Advertisement
उद्योगसंधी

नाताळ व नवीन वर्षानिमित्त सुरू करू शकता हे पाच व्यवसाय

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

१. भेटवस्तू तयार करणे

नाताळात व नवीन वर्षात पदार्पण करताना लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. शिवाय विविध कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांनासुद्धा नवीन वर्षाचं गिफ्ट देतात. याला संधी मानून आपण भेटवस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. यात भेटकार्ड बनविणे, कुणाला व किती कीमतीचं गिफ्ट द्यायचं आहे यावरून ऑर्डरनुसार कस्टमाइज्ड गिफ्ट पुरविणे अशा वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

२. चॉकलेट-केक बनवणे

नाताळ-नवीन वर्ष आता जवळपास सर्वच लोक केक कापून अथवा चॉकलेट वाटून करतात. त्यामुळे हीसुद्धा एक चांगली उद्योगसंधी आहे. कमीत कमी खर्चात घरच्या घरी केक व चॉकलेट्स बनवणे शिकलात की हा व्यवसाय सहज सुरू करू शकता. आज गूगल व यूट्यूब वरून हे अगदी मोफत शिकता येते.

३. इव्हेंट मॅनेजमेंट

नाताळ-नवीन वर्षाची पार्टी असो, डिसेंबर-जानेवारीत लग्नाचे मुहूर्त असो वा बोरनहाण किंवा चैत्रातले उत्सव असोत, या सर्वांसाठी गरजेचे असते इव्हेंट मॅनेजमेंट. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी डिसेंबर महिना नक्कीच सुगीचा काळ आहे.

४. विकेंड प्लॅनिंग

शहरीकरण व नोकरी यामुळे लोकांच्या जीवनात विकेंड अर्थात शनिवार-रविवारची सुट्टी खूप महत्त्वाची ठरते. त्यात या विकेंडला जोडून इतर एखादी सुट्टी आली की लगेच ते बाहेर कुठं तरी जायचा विचार करतात; परंतु दोन-तीन दिवसांत जाऊन येता येईल असे ठिकाण शोधणे मात्र त्यांना कठीण जाते. त्यामुळे दोन-तीन दिवसांत करू शकतील अशा विविध सहलींचे आयोजन आपण त्यांना करून दिले तर ती नक्कीच एक चांगली उद्योगसंधी ठरेल.

५. व्यायाम वर्ग

हे नाव वाचल्यावर तुम्हाला थोडे वेगळे वाटले असेल; पण विचार करा. बहुतांश लोक नवीन वर्षाचा संकल्प करताना या वर्षात बारीक/फिट होणार असा संकल्प करतात. अशा वेळी आपण आपल्या व्यायाम वर्गाची जाहिरात त्यांपर्यंत पोहोचवली तर नक्कीच आपल्याला बरेच ग्राहक मिळतील. लोकांच्या याच मानसिकतेला धरून मोठमोठ्या जिममध्ये नवीन वर्षाचे डिस्काऊंट असते. आपणही या संधीचे सोने करून आपला नवीन व्यवसाय सुरू करू शकतो.

नाताळ, नवीन वर्षाचा सिझन आपण सुट्टी म्हणून न पाहता नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठीचा उत्तम काळ मानला तर अशा अनेक उद्योगसंधी आपल्याला दिसतील व कमीत कमी गुंतवणुकीत आपण उद्योग सुरूही कराल.

– शैवाली बर्वे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!