वयाच्या सोळाव्या वर्षी मासिकाच्या रुपात पहिल्या व्यवसायाला सुरुवात करणारे रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या मते स्वतःला आवाहन करत राहणे, हे त्याच्यासाठी यशस्वी होण्यासाठी सर्वात जास्त प्रेरणादायी असते. ते जीवनाकडे जिथे रोज प्रत्येकजण नवीन गोष्टी शिकू शकतो, असं एक मोठं विद्यापीठीय शिक्षण समजतो. आपणसुद्धा असं करायला हरकत नाही.

२. तुमच्या आवडीचे काम करा : व्यवसाय चालवताना त्याला देऊ तितका वेळ कमीच पडतो, या काहीच शंका नाही. त्यामुळे आपला ज्यावर संपूर्ण विश्वास आहे, ज्याची आपल्याला आवड आहे, असे काम करणं फक्त हाच जीवनात समाधान मिळवण्याचा मार्ग आहे.

३. जोखीम घ्या : एखाद गोष्ट करून बघितल्याशिवाय आपण घेतलेल्या मेहनतीचे परिणाम कधीच कळणार नाहीत. शिवाय असं करून बघितल्यामुळे प्रयत्नच न केल्याचा पश्चात्ताप करावा लागत नाही.

४. स्वत:वर विश्वास ठेवा : हेन्री फोर्ड यांनी म्हटल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळण्याच्या शक्यतेबद्दल तुमचं जे मत असेल, तेच खरं ठरतं. त्यामुळे आपण यशस्वी होऊ शकता, याबद्दल विश्वास बाळगा आणि तुम्हाला कठिणातील कठीण अडथळ्यांतूनही मार्ग दिसू लागेल. याउलट जर असं न केल्यास तुम्हाला केवळ अपयशी होण्याचे कारणे सापडत राहतील.

५. ध्येयव्रती व्हा : उद्योजक ही अशी व्यक्ती असते, जी एखाद्या गोष्टीसाठी ध्येय बाळगते आणि ते सत्यात उतरवण्याची जिद्द तिच्या मनात असते. त्यामुळे, आपले सदैव आपल्याला सुस्पष्ट असले पाहिजे.

६. चांगल्या लोकांची संगत मिळवा : तुम्ही काय बनणार, हे तुम्ही कोणाच्या सहवासात असता, यावरून ठरते. त्यामुळे लिंक्डइनचे सहसंस्थापक रिड हॉफमन म्हणतात की, आपल्याला जसं बनायचं आहे, अशा लोकांच्या सहवासात राहणं हाच स्वतःला बदलण्याचा सर्वात जलद मार्ग आहे.

७. आपल्या भीतीचा सामना करा : व्यवसायात भीतीवर ताबा मिळवणं सोपं नसलं, तरी आवश्यक आहे. जीवनात निर्भयपणा हा स्नायूंसारखा असतो, आपण जितका त्यांचा व्यायाम करू, तितके ते अधिक मजबूत बनतात.

८. कृतीशील बना : या जगामध्ये यशस्वी होऊ शकतील, अशा कल्पनांची कमतरता नक्कीच नाही, पण कृती हेच यश मिळवण्याचं एकमेव साधन आहे. त्यामुळे एखादी गोष्ट सुरू करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चर्चा बनत करून प्रत्यक्ष काम सुरू करणं. हे आपल्या यश मिळवण्यातही तितकंच लागू आहे.

९. वेळ द्यायला शिका : कोणतीही व्यक्ती एका क्षणात यशस्वी होत नाही, उलट प्रत्येकाने कधी ना कधी सुरुवात केलेली असते. स्टीव्ह जॉब्स असं म्हणतात की, जवळून पाहिल्यास असं लक्षात येईल वरकरणी एका रात्रीत मिळाल्यासारखे वाटणार्‍या यशातही खूप मोठा कालावधी गेलेला असतो. त्यामुळे आपल्या कंपनीमध्ये वेळ द्यायला अजिबात घाबरू नका.

१०. वेळ नाही, ऊर्जेचे व्यवस्थापन करा : तुमच्यातील चैतन्य ऊर्जाच तुमच्या वेळेत काय काय करू शकता हे ठरवते, त्यामुळे तिचे हुशारीने व्यवस्थापन आणि वापर करा.

११. सहकार्‍यांचा उत्तम चमू तयार करा : कोणीही उद्योजक एकट्यानेच यशस्वी होऊ शकत नाही. असा प्रयत्न करणारी व्यक्ती प्रत्येक वेळेस एका उत्तम चमूसमोर अपयशी ठरतो. म्हणूनच आपल्या यशाला चालना देण्यासाठी आपला असा उत्तम चमू निर्माण करा.

१२. चारित्र्यवान कर्मचारी शोधा : आपली टीम बनवताना, कर्मचारी निवडताना त्यांचं चारित्र्य आणि मूल्ये यांच्या आधारे त्यांची निवड करा. कारण एखाद्या अकुशल व्यक्तीस प्रशिक्षण देऊन त्याला एखाद्या कौशल्यासाठी तयार करता येते, पण त्यांच्या मूल्यांना आपल्या संस्थेमध्ये तोडमोड करून बसवता येत नाही.

१३. भांडवल उभारणीचे नियोजन करा : रिचर्ड हॅरोच नवउद्यमींना सल्ला देताना म्हणतात की, व्यवसायकरिता भांडवल उभारणे हे उद्योजकाला जितकं कठीण वाटतं, त्यापेक्षाही जास्त कठीण असतं व त्यामुळेच भांडवल मिळायला इतर कामांपेक्षा जास्तच वेळ लागतो. ही गोष्ट लक्षात घेऊनच आपले आर्थिक नियोजन करावे.

१४. स्वत:च्या ध्येयाचे स्मरण करत राहा : दररोज आपल्या ध्येयाची स्वत:ला आठवण करून दिल्याने आपले काम त्याच्या दिशेने चालू असल्याची खातरजमा होते. त्यामुळे ध्येये ठरवा आणि दरदिवशी त्यांची उजळणी करा.

१५. चुकांमधून शिका : यशस्वी उद्योजक चुकांकडे त्यांचे सर्वोत्तम शिक्षक म्हणून बघतात. चुकांमधून योग्य ती शिकवण घेतली की, सुरुवातीला अपयश आले तरी, आपण यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकतो.

१६. आपल्या ग्राहकांना जाणा : डेव्ह थॉमस हे आपला ग्राहकवर्ग ओळखणं म्हणजे यशामधील तीन प्रमुख किल्ल्यांपैकी एक असल्याचं सांगतात. इतर लोकांपेक्षा आपण ज्यांना सेवा देत असतो, त्यांना जाणून घ्यायला शिका. यामुळे त्यांच्या गरजेनुसार सेवा देता येईल.

१७. तक्रारींमधूम शिका : बिल गेट्स एकदा म्हणाले, आपले सर्वात जास्त असंतुष्ट असलेले ग्राहक हे आपल्यासाठी शिकण्यासाठीचा सर्वात मोठा स्रोत असतात. असंतुष्ट ग्राहकांकडून आपल्या सेवेतील त्रुटी जाणून घ्या.

१८. ग्राहकांना सुधारणा विचारा : ग्राहकांची गरज गृहित धरून चालल्यास यश कधीच मिलणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष ग्राहकांनाच त्यांच्या गरज विचारणं आणि मग ते जे सांगतील ते काळजीपूर्वक ऐकून घेणे आवश्यक आहे.

१९. हुशारीने खर्च करा : व्यवसायात आर्थिक खर्च करताना तो काळजीपूर्वक आणि हुशारीने करा, कारण चुकीच्या गोष्टींवर खूप जास्त खर्च करून भांडवल संपवणे सहज आणि सोपं असते.

२०. आपले औद्योगिक क्षेत्र ओळखा : इतर लोक एखाद्या गोष्टीतून कितीही पैसे कमवत असले तरी, ज्या गोष्टीचे ज्ञान नाही आणि जी समजत नाही, अशा गोष्टींचे प्रयोग करू नका. आपले औद्योगिक क्षेत्र खर्‍या अर्थाने जाणून घेणं हीच यशसंपादनाची किल्ली आहे.

२१. अपेक्षेपेक्षा जास्त द्या : गुगलचे लॅरी पेज उद्योजकांना ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त देण्यासाठी प्रवृत्त करतात. यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रात ठळकपणे उठून दिसता आणि तुमच्या प्रामाणिक चाहत्यांची मोठी साखळी तयार होते.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?